योद्धा
दुःख माझे मी कसे,सांभाळीले ठाऊक नाही,
घाव जे शिरी सोसले,उरलो कसा ठाऊक नाही.
.
वेदना झाल्या तरीही,मूक मी का राहिलो,
जखमा उरी घेऊनी,फिरलो कसा ठाऊक नाही.
.
हाक ना आली कुठूनी,साद ही ना पोचली,
अंधारलेल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही.
.
सुख झाले पाहुणा अन दुःख झाले सोबती,
जिंकतानाच नेमके,हरलो कसा ठाऊक नाही.
.
सावलीतही जाणवे ते,ऊन तापलेले किती,
श्वासातल्या धाग्यातूनी,विरलो कसा ठाऊक नाही.
.
कटिबद्ध होती ती,विपुल शस्त्रसंभार होता
नि:शस्त्र मी,अगतीक मी,कसा पुरलो ठाऊक नाही
- कवी योगेश
काव्यरस
असाही एक वेडपट दिवस.
असाही एक वेडपट दिवस.
आज रविवार होता. गेले दहा पंधरा दिवस बायको माझ्या बरोबर अजिबात भांडली नव्हती. माझ्या माहेरच्या मंडळींची तिला एकदाही आठवण झाली नव्हती. आमच्या कुटुंबाच्या सुखाच्या घडाळ्याचे तीनही काटे म्हणजे तास मिनिट आणि सेकंद काटे घडाळ्याप्रमाणे क्लॉकवाईज फिरत होते. एव्हढेच नव्हे तर तासकाटा एका तासाला एक तास, मिनिटकाट एका मिनिटाला एक मिनिट आणि छोटा सेकंद काटा एका सेकंदाला एक सेकंद ह्या गतीने फिरत होते. नाहीतर इतर वेळी तास काटा आणि मिनिट काटा उलट सुलट आणि वाटेल त्या गतीने फिरत असतात. असो असा योग क्वचितच येणार.
(वास्तव किचन)
प्रेरणा - सर्वज्ञात
चालु होते माझे
रोजचेच काम
रोजचाच घाम
गॅसपाशी
एकीकडे होते
तांदुळ शिजत
दुधही तापत
दुजीकडे
लाटून कणिक
पोळ्या मऊसुत
गंध सुगंधित
खरपुस
इतक्यात येई
सख्याची ती साद
भलतीच याद
भलत्या वेळी
काय करावे ते
सुचेना काहीच
भर दुपारीच
चांदणे ते
मोहरले मीही
काम बंद केले
हात ही पुसले
पदराला
जवळ येऊनी
सख्या साजणाने
ओढले हाताने
अलगद
दुपारची वेळ
करुया साजरी
कशाला लाजरी
होत आहेस
इतक्यात काय
झाले ते कळेना
आशंकीत मना
भिती दाटे
चल हो तु पुढे
येते मी मागुनी
थोडे आवरुनी
पटकन
वेळ नको लाऊ
सखा आर्जवित
गेला बिछान्यात
आतुरतेने
मनीची भिती
खरी ठरली ती
आपदा भलती
भलत्या वेळी
शय्यागृही जात
स
काव्यरस
मिसळपाव