Skip to main content

इशकजादे – ३

लेखक मांत्रिक यांनी मंगळवार, 24/11/2015 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकजण भराभर सॅक्स उचलून बाहेर पडायची घाई करीत होता. तो थोडासा थांबला. नकळत रितूदेखील थोडी थांबलेली आहे हे त्याच्या लक्षात आलं. आता मुद्दाम काहीतरी कारण काढून मागे थांबणं आलं. पण नाही, रितू तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर पडली. ती त्याच्यासाठी थांबलेली नव्हती. विवेक ती बाहेर पडेपर्यंत तिच्याकडे पहात होता. तिच्यामागे अजून दोन तीन मुली होत्या. एकसलग बडबड चाललेली त्यांची. काहीतरी चुकीचं घडलं आहे हे त्यांच्या कुणाच्याच लक्षात आलं नाही. पण विवेकने ते पाहिलं. त्याला ही संधी पाहिजेच होती. तो लगेच खुशीत धावला. एव्हांना त्या सर्वजणी ग्रंथालयापर्यंत पोहोचलेल्या सुद्धा होत्या.

सुधांशु नूलकर काकांसोबत ओरिगामी कट्टा- २२ नोव्हेंबर २०१५

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 24/11/2015 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
सुधांशु नूलकर काकांसोबत ओरिगामी कट्टा- २२ नोव्हेंबर २०१५ नुकताच सुधांशु नूलकर काकांसोबत ओरीगामी कट्टा पार पडला. तेव्हा काढलेली काही प्रकाशचित्रे येथे मिपाकरांसोबत शेयर करीत आहे. तशी कट्ट्याला चर्चा बरीच झाली पण सध्या कसें आहें कीं संपादक विश्रांती घेत असल्याने , उगाच काही वाद उद्भवु नये अन आमचा आयडी ( ह्या कारणाने ) संपादित होवु नये म्हणुन कट्ट्याचा वृत्तांत लिहिण्याचा मोह आवरत आहे. मिपा धोरणानुसार चारोळी धागे उडवले जातात तसे होवु नये म्हणुन उगाचच वरील ३ आणि हे वाक्य खरडले आहे , एरव्ही हा धागा ह्त्म्ल वापरुन अन एक्सेलमधे प्रोग्राम लिहुन लिहिण्यात आलेला आहे. प्रचि क्

कॅलरी

लेखक दमामि यांनी मंगळवार, 24/11/2015 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना गॅलरी एक हात ढेरीवर ठेऊन, अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन, मी उभा आहे, गॅलरीत! तुझ्या झुलत्या एअरवॅाकर बरोबर पाय दमून गेले फार! इथेच बसून नाही का लावत तुझ्या ट्रेडमिलचा पट्टा पायाला! नाही.....बारीक नव्हतोच कधी गुटगुटीत होतो खूप म्हणून कॅलरीज नाही उतरत आजही! मला नाही जमत पळायला, त्या कॅलरीज जाळायला! इतकं सारं पोहूनही स्लिमबिम होणं नाही जमत मला ! पण....तू तिथे भजी बनवलीस कि इथे माझा डाएटमोड होतो एवढेच बारीक जाणवते! अन, अवेळी उठून मी एक हात ढेरीवर ठेऊन उभा राहतो गॅलरीत तू हाक मारेपर्यंत.....!
काव्यरस

बिहारचा प्रवास उलट ?

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 24/11/2015 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
बिहार विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. नीतिशकुमार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणखी काही काळ सुरू राहणार आहे. त्यास कोणाची हरकत नसावी कारण नीतिश हे अत्यंत मवाळ आणि नेमस्त नेते आहेत.बिहारचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा जास्त करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली होती. मात्र चेहऱ्यासाठी बिहारी जनतेने मतांचे भरघोस दान केले त्या नीतिश यांचा चेहरा गेल्या काही दिवसांत भाजपच्या कमळापेक्षाही जास्त कोमेजलेला दिसतोय.

महापौर बंगल्याचे सेनेला चॉकलेट !!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी मंगळवार, 24/11/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
सरता सप्ताह दीपोत्सवाचा होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. जरी बिहारमध्ये भाजपाचा सपशेल पराभव झालेला असला तरी कल्याण डोबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या जागा मिळवल्या असल्यामुळे ‘वर्षा’वरचे वातावरण बरे होते. शिवाय तिकडे कोल्हापुरातही ताराराणी आघाडी समवेत भाजपाचा महापौर बसू शकतो अशी एक शक्यता सुरुवातीला वाटू लागली होती. त्यामुळे त्याही आघाडीवर भाजपात वातावरण आनंदाचे होते. असा या साऱ्या आनंदमयी वातावरणात त्या आधीच्या पंधरा वीस दिवसांचे सारे राजकीय कवित्व विसरून जाण्याचेचे संकेत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनी दिलेच होते.

ढकलपत्रे....

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 24/11/2015 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
ढकलपत्रे करा, पण केवळ ढकलपत्रेच वाहिली तर माथाडी कामगार बनाल. स्वत:चे काही लिहा रे please ! ईश्वराने लिहिण्याची शक्ती फक्त माणसालाच दिली आहे. ती लोप होऊ देऊ नका. मिसळपाव चा पुर्ण फायदा घ्या आणि लिहिते व्हा ! ------------------ कोणीही स्वत:चे लिहू शकतो.. त्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय कसे होणार? ------------ आज असेच आणखी एक ढकलपत्र समोर आले, त्याला हे माझे उत्तर--> ..................................... काहीच बदललेले नाही. बदलली आहे ती फक्त ऑफीसची जागा. पूर्वी ऑफीस सिमेंटच्या भिंतीत होते, आता आभासी आहे. त्यामुळे आता देखील, 'Window' म्हणजे स्क्रीन वरील एक 'खिडकी' च आहे.

जंटलमन्स गेम - ४ - फायर इन बॅबिलॉन

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 24/11/2015 05:54 या दिवशी प्रकाशित केले.
१९७६ चा फेब्रुवारी महिना... गयानामधल्या आपल्या घरी बसून तो विचारात बुडून गेला होता.. नुकताच अत्यंत दारूण पराभव त्याच्या पदरी पडला होता! चाणाक्षपणे लावण्यात आलेल्या एका मोठ्या सापळ्यात सापडल्याने अक्षरशः वाताहात झाली होती.. काय करावं? या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं? आपल्या पराभवाला नेमकं कोण कारणीभूत ठरलं असावं? आपले डावपेच चुकीचे ठरले! त्यांनी बरोबर आपली शिकार साधली! एकदा! फक्तं एकदाच! पुन्हा कधीही अशी संधीही कोणाला द्यायची नाही! ज्या तंत्राचा वापर करुन त्यांनी आपला पराभव केला तेच तंत्रं आपण वापरलं तर कोणालाच आपल्यापुढे उभं राहणं जमणार नाही! येस!

दिवाळी कुणाची?

लेखक आनंद कांबीकर यांनी सोमवार, 23/11/2015 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
"ये आये, दिवाळी कधीच्याला हाय गं!" "हाय उंद्याच्याला" "आये, मंग तू दाळीचे लाडु कव्हा करणार हैस" "करतीना उंद्याच्याला" "आये, त्वा रोजच् उंदया उंदया म्हंतीस" "मंग जाय रासन आलं का नय ते यी बघुन. रासनात दाळ येणार हाय " __________________________________________________________________________ रातपासुन पांधीत दबा धरून बसलेले दोन ट्रक नानासाहेबाच्या मळयाकड़े निघाले. त्यातला एक ट्रक अजुन तसाच होता, अगदी सीलबंद. दुसऱ्या ट्रक मधली अर्धी निम्मी पोती पांदितच काढुन ट्रॅक्टरणे गावांत पाठवली. ट्रॅक्टर राषन दुकानसमोर येताच, राषन आल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. थांबलेल्या दिवाळीत उत्साह संचारला.

अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज काय बरे खावे - सामिष का निरामिष? का पुठ्ठा किंवा गवतच बरे ?

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 23/11/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 शीर्षकच गोन्धळवून टाकणारे वाटते ना ?

आठवणी अज्ञातांच्या

लेखक निशदे यांनी सोमवार, 23/11/2015 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात किती लोकांना भेटतो आपण? जन्माला आल्यापासून सुरू झालेली भेटीगाठींची शृंखला अगदी मरणापर्यंत चालू असते. यातले काही लोक अगदी चटकन आयुष्याचा एक भागच होऊन जातात तर काही तितक्याच सहजपणे विस्मरणात जातात. प्रत्येकाच्या स्वभावाची, विचारांची आणि सहवासाची वेगळी छाप आपल्या मनावर पडून जाते. अशा सुहृदांच्या सहवासात गेलेले अनेक क्षण नंतरच्या आयुष्यात आठवणींच्या रुपाने आपल्याला आनंदी करत असतात, पण इतक्या सहजतेने जगू देईल ते मन कसले!!! ज्ञात-अज्ञाताच्या सीमारेषेला सहज पार करून मन एखाद्या सुप्त आठवणीने अशी हुरहुर लावते की काही केल्या मन शांत होत नाही.