तू आणि मी
लेखनविषय:
मित्रांनो, खूप दिवस झाले मनात काही तरी घोळत होते, पण सांगड बसत नव्हती... आणि अशातच 'व्हॅलेन्टाईन डे'ला कुठून तरी प्रेरणा मिळाली आणि गोष्टी आपोआप जुळत गेल्या... शब्द साधे आहेत, कुठे चुकलो तर समजून घ्या...
तू डोळे, मी काजळ
तू डोंगर, मी नदी
तू ढग, मी वारा
तू कमळ, मी चिखल...
तू रस्ता मी दिशा
तू श्वास, मी ध्यास
तू पाऊस, मी छत्री
तू ऊन, मी सावली...
तू टेबल, मी खुर्ची
तू अंगठी, मी बोट
तू चंद्र, मी तारा
तू मांजर, मी कुत्रा...
तू फळा, मी खडू
तू सवय, मी खोड
तू सुई, मी दोरा
तू चष्मा, मी नाक...
तू ऍक्टिवा, मी डिस्कवर
तू मायक्रोमॅक्स, मी मोटोरोला
तू टेस्टर, मी डेव्हलपर
तू कर्वेनगर, मी चंदन नगर...
तू घड्याळ, मी टिक टिक
तू चिमणी, मी काजळी
तू माठ, मी तिवई
तू माचीस, मी काडी...
तू समुद्र, मी आभाळ
तू थंडी, मी ऊब
तू हृदय मी धड धड
तू सूर, मी ताल...
तू शब्द, मी अर्थ
तू जांभई, मी झोप
तू स्वप्न, मी भास
तू पापणी, मी पाणी...
तू शिंक, मी सर्दी
तू कट्टा, मी गप्पा
तू वाळू, मी खोपा
तू लाट, मी किनारा...
तू रुसवा, मी थट्टा
तू अबोला, मी समजूत
तू ओठ, मी थर-थर
तू भेट, मी ओढ
तू प्रतीक्षा... मी तळमळ...
- प्रसाद पांडुरंग कुलकर्णी
वाचने
3125
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
तू शिंक, मी सर्दी
यक्क"तू प्रसाद मी शिरा" करत आता लै जणं येणार भावा.
तेरी तो चल पडी.
In reply to "तू प्रसाद मी शिरा" करत आता by अभ्या..
हा हा हा
In reply to "तू प्रसाद मी शिरा" करत आता by अभ्या..
मी राधा तू पावा
नव सदस्याला त्रास देऊ नको भावा.
-दिलीप बिरुटे
In reply to अभ्या झाला का तुझा शिरा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समजून घेतल्याबद्दल आभार :)
तू रस्ता मी दिशा
तू श्वास, मी ध्यास
तू पाऊस, मी छत्री
तू ऊन, मी सावली,
आणि
तू रुसवा, मी थट्टा
तू अबोला, मी समजूत
तू ओठ, मी थर-थर
तू भेट, मी ओढ
तू प्रतीक्षा... मी तळमळ...
आवडलं.
-दिलीप बिरुटे
(प्रतिक्षा करून तळमळत असलेला)
तू चिकन, मी मसाला
तू मटार, मी उसळ
तू मिसळ, मी पाव
तू धागा,मी अवांतर
तू चिवट,मी समांतर
तू भांडे,मी कल्हई
तू थंडी,मी दुलई
तू बंदा,मी चिल्लर
तू गप्पा,मी थिल्लर
तू कफनी,मी खडावा
तू वड,मी बहावा
तू खफ्,मी व्यनी
तू बोका,मी मनी
पुढे चालू........
जेप्या बॅटन घे हाती
In reply to भर (ताड) आणि भर by नाखु
तु कुलुप, मी चावी..
तु माजी,मी भावी,
तु पुरी,मी भाजी,
तु ह्लकट,मी पाजी,
बास आज एवढच
तू चालू, मी बंद
मी हुशार, तू मंद
तू लोड, मी उशी
मी मच्छर, तू माशी
तू काल, मी आज
मी बक्कल, तू काज
या रे बाकीचे....
सभासदांची कल्पनाशक्ती वाखाणण्याजोगी आहे... :P मजा आली.
तू चंदन मी पाणी
तू जीभ मी वाणी
तू पाउस मी सरी
तू पंख मी परी
तू वीज मी प्रकाश
तू क्षितीज मी आकाश ......
In reply to तू चंदन मी पाणी by एकप्रवासी
क्या बात है !!!
माझ्या वतीने नाना बोलेल
कैसे बताऊ मैं तुम्हे मेरे लिये तुम कौन हो..
https://www.youtube.com/watch?v=8XTP8r0UCAM
तू वादळ, मी किनारा
तू घर, मी पसारा
तू मोबाईल, मी चार्जर
तू वडापाव, मी पार्सल
तू किती? मी अती?
अती तेथे माती...... बास, इथे आपला पास!
Sandy
तू आयडी, मी डुआयडी
तू ट्रोल, मी संपादक
तू खरड, मी व्यनि
तू वेलणकर, मी अभ्यंकर
तू मनोगत, मी मिपा
तू मिपा तर मी ऐसी
तू कौल, मी खफ
तू धागा, मी बाफ
चल आता नको दवडू तोंडाची वाफ!
मुंपुमुं २ चा प्रभाव का हा?
In reply to मुंपुमुं २ चा प्रभाव का हा? by यशोधरा
मुंपुमुं २ वर यांचाच प्रभाव (पक्षी प्रसाद) आहे आणि शिल्लक राहिलेल्याचे इथे वाटप चालू आहे.
खुलासेदार नाखु
तू राघू मी मैना
तू दिवस मी रैना
तू काम मी सुट्टी
तू वेल मी बुट्टी
तू झोप मी जाग
तू पाणी मी आग
तू कर्तव्य मी कर्म
तू आयुष्य मी मर्म
तू शिंक, मी सर्दी यक्क