Skip to main content

कार्टी काळजात घुसली

लेखक समीर_happy go lucky यांनी रविवार, 17/01/2016 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
कार्टी काळजात घुसली (मराठी नाटक) प्रशांत दामले fan फाउंडेशन या नावाने निर्मात्या सौ गौरी प्रशांत दामले या नवीन नाटक घेऊन आल्या असून एक उत्तम प्रयत्न असे या नाटकाचे वर्णन करता येईल.वसंत सबनीस हे या नाटकाचे लेखक असून मंगेश कदम यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उचललेली आहे.होणार सून मधली जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान या नाटकात मुख्य स्त्री भूमिकेत असून नाटक म्हणजे एखाद्या मालिकेसारख (वेळकाढू) प्रकरण नसून एक लाइव्ह अभिनय प्रकरण आहे हे समजून-उमजून तिने प्रशांतजींना समर्थपणे साथ दिलेली आहे. कहाणी: कार्टी काळजात घुसली म्हणजे बापापासून दुरावलेल्या एका मुलीची कथा जी आपल्या आई वडिलांना एकत्र आणण्यासाठी प्रय

गाजराचा शिरा

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 17/01/2016 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/34421 कीस बाप्या कीस, गाजर कीस साहित्य: गाजर ४ किलो, साखर ३-४ वाटी, दूध १ किलो (अमूल गोल्ड), खोवा (२५० ग्राम), तूप एक वाटी, बडीशेप १०-१२, जायफळ १/२. व बदाम १५-२०. प्रारंभिक तैयारी: सौ. ने आधी बादाम बारीक लांब कापून घेतले. २ चमचे साखर आणि बडीशेप सोलून व जायफळ मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घेतले. संध्याकाळी स्वैपाक व जेवण झाल्यावर सुमार रात्री ८.४५ झाल्यावर पितळेच्या एका जाड भांड्यात गाजराचा कीस दूध घालून उकळायला ठेवले.

खिशात किती नोटा आहेत जमा ?

लेखक मयुरMK यांनी रविवार, 17/01/2016 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिया, मी तर तुझी प्रियतमा ! ( खिशात किती नोटा आहेत जमा? ) प्राणेश्वरा,जीवलगा! सख्या सजना ! तुझिया संगती रे आज मज ना पाहावयाचा आहे ( फुकटात ) सिनेमा प्रिया मी तुझीच प्रियतमा ! ( खिशात किती नोटा आहेत जमा? ) ( भुलते हे जन पैसा पाहुनी असेल 'मनी' तरच मिळेल 'हनी' पैशाविना मोल ना तव प्रेमा ) प्रिया मीच तुझी प्रियतमा ! ( खिशात किती नोटा आहेत जमा? ) पाहू दे रे मनाची दिलदारी नसेल 'बैलेंस' कर उसनवारी तुझिया प्रेमाची होईल खातरजमा प्रिया मीच ना तुझी प्रियतमा ? ( खिशात किती नोटा आहेत जमा?
काव्यरस

थँक यू मिस्टर ड्रॅगन – 3

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 17/01/2016 09:56 या दिवशी प्रकाशित केले.

थँक यू मिस्टर ड्रॅगन – ३

1 पाकच्या मनात खदखद आहे ती 1971च्या युद्धातील लाजीरवाण्या पराभवाची. हिंदुस्थानने ना केवळ पाकला पराभूत करत बांगलादेशची निर्मिती केली, तर 90 हजार पाकी सैनिकांची युद्धकैदी म्हणून पकड करून, त्यांना पाकच्या हवाली केले. म्हणूनच काश्मीरला हिंदुस्थानपासून तोडण्यासाठी आजपर्यंत पाकने आपली सारी शक्ती पणाला लावली.

पाऊस कालचा

लेखक gsjendra यांनी शनिवार, 16/01/2016 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊलवाटा भरून टाकणारा पाऊस घामाला पुरून टाकणारा पाऊस अंगणात थूई थूई नाचणारा पाऊस पत्र्याचे पन्हाळे भरून वाहणारा पाऊस मातीला गंध देणारा पाऊस सडकेला नवं करणारा पाऊस खडकाला ओलं करणारा पाऊस बेडकाला बोलतं करणारा पाऊस डबक्यांना,खड्ड्यांना भरणारा पाऊस जनावरांच्या अंगावरून ओघळणारा पाऊस गुराख्याला चिंब भिजवणारा पाऊस खुरपं जागीच टाकाय लावणारा पाऊस उबेला बसायला लावणारा पाऊस झाडांना न्हाऊ घालणारा पाऊस ताली कट्ट्यांनी तुंबणारा पाऊस वावरात नागवं नाचणारा पाऊस
काव्यरस

आरक्षणाची गरज

लेखक अन्नू यांनी शनिवार, 16/01/2016 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
आत्तापर्यंत जितक्या पण चर्चा झाल्या किंवा आरक्षणाचा विषय निघाला तर त्यात ७५% लोक आरक्षण बंद झाले पाहीजे किंवा आर्थिक आधारावरच आरक्षण झाले पाहिजे असा सरळ-सरळ मुद्दा मांडताना दिसतात! त्यात ९९% हे उच्च जातीतले (म्हणजेच ओपन कॅटेगरीतले) असतात. तर उरलेले इतर जातीतले असतात. दुर्दैवाची गोष्ट ही कि काही सधन घरातले पण त्याच जातीत असणारे लोकही हाच मुद्दा अगदी ठामपणे मांडताना दिसतात! बरोबर आहे त्यांचे- कशाला हवे आरक्षण? काय साध्य होतं आरक्षणाने? मीही या गोष्टीवर खुप विचार केला. कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी?

मन्या आणि डावक्या

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 16/01/2016 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
मन्या आणि डावक्या ============== मन्या आणि डावक्या दोघं एकाच शाळेमध्ये , एकाच इयत्तेत शिकत होते . दोघांचे वर्ग तेवढे वेगळे होते . शाळेला जाण्या येण्याच्या बसमध्ये हे दोघे कायम एकत्र असत . त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती . तसे बघायला गेले तर डावक्याचे खरे नाव "रवीकिरण" असे होते . पण त्याच्या वर्गामध्ये तो एकटाच डावखुरा होता . त्यामुळे वर्गातील इतर मुलांनी त्याचे नाव "डावरया" पाडले होते . तेच पुढे बदलत बदलत "डावक्या" असे झाले होते . आज मधली सुट्टी संपल्यानंतर मन्याच्या वर्गात गणिताचा तास होता . सरांनी काही गणिते सगळ्या मुलांना सोडवायला दिली होती .

देव अन माणूस

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 16/01/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
(महत्वाची सूचना - 'देवांची घऱ' म्हणजे - मंदीर , मशिदी , चर्च अन अजून धर्मानुसार वेगवेगळे ) मानवी मन हे खूप घाबरट आहे . त्याला कशाची ना कशाची भीती असतेच . नोकरी , धंदा , घर , संसार ह्या पैकी कशाच्या ना कश्याच्या काळजीने मन कायम चिंतेत असते . - ह्या मानसिक भीतीला घालवण्यासाठी 'देवांचा' आधार आहे . देव ही संकल्पना प्रत्येक धर्मात आहे . हिंदूत ती कृष्ण / शिव , ख्रीशानामध्ये virgin मेरी / येशु , मुस्लिम मध्ये मोहम्मद , बौद्ध मध्ये बुद्ध आणी असच पुढे !

चिंगी

लेखक कविता१९७८ यांनी शनिवार, 16/01/2016 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी नाही जाणार शाळेत......... नाही नाही म्हणजे नाही, काय ते आपलं सारखं अभ्यास करायचं, दिवस भर त्या शाळेत कोंडुन घ्यायचं ते? कशासाठी गं आई. तुम्ही जाता का? इथे मस्त मज्जा करता घरात बसुन, टी.वी. काय बघता, गप्पा काय मारता सगळे आणि मला तिथे शाळेत डांबुन ठेवता. एक तर रोजची कटकट ती सक्काळी लवकर उठुन शाळेत जा आणि मग दुपारी येउन ट्युशनला जा मग तिथनं येउन पुन्हा कराटे क्लासेस, अबॅकस क्लास मग घरी येउन अभ्यास. पुर्ण दिवस हेच चालु असतं, मी थकते गं आई. कीती तो अभ्यास करायचा. मला नाही गं आवडत अबॅकस, इथे शाळेत गणितात कशीबशी पास होते मी आणि तुझं आपलं काय मला अबॅकस शिकवायचं वेड देवाला माहीत.

शोध राजीव हत्येचा भाग-२

लेखक गुल्लू दादा यांनी शनिवार, 16/01/2016 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
21 मे 1991 रात्री 10.30 वाजता दिल्ली पोलिस मुख्यालयातील फोन खणाणला. त्याची घंटा नेहमीपेक्षा बेसुर वाजत होती. एखाद्या विदारक घटनेची चाहुलच जणू ती. शिपायाने फोन उचलताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली, हात पाय गारठले, त्याच्या चेहऱ्याचा नूरच पालटला. मजकूर होता 10 मिनिटांपूर्वी झालेली राजीव हत्या. घटना वाऱ्यासारखी देशभर पसरली. कोणाचाही या घटनेवर विश्वास बसत नव्हता. अजुन कोणत्याही प्रसार माध्यमातून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. तरीसुद्धा देशात शोकाकूल वातावरण तयार झाले होते.