Skip to main content

सहलीबाबत मार्गदर्शन हवे आहे

लेखक सचिन७३८ यांनी रविवार, 08/11/2015 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार… आमची सहल दिनांक ०६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०१५ यादरम्यान खालील ठिकाणी जाणार आहे. १. सातारा अ. वाई * ब. महाबळेश्वर क. कासपठार २. कोल्हापूर अ. महालक्ष्मी मंदिर * ब. शाहू पॅलेस क. रंकाळा तलाव ड. ज्योतिबा ३. सिंधुदुर्ग अ. आंबोली घाट ब. सावंतवाडी * क. देवबाग बीच ड. तारकर्ली बीच इ. मालवण, सिंधुदुर्ग किल्ला ४. रत्नागिरी अ. गणपतीपुळे * ब. कर्डे बीच क. असूद-केशवराज-व्याघ्रेश्वर मंदिर ड. हर्णाई बंदर-सुवर्णदुर्ग किल्ला इ. आंजर्ले-कड्यावरचा गणपती, व्हाईट सँड बीच ई. श्रीवर्धन * ५. रायगड अ. मुरुड जंजिरा किल्ला ब. रायगड किल्ला ज्याठिकाणी * अशी खूण केली आहे तिथे आम्ही रात्रमुक्कामी थांबणार आहोत. तरी निवास व भोजनाची सोय वरील ठिकाणी कोठे-कोठे होईल याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे. आम्ही एकूण ४५ मुले-मुली आहोत. कोंकणात काही ठिकाणी निवासासह घरगुती भोजनाची सोय असते असेही ऐकून आहे. आमची सहल ०६ डिसेंबर रोजी रात्री ०८.०० वाजता निघेल आणि १२ डिसेंबर रोजी सकाळी ०८.०० वाजता परत येणार आहे.

वाचने 3117
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

तुमच्याकडे अजून जवळ जवळ एक महिना आहे. या दरम्यान वेळ काढून या सगळ्या ठिकाणांना एक दोन जणांनी भेटी देवून निवासाचे आणि जेवणाचेही आरक्षण करा. तुम्ही एकाच वेळी ४५ जण जेवावयास गेल्यानंतर जर जेवणाची तयारी सुरू होणार असेल तर तुम्हाला नाष्ट्याच्या वेळी उपास, जेवणाच्या वेळी नाष्टा असे मिळेल. ४५ जण म्हणजे किमान १५० ते २०० पोळ्या बनवाव्या लागतील असा विचार करून तुमची व्यवस्था करणार्‍यालाही योग्य वेळ द्या. तसेच ४५ जण मुक्काम करणार असाल तर किमान १५ ते २० खोल्या लागतील. आयत्या वेळी इतकी सोय कोकणात होणे थोडे अवघड जाईल असे वाटत आहे. आधी आरक्षण केले तर तुम्ही थोडे तरी निर्धास्त राहू शकता. बाकी एसरावांशी सहमत. हा प्लॅन लैच महत्वाकांक्षी वाटत आहे. इतकी सगळी ठिकाणे बघणे शक्य होईल असे वाटत नाहीये. (क्षमस्व!!) (जाता जाता - इतक्या मोठ्या ग्रूपला ५ दिवस एकत्र ठेवणे हे खरोखरी कौशल्याचे काम आहे. याचे अनुभव तुम्ही परत आल्यानंतर नक्की लिहा)

In reply to by मोदक

अगदीए प्रॅक्टिकल प्रतिसाद खूप आवडला. ४५ जण हा मोठा गृप आहे. व्यावसायिक प्रवास नियोजक नसेल तर गोंधळ उडण्याचा चान्स आहे. मुले-मुली दोन्ही असल्याने प्रत्येकाच्या गरजा-समस्या वेगळ्या, एकत्र जायचे-फिरायचे तर थोडे तरी प्रॅक्टिकल असणे आवश्यक आहे. मोदक यांनी म्हटल्याप्रमाणे आता लगेचच दोन-तीन जणांनी प्रत्यक्ष जागी जाऊन आधीच मोर्चेबांधणी करणे अतिआवश्यक. राहणे व खाणे या दोन मूलभुत गोष्टींच्या जालीय माहितीवर अवलंबून राहण्यापेक्षा तिथे जाऊन प्रत्यक्ष व्यवहार करणे योग्य असेल. त्यालोकांसाठी मोठा गृप हा निश्चित व्यवसाय असल्याने चांगली सवलतही मिळू शकते.

सहा दिवसात सहा जिल्हे? ते पण मुलं- मुली असताना?! नुसता प्रवास होणार बाकी काहीही नाही... आणि ऐन वेळी पब्लिक कडून इथे जायचं राहूदे तिथे जायचं राहूदे अशा मागण्या सुरु होतील... आम्ही ५ वर्षांपूर्वी ८ते ९ दिवसात सांगली पासून सुरु करून हम्पी, बंगलोर, मैसूर, श्रीन्गेरी, हलेबिडू, बेलूर, मुरुडेश्वर, गोवा असा प्लान केला होता पण आम्ही १५ मुलं होतो. त्यामुळे रहायची आणि खाण्याची सोय कशीही करता येत होती. तरीही फारच प्रवास झाला होता! :) तुम्ही रात्री प्रवास करणार नसाल हे गृहीत धरले तर एका ठिकाणापासून दुसर्या ठिकाणी जायला लागणारा वेळ विचारात घेता अतिशय धावपळ होणार आहे असे दिसत आहे. त्या पेक्षा व्यवस्थित वेळ काढून निवांतपणे फिरण्याची मज घ्या कि!

In reply to by शब्दबम्बाळ

सहा दिवसात सहा जिल्हे? ते पण मुलं- मुली असताना?! नुसता प्रवास होणार बाकी काहीही नाही... मजेशीर प्रतिसाद पण खरं आहे...

शक्य असल्यास सध्यापैकी (उपरोक्तपैकी) फक्त तिसरा आणि चौथा या दोन दिवसांचे प्लॅन्स एकूण सर्व पाच दिवसांत विभागावेत. पहिला, दुसरा आणि पाचवा दिवस सध्या तहकूब करुन त्याच्या वेगवेगळ्या टूर बनवाव्यात अशी विनंती. ही सूचना प्रवास जास्त सोपा आणि मजेदार करेल.