Skip to main content

'आन्ना' वय वर्ष ४५

लेखक अज्ञात यांनी रविवार, 08/11/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
'आन्ना' वय वर्ष ४५ त्याला २मूलं एक मुलगी, मुलगी सर्वात मोठी, लग्न करून सासरी गेलेली. तीच्या लग्नाच्या दिवशी गेलेलो मी आठवतय काहीतरी तसं, त्यानंतर कधी पाहिलं नाही तीला कधी पाहिलं नाही, बाकीची २मुलं उनाड पण आन्नाला मदत करायची, आन्नाच्या सायकल मध्ये २पायपा मधून तंगडं फीरवीत ये जा चालू असायची धाकट्याची, आन्ना बाघावं तेव्हा कधी आंबे, नारळ, फणस काढायला झाडावर, शेण सारवायला गोठ्यात, सरपण गोळा करायला वाडीत, असाच दीसला...

सहलीबाबत मार्गदर्शन हवे आहे

लेखक सचिन७३८ यांनी रविवार, 08/11/2015 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार… आमची सहल दिनांक ०६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०१५ यादरम्यान खालील ठिकाणी जाणार आहे. १. सातारा अ. वाई * ब. महाबळेश्वर क. कासपठार २. कोल्हापूर अ. महालक्ष्मी मंदिर * ब. शाहू पॅलेस क. रंकाळा तलाव ड. ज्योतिबा ३. सिंधुदुर्ग अ. आंबोली घाट ब. सावंतवाडी * क. देवबाग बीच ड. तारकर्ली बीच इ. मालवण, सिंधुदुर्ग किल्ला ४. रत्नागिरी अ. गणपतीपुळे * ब. कर्डे बीच क. असूद-केशवराज-व्याघ्रेश्वर मंदिर ड. हर्णाई बंदर-सुवर्णदुर्ग किल्ला इ. आंजर्ले-कड्यावरचा गणपती, व्हाईट सँड बीच ई. श्रीवर्धन * ५. रायगड अ. मुरुड जंजिरा किल्ला ब.

भाव भोळा

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी रविवार, 08/11/2015 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
शकू आणि तिची आई दोघी आमच्या अपार्टमेंट मध्ये धूणंभांड्याचं काम करतात. निदान गेली दहा पंधरा वर्षं . लग्नानंतर जेमतेम दोन चार वर्षं त्यांना भोगायचं, एक दोन पोरासाठी ती बाई व्याली कि तिला टाकायचं हा भोग ज्यांच्या नशिबात,दोघीहि मायलेकी त्याच वर्गातल्या. शकूच्या आईचं जवळजवळ सगळं तर शकूचं निम्मं आयुष्य हे असं कीड्या मकोड्याचं गेलंय. पण त्यांच्या आयुष्यात एक पर्वणी आता येऊ घातलीय. दोघीनाहि आगीनगाडितुन काशीला,जायला मिळणार आहे. भूपाल काका सगळ्या झोपडपट्टीला ,त्याच्या खर्चानं काशी विश्वनाथाला नेवून आणणार आहे.ते,पण,आगीनगाडिनं. शकू तर हारखून गेली होती.

हॉप फ्रॉग २

लेखक शा वि कु यांनी रविवार, 08/11/2015 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
एका बारीक पण धारदार आवाजाने शांतता भंग पावली.तो आवाज घर्षणाने तयार झाल्यासारखा वाटत होता.कुठल्या तरी टणक वस्तुंच्या घर्षणाने.      उदाहरणार्थ दातांच्या. जणू कुणीतरी अमानवी त्वेषाने दातओठ खात होतं. तो आवाज ऐकून राजाच्या मानेवरचे केस उभे राहीले. “ तू-तू तो आवाज का काढतोयस? " राजा हॉप फ्रॉग वर खेकसला.     बुटका आता बराच सावरल्यासारखा दिसत होता . “ मी ? मी का बरं ? मी कसा..." तो राजाकडे स्थिरपणे पाहत म्हणाला. “तो आवाज बाहेरुन आल्यासारखा वाटतं होता. " एका मंत्र्याने आपले निरीक्षण नोंदवले.

अळुची भाजी खाऊन वाचलो तर…...

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 08/11/2015 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांचं नुकतंच लग्न झालं होतं.नेहमीच्या रिवाजाप्रमाणे त्यांना त्यांच्या सासरवाडील एका लग्नाच्या निमीत्तानं जेवायला बोलावलं होतं.ताट, पाट मांडून पंगत तयार झाली होती. सर्वांना आपआपल्या पाटावर बसायला आमंत्रण दिलं होतं.जांवयाचा मान म्हणून त्यांच्या ताट्पाटा सभोवती रांगोळी घालून त्याची जागा सुशोभीत केली होती.

असाहि एक श्रावण बाळ

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शनिवार, 07/11/2015 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवेशद्वारासमोरच माझा कौंटर यायचा ,त्यामुळं बँकेत येणारा प्रत्येक कस्टमर मला ओलांडूनच पुढं जायचा .ठराविक कस्टमर मात्र कितीही गर्दी असूदे माझ्याइथंच थांबायचे .अविनाश मोडक त्यापैकीच एक . तो माझ्याच वयाचा ,म्हणजे साधारण ४० च्या आसपासचा असावा .खरं म्हणजे त्याचं मुळात अंकाउंटच, नव्हतं आमच्या बँकेत ,त्याच्या वडलांचं अंकाउंट होतं. पूर्वी त्याचे वडील यायचे,आता तो येतो.

लाईन

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 07/11/2015 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
भडक मेकअप करुन ओठ लाल चुटुक चुटुक करत कमली जेव्हा रस्त्यानं ओढणी फिरवत जायची, तेव्हा पोरांच्या रसाळ नजरा कोपऱ्या कोपऱ्यातनं तिच्याकडं वळायच्या. पुढुन बारीक कापलेल्या केसांची हिप्पी स्टाईल करुन खाली मान घालुन रस्त्यानं जाणारी कमली अजिबात नखरेल वगैरे नव्हती. चांगली 'ईज्जतदार' घराण्यातली होती. पण तिला बघुन पोरांच्या नजरा चाळवायच्या. हाटेलं, पानटपऱ्या, न्हाव्या बिव्याच्या दुकानातली पोरं माना पुढं करुन चोरट्या नजरेनं ती लांब जाईस्तोर तिच्याकडं बघत राहायची. कमलीला या नजरा कधी कधी टोचायच्या, पण आतुन मात्र ती सुखावायची. आपल्या सौदर्याचा तोरा सगळ्या गावात मिरवत ती छुपा आनंद घ्यायची.

कुत्रे (निबंध)

लेखक प्यारी २ यांनी शनिवार, 07/11/2015 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
कुत्रे सगळीकडे सापडतात. ते सहसा एकेकटे येत नाहीत झुंडीने येतात .समोरच्यावर भुंकून भुंकून हैराण करतात . मग त्यांच्या कंपू प्रमुखाला हुक्की येते चावायची . मग सगळे चावू लागतात . बिचाऱ्या भक्षाचा प्रतिकार अपुरा पडतो. लचके तोडून तोडून जीव घेतात . आणि मग एकमेकांची पाठ थोपटतात . एकमेकांना चाटायला लागतात . लाळ गाळायला लागतात . गल्लीत नवीन आलेला माणूस यांचं आवडत खाद्य . यातून तावून सुलाखून निघणारा क्वचितच. बाकी बिचारे गल्ली सोडून तरी जातात किंवा खालमानेने गुपचूप राहू लागतात . गल्ली म्हणजे आपलच राज्य ही घमंड त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत असतो .

झटपट आणि सोप्पी हैद्राबादी चिकन बिर्यांनी

लेखक सत्याचे प्रयोग यांनी शनिवार, 07/11/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य
चिकन १/२ किलो , दिल्ली / बिर्यांनी राईस १/२ किलो , कांदे १/२ किलो , गोडेतेल तेल २ - ३ चमचे , जिरे २ चमचे, तेजपत्ता ३-४, लाल तिखट मसाला , चिकन बिर्यांनी मसाला २ चमचे, ( चिकन बिर्यांनी मसालाच वापरावा पुलाव मसाला किंवा फक्त बिर्यांनी मसाला नाही ) ५ स्टार फुले , ५ हिरवी इलायची , ७- ८ लवंग , दालचिनी , आले लसूण पेस्ट २ चमचे , तूप २ चमचे , १ कप दही फेटलेले , पुदीना १ वाटी चिरून , कोथींबीर १ वाटी चिरून , १/२ चमचा हळद, मीठ, कणीक किंवा अल्युमिनियम फोइल .
सुरु करा
१) १/२ किलो दिल्ली / बिर्यांनी राईस पाण्यात भिजत घाला.