लसणाचे आक्षे:-
लागणारे साहित्य:- तांदूळ, लसणाच्या पाती, जीरे, हिरवी मिर्ची, टोमेटो, कोथिंबीर, चवीपुरते मीठ
कृति:-
पावशेर तांदूळ 3-4 तास पाण्यात भिजवायचे.
मुठीत येतील एवढ्या छान कोवळ्या, लांबसडक लसणाच्या पाती घ्याव्या. बारीक चिरून साधारण 20-30 मिनिटे पाण्यात भिजवावे.
आता भिजलेले तांदूळ, लसणाची चिरलेली पात, थोड़ी कोथिंबीर, हिरवी मिर्ची, एक टोमेटो, आणि चमचाभर जीरे, चवीपुरते मीठ हे सगळे एकत्र करायचे आणि मिक्सरमध्ये थोड़े पाणी टाकून वाटून एकजीव करायचे. बैटर साधारण डोशाच्या बैटरएवढे गाढ असावे.
तव्यावर थोड़े तेल शिंपडून एकसर पसरावे. त्यावर बैटर गोल पसरावे.