॥ जय जय्य एंड्रॉइड समर्थ ॥
पहिला मोबाइल!
तो दिवस आठवाला की वाइट वाटतं,
खरं तर मला मुळीच घ्यायचा नव्हता...
आधीच नवीन जॉब त्यात मोबाइल मग परत महिन्याचा खर्च वेगळा,
पण अमृता म्हणाली, तू घेच मोबाइल!
मला हवा तेव्हा तुला कॉंटॅक्ट करता येईल.
तेव्हा तिच्या कड़े बीएसएनएल चा 'तरंग' नामक सेलफोन होता,
सेलफोन कसला...
काळी वीट होती ती! सिम नसलेला CDMA फोन!
असो... तशी तेव्हा फोनची दुकानं कमीच, त्यातल्यात्यात डेक्कनला होती ४-५.. सागर आर्केड मधे गेलो, संध्याकाळची वेळ, गर्दी अपेक्षेप्रमाणे, नोकियाचे फोन तर भाजी विकल्यासारखे खपायचे तेव्हा, माझं लक्ष्य गेलं मोटोरोलाच्या रंगीत स्क्रीन असलेल्या मोबाइलवर...