Skip to main content

कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन.

लेखक योगेश आलेकरी यांनी शनिवार, 05/12/2015 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन. कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर येतात उंचच माडाची बने, दूरवर पासारलेला अथांग समुद्र, शुभ्र किनारे, चौपाट्या,मग त्यासोबत नितांत सुंदर अशा किनार्यांवर पर्यटकांची रेलचेल, विक्रेत्यांची भाऊगर्दी अगदी नेहमीसारखाच. मुंबईतील धावपळीतून कुठेतरी दोन दिवस शांततेसाठी आपण नेहमीच कोकणाला पसंती देतो.

आली लहर केला कहर.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 05/12/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
आली लहर केला कहर....... मित्रासाठी आमची एक कविता ======= आली लहर केला कहर होऊदे खर्च कशाला फिकर? चंद्रा वाणी मुखडा काळजाचा तुकडा ज्वानीचा कहर इष्काचा बहर नौ वारी साडी तंगशी चोळी नजरेत धार काळजावर वार खुदकन हसली काळजाला डसली जिवाला घोर झोपेच खोबरं धरला हात घातली मागणी खुदकन हसली शुक्राची चांदनी आई सरपंच. बाप आमदार आली लहर केला कहर होऊदे खर्च कशाला फिकर? अविनाश

गुलाम अली साहब

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 05/12/2015 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली.

लपंडाव

लेखक माहीराज यांनी शनिवार, 05/12/2015 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या जिवनी कसला हा लपंडाव कधी सुख सारे कधी दु:खाचे हे डाव तुझे असणे नसणे ही वेड लावी मनाला तुझ्या नसण्यात ही तुझे भास जिवाला हे असले कसले धुके दाटले या मनी सरले दिवस सारे उरल्या आठवणी सारे असुन ही सलतो प्रीये तुझा अभाव असा माझ्या जिवनी कसला हा लपंडाव.. श्वास जरी हा माझा त्यात मी न कधी दिसलेला जीव हा माझा सारा फक्त तुझ्यातच गुंतलेला मन फिरते तुझ्याच मागे कसे सांगांवे कुणाला विसरून जावे म्हणता कसे आवरावे मनाला धडपडते अन् सावरते साराच तुझा प्रभाव असा माझ्या जिवनी कसला हा लपंडाव..
काव्यरस

सुटलेल्या पोटाची कहाणी -२

लेखक Anand More यांनी शनिवार, 05/12/2015 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ क्लासला दिवाळीची सुट्टी सलग पाच दिवस दिली होती. घरी निवांत होतो. तीन चार नवीन पुस्तकं आणून ठेवली होती. त्यामुळे खुशीत होतो. दिवाळीचा फराळ करत पुस्तक वाचत बसलो होतो. ही शेजारी येउन बसली आणि अगदी हलक्या सुरात लाडीगोडीने बोलू लागली.

विश्वाचे आर्त - भाग २ - नासदीय सूक्त

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 04/12/2015 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - काळाचा आवाका ऋग्वेद १०.१२९ । ऋषिः परमेष्ठी प्रजापतिः । छन्दः त्रिष्टुप् । देवता भाववृत्तम् । नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् । किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥ न मृ॒त्युरा॑सीद॒मृतं॒ न तर्हि॒ न रात्र्या॒ अह्न॑ आसीत्प्रके॒तः । आनी॑दवा॒तं स्व॒धया॒ तदेकं॒ तस्मा॑द्धा॒न्यन्न प॒रः किं च॒नास॑ ॥ २ ॥ सृष्टीच्या सुरूवातीला काहीच नव्हतं. असणं नव्हतं किंवा नसणंही. धुळीची जमीन नव्हती, की वर आकाश नव्हतं. काही झाकलेलं नव्हतं, की लपलेलं नव्हतं.

सुटलेल्या पोटाची कहाणी -१

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 04/12/2015 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही सगळी कहाणी सुरु झाली दिवाळी पासून . मला कल्पनाच नव्हती की मी या कहाणीचा हिरो आहे म्हणून. म्हणून आधी सगळे अनुभव टिपून ठेवले नव्हते. त्यामुळे आता जसे तुकड्या तुकड्याने आठवतायत तसे लिहितो. जर दोन तुकड्या मधलं अंतर जास्त वाटलं तर खुशाल समजा की चाळीशीच्या उंबरठ्यावर असल्याने मध्ये मध्ये येणाऱ्या विरक्तीच्या झटक्याने, मी या सर्व उपद्व्यापातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असीन. --------------- हा तर मी काय म्हणत होतो. २०१५ ची दिवाळी आली. ऑफिस मधल्या मुलींनी ऑफिस सजवायचा घाट घातला. त्यांचा उत्साह पाहून मी देखील हो म्हटलं. पोरींनी छान सजवलं ऑफिस. मी पण खूष झालो.

आत्मनिवेदन

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शुक्रवार, 04/12/2015 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
संमोहित मनाच्या दुख-या गाभा-याला स्पर्श करून सांगतो हे आत्मनिवेदन सत्य आहे ! पहाटे उमलुन पहिल्या प्रकाश किरणात कोमेजणा-या बकुळफुलांच्या संचिताच्या शापासारखं हे जगणं अन् क्लेश नवसाचं रूपं देवीच्या उंबरठ्यावर ठोकावं असं पूर्व परंपरेने चालत आलेलं ! संध्याकाळी मी जेव्हा डोळ्यावाटे रक्त वाहतो तेव्हा तुझे परसदार लालभडक होते, पसरलेले लाल अन् येणारे कृष्णमय ह्याच्या संगमाने जे काही क्षिताजावर उमटते त्याला शब्द नसतात त्याच अवस्थेत मी असतो ह्यासाठी पाहिजेतर मी माझ्या पहिल्या कवितेच्या गर्भपाताची शपथ घेतो ! शेवरीच्या कापसात विधवेची रात्र गुंडाळून विरह आग आग होऊन रात्र जाळतो मग झोप परागंदा होते अ

मनाची नाती

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 04/12/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना आई - वडील म्हणुन प्रत्येक मुला मुलीला त्यांचे आई-वडील हे बेस्टच वाटतात. मग ते कसेही असो, दुसर्‍यांसाठी दुष्ट , वाईट वागणारे अगदी कसेही. स्वतःच्या मुलांसाठी बाबा कदाचित कठोर वागत असल्याने ते जरी बर्‍याचदा बेस्ट वाटत नसले तरीही त्यांची आई ही एक आदर्श बाईच असते. पण आपले आई-वडील सोडुन आपण आणखीही कुणाच्या जवळ असतो जसे मावशी - मावशीचे मिस्टर, मामा - मामी , काका - काकु, आत्या - आत्याचे मिस्टर.