मदत हवी आहे.
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो.
मि. पा. वर नवीन आहे आणि पहिलच लेखन मदत करण्याबाबत करते आहे.
मुंबईहून महाबळेश्वर पिकनिक (विरंगुळा) काढायची आहे. तर तसा प्लान बनवायला मदत हवी आहे. तिथे बघण्यासारखी स्थळे काय आहेत.(२८ ला निघुन २ मार्चला परत यायचय) जेजुरी पहायचीही फार इच्छा आहे.
कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
(कसे जाणे जास्त सोईस्कर असेल? कुठे उतरावे? जवळपासची चांगली हॉटेल्स आणि चांगल जेवण.)
'भुकमय बडबड'
२वर्ष सहन केलं... शेवयांचा उपमा आणि दूधी/पडवळ ह्यासारख्या पाइपसदृश भाज्या!
२००५-०७च्या दरम्यान, ब्राम्हण वाडीत राहायचो तेव्हा एकांच्या कडे डबा लावलेला, लहानपणी भाजी आवडली नाही की घासाबरोबर गटागटा पाणी प्यायचो... पण हा डबा खाताना ते करायचं बाळबोध डेरिंग व्हायचं नाही. कधी कधी इतका राग यायचा, की डबा अक्खा आमच्या मागच्या खिडकीतून स्वाह: किंवा पिशवीतुन फलाटावरच्या गरजू लोकांना, तो खिडकीचा मूर्खपणा १-२दाच केलेला.. पण ठीके! राग येतोच, व्यक्त करायची पद्धत चुकली! असो... माझा डब्यात बहुदा ह्या पाइपयुक्त भाज्या ५०%असायच्या पण माझा रुमपार्टनर नीलमच्या बाबतीत ते पर्सेंटेज ८०इतकं होतं!
तू आणि मी
मित्रांनो, खूप दिवस झाले मनात काही तरी घोळत होते, पण सांगड बसत नव्हती... आणि अशातच 'व्हॅलेन्टाईन डे'ला कुठून तरी प्रेरणा मिळाली आणि गोष्टी आपोआप जुळत गेल्या...
सातकापे aka सातकप्पे घावन
लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
घावन बनवण्यासाठी -
२ वाट्या तांदूळ पिठी,
२ वाट्या नारळ पाणी
आणि चवीसाठी मीठ
सारण बनवण्यासाठी -
१ वाटी खवलेले खोबरे,
साधारण अर्धा ते पाऊण वाटी गूळ,
अर्धा चमचा वेलची पूड
१ टेस्पू खसखस
तेल घावनासाठी आणि तूप सारण बनवण्यासाठी.
क्रमवार पाककृती:
१. प्रथम गॅसवरील पातेल्यात १-२ चमचे तूप घालून त्यात खोबरे, गूळ, वेलची पूड, खसखस हे एकत्र करुन सारण बनवून घ्या व थंड करायला ठेवा.
२ .घावनासाठी पीठ तयार करताना तांदळाच्या पिठीमध्ये नारळपाणी घालत हलवत रहा, कुठेही गुठळ्या राहणार नाहीत असे पहावे.
बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग -१
मित्रहो,
कबूल केल्याप्रमाणे या विषयावरचा शेवटचा लेख लिहायला घेतला आहे. विषय मोठा व थोडासा कंटाळवाणा होण्याची शक्यता आहे पण दुसर्या महायुद्धातील वाचावेच असे हे एकंदरीत प्रकरण आहे. तेव्हा थोडा धीर धरुन वाचावे ही विनंती. किती भाग होतील हे सांगता येत नाही पण मधेच गायब होऊ नका.... :-)
भाग -१
१९४१ साली, जून महिन्यात जर्मनीचे १४६ डिव्हिजन सैन्य रशियाच्या आघाडीवर आक्रमणास तयार होते. त्यात जे सैन्य होते त्याची खालील यादी नजरेखालून घातल्यास त्यांच्या तयारीची कल्पना येते. मला स्वत:ला हे सैन्य त्या आघाडीवर कसे हलवले असेल याचा नेहमीच अचंबा वाटतो.
फक्त २५१ रुपयांत स्मार्टफोन!
मिपाकर हो,
बोध कथा - उंदीर आणि बिल्ली मौसी
स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले, त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय? माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही. स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती. उन्दिरांच्या म्होरक्यांनी, तिथे राहणार्या उन्दिरांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनविले होते. उदाहरणत: दूर कुठे बिल्ली मौसी दिसतास उन्दिरांनी शीघ्र बिळात आले पाहिजे आणि तत्काळ बिळाचा दरवाजा बंद केला पाहिजे.
(जालाचे भामटं)
जालाचे भामटं माझे घरीं प्रकटले।
अवघेचि जालें पैसे गुल।। १।।
साईटीचे कपट करुनी फसवलें
अकाउंट देखिलें भागाकार गे माये।।२।।
रोज बसून पूनम बारू सहज 'नीटु' प्याला।
कधी ढोसियला खंबाकारे।।३।।
-- स्वामी संकेतानंद,
१७ फ़ेब्रुवारी, २०१५
काव्यरस
मॅरेथॉन ट्रेक - राजगड ते तोरणा
यावेळचा ट्रेक म्हणजे मॅरेथॉन ट्रेक होता. राजगड ते तोरणा तब्बल १४ किमी अंतर ते ही डोंगर सोंडेवरून.
राजगड म्हणजे सकाळी जावून संध्याकाळी परत अशातला किल्ला नक्कीच नव्हे. राजगड म्हणजे तीन बाजूस तीन संरक्षक माच्या आणि मध्ये बालेकिल्ला! आणि तो पाहायचा असेल तर निवांत मुक्काम ठोकूनच पाहावा लागतो. संपुर्ण गड बारकाईने पाहायला किमान दोन संपुर्ण दिवस तरी हाताशी लागतात. साक्षात किसनदेवांनी राजगडावर आधीच लेख लिहिला असल्यामुळे मी बापुडा काय लिहणार म्हणून फक्त राजगड ते तोरणा या वाटेवर आलेले अनुभव लिहतोय.
तर २२ जानेवारीला रात्री लक्झरी बसने राजगडसाठी रवाना झालो, पहाटे ५ वाजता गुंजवणे गावात पोचलो.
मिसळपाव
संध्यासमयी देवालय हे आकाशाशी सरते..
एक अशी हि अबोल संध्या मनामधेही उरते.
माहीत नाही तिचे नि माझे कुण्या जन्मीचे नाते
ओळख नसता जन्मखुणा ती कुठल्या कसल्या देते!?
दूर देशीचा वाटसरू मी आलो या संध्येशी
नकळत नाते कसेच जुळले हिच्या मग्न छायेशी?
हिशोब मी हि कशास बांधू?