Skip to main content

भोजन : रसपरिपोष आणि उत्सव !

लेखक विवेक ठाकूर यांनी शुक्रवार, 12/02/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
१. देहभार भोजन हा देहभाराशी कमालीचा निगडीत पैलू आहे. त्या नित्यक्रमाचा उत्सव कसा करावा, याविषयी लेखमालेतला हा दुसरा लेख सादर करत आहे. आहार, विहार, निद्रा, उत्सर्ग आणि प्रणय हे निसर्गानं सर्वांना बहाल केलेले पाच आनंद आहेत. नैसर्गिक याचा अर्थ, ते मिळवायला कोणत्याही शिक्षणाची किंवा कौशल्याची गरज नाही. ते आपल्याला जन्मतःच प्राप्त आहेत आणि सदैव उपलब्ध आहेत. हे सर्व आनंद एकमेकांशी निगडित आहेत. विहारानं शरीर दमलं नाही तर आहाराचा आनंद मिळणार नाही. मनसोक्त विहार आणि तृप्त करणारा आहार यात निद्रेचं सौख्य लपलंय.

मुळ्याचे मुठीया

लेखक अनन्न्या यांनी शुक्रवार, 12/02/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
सानिकाच्या दुधीच्या मुठीयाच्या कृतीप्रमाणे केलेली पाकृ. साहित्य: दोन वाट्या मुळ्याचा पाला बारीक चिरून दीड वाटी कणिक एक वाटी रवा एक वाटी बेसन एक टीस्पून धने पूड एक टीस्पून जीरे पूड एक टेस्पून आलेलसूण पेस्ट अर्धा टीस्पून मिरची पेस्ट ( तिखट्पणानुसार कमी जास्त) एक टीस्पून आमचूर पाव टी स्पून खायचा सोडा मीठ चवीनुसार अर्धा टीस्पून मोहरी, एक टीस्पून पांढरे तीळ, चिमुट्भर हिंग अर्धी वाटी तेल बारीक चेरलेली कोथिंबीर, ओले खोबरे (ऐच्छीक) कृती: एक चमचाभर तेल कढईत घेऊन मुळ्याचा बारीक चिरलेला पाला परतून घ्यावा.

लदाख सायकल ने : ससपोल ते फोतूला (भाग १४)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी शुक्रवार, 12/02/2016 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा ससपोलला पोहोचलो तेव्हा मी ६२ किलोमीटर सायकल चालवली होती. खूप थकलो होतो. टैण्ट लावायचे अजिबात मन नव्हते. ससपोल मध्ये घुसल्यावर एक गेस्ट हाउस दिसलं. भाडे पांचशे रुपये. मी मोलभाव केलं तर शंभर रुपये खाली आला. चारशे रुपये. घरात दोनच व्यक्ती होत्या. दोन्ही पण महिला. एक आई आणि तिची मुलगी. मी जेवणाचे विचारले तर त्यांच्या बरोबरच माझे जेवण बनवले. भात आणि भाजी. ससपोल सिन्धु नदीच्या किनारी आहे आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध गोम्पा अल्ची आहे. इथून अल्ची गोम्पा दिसतो. पण गेस्ट हाउस मधून दिसत नव्हता.

राशोमोन (भाग - १) प्रास्ताविक

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 12/02/2016 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
ही लेखमाला वाटली, तरी प्रत्यक्षात ३ आणि ४ ऑक्टोबर २०१५ रोजी मंदार काळे ऊर्फ रमताराम आणि माझी फेसबुकवर जे साद प्रतिसाद झाले त्यांची तीन भागातील मालिका आहे. यातील संदर्भ समजून घ्यायचा असेल तर रमतारामांची मिपावर पूर्वी प्रसिद्ध झालेली राशोमोनवरची जंगलवाटांवरचे कवडसे ही आठ भागांची लेखमाला वाचायला हवी. संदर्भ सोडून वाचल्यास कदाचित फक्त पहिला भाग थोडा कठीण जाईल पण किंचित प्रयत्नाने दुसरा आणि तिसरा भाग मात्र समजू शकेल.

दुनियादारी....

लेखक पिके से पिके तक.. यांनी शुक्रवार, 12/02/2016 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
ना शाळेत शिकवली, ना कोलेजात शिकवली, ही तर दुनियादारी आहे, आम्हाला या दुनियेनी शिकवली.... वाटेत होता वाटसरू , म्हणालो मदत तुम्हा काय करू, ऐकवले प्रवचन म्हणे इथे तिथे तोंड नको मारू, दोस्त होता पुढे , आनंद होता मला, दुनियादारी म्हणते तू मागे तर तो पुढे कसा काय गेला, ती पण गेली सोडून वाटेत मला अर्ध्यावरती, म्हणे दुनियादारी शिक, तू तर आहे फारच सरळ सोबती, मग काय किताब होती मोठी , दुनियादारी शिकत गेलो, कधी याचे तर कधी त्याचे पाय ओढत गेलो, वाईट नव्हतो कधीच, खूप पहिली होती आम्ही दुनियादारी बस कळली आम्हास जेव्हा संपली होती आमच्यासाठी दुनिया सारी..........
काव्यरस

सेपकू भाग - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/02/2016 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
अस्वीकरण : या कथेमधे पुढे जे सेपकूचे वर्णन आले आहे ते सर्वांनाच भावेल असे नाही. किंबहुना कमकुवत मनाच्या वाचकांनी ते वाचू नये अथवा वाचल्यास आपल्या जबाबदारीवर वाचावे. या कथेच्या मूळ लेखकाने जपानमधील मला माहीत असलेली शेवटची सेपकू केली. त्याने हे वर्णन केलेले असल्यामुळे ते वास्तववादी असण्याची शक्यता जास्त आहे. या लेखकाच्या तीन कथा मी लिहिणार आहे. त्यातील दुसरी त्याचीच कथा असेल.

कथा ( भाग १ )

लेखक अँन्ड्रोमेडा यांनी शुक्रवार, 12/02/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वरंग : तो झपाझप पावलं उचलत होता . लांबचा पल्ला गाठायचा होता त्याला .वाटेत होत निबिड रान . दिवस मावळायच्या आत त्याला ते रान पार करायचं होत . रानातून जाताना त्याचा जीव कातावून गेला होता . या भितीच्या धक्क्यात त्याच्या पायाची गती वाढली होती व तो अधिक त्वरेनं पावलं उचलत होता . रान लवकर संपाव असं त्याला वाटत होत . पण रस्ता काही संपेना.रान एव्हाना पार व्हायला हवं होत . पण अजून काही तसं झालं नहूत. तो चालतच होता . हळूहळू दिवस मावळायला लागला . आता त्याच्या ध्यानात आलं होतं की कुठंतरी आपण चुकीची पायवाट पकडली आणि आता आपण या जंगलात कुठे आहोत हेच त्याला उमजेनासं झालं होतं .

सेपकू भाग -१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 11/02/2016 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
सेपकू : अस्वीकरण : या कथेमधे पुढे जे सेपकूचे वर्णन आले आहे ते सर्वांनाच भावेल असे नाही. किंबहुना कमकुवत मनाच्या वाचकांनी ते वाचू नये अथवा वाचल्यास आपल्या जबाबदारीवर वाचावे. या कथेच्या मूळ लेखकाने जपानमधील मला माहीत असलेली शेवटची सेपकू केली. त्याने हे वर्णन केलेले असल्यामुळे ते वास्तववादी असण्याची शक्यता जास्त आहे. या लेखकाच्या तीन कथा मी लिहिणार आहे. त्यातील दुसरी त्याचीच कथा असेल.

शब्दकोश

लेखक सुचिकांत यांनी गुरुवार, 11/02/2016 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीसाठीचा एक सुंदर उपक्रम. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल..... शब्दकोश प्रकल्प, इ. नववी :- _______________________ अक्षरनंदन शाळेतल्या इ. नववीच्या मुलांचा (मुली आणि मुलगे यांना सयुक्तपणे उद्देशून) ‘शब्दकोश प्रकल्प’ घेतला. वर्गातल्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेपेक्षा अशा प्रकल्प /उपक्रमातून खरं शिक्षण होत असतं; हे जितकं खरं तितकंच शिक्षकालाही आपलं ज्ञान/आपलं अध्यापन/आपली अध्यापनाची दिशा तपासण्याची संधी यांतून मिळत असते. उपक्रमांतून मुलं जितकी जास्त अभिव्यक्त होत असतात तितकी परीक्षातंत्रातून क्वचितच!

मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य

लेखक जेपी यांनी गुरुवार, 11/02/2016 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही. पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये" प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.