Skip to main content

कथा ( भाग ३ )

लेखक अँन्ड्रोमेडा यांनी शनिवार, 20/02/2016 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज अमावस्या सुर्य मावळताच जंगलाने एकदम भेसूर रूप धारण केलं होतं . एक वेगळाच अपशकुन असल्यासारख वातावरण झालं होतं . त्या तशा वातावरणात एक आकृती हळूहळू निघाली होती . वारा वाहायचा थांबला होता आणि ती भयाण शांतता काळजाचा थरकाप उडवत होती . ==================================== "काय मग मॅडम काय मग कशी झाली म्हैशीची सवारी ? फार मजा आली असेल ना ." - सुरभि "मग काय फार मजा आली . अशी सवारी कधी केली नाही ." - निशा "ए चल ना मग आपण पण जाऊया मलाही करायची आहे अशी सवारी ." छे काय पण इच्छा म्हणे म्हैशीवर बसायचं आहे . " कुठे जायचं ?

ज्ञानेश्वरीतील शब्द मालवणी बोलीत (मराठी भाषा दिन २०१६)

लेखक यनावाला यांनी शनिवार, 20/02/2016 05:16 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानेश्वरीतील शब्द मालवणी बोलीत... सातशे वर्षांपूर्वी रचलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आज वाचताना त्यात काही शब्द असे आढळतात की जे आता नागर मराठीत प्रचलित नाहीत. मात्र मालवणी बोलीत जसेच्या तसे आणि त्याच अर्थाने वापरात आहेत. मराठी भाषेपूर्वी प्राकृत भाषा महाराष्ट्रात सर्वत्र प्रचलित असावी. नंतर मराठी आली. त्या भाषेने साहजिकच अनेक शब्द प्राकृतातून घेतले. जुन्या मराठीतील ते प्राकृत शब्द अर्वाचीन मराठीत अस्तंगत झाले. पण त्यांतील काही शब्द मालवणीसारख्या बोलीभाषेत टिकून राहिले.

निखारा

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 19/02/2016 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
कधीमधी पाऊस यायचा. मग जरा अडचणच व्हायची. लाकडं पेटत नसायची. पत्र्याचं शेडपण गळकं. वाऱ्याच्या झोतानं पाऊस आत यायचा आन पाण्याचा फवारा शिपडून जायचा. येवढी मेहनत करुन पेटवलेली लाकडं मग विझायची. राकेलचा आख्खा ड्रम मग उपडा करावा लागायचा. रातभर तसंच बसून राहावं लागायचं. पाऊस उघडला की मग पुन्हा सुकी लाकडं आणून पेटावायला लागायची. रात गेली तरी चालंल पण मढं समदं जळलं पाहीजे. त्याशिवाय सुट्टी न्हाय. थंडीवाऱ्यानं हाडं खिळखीळ करायची. मग गांज्या मारावा लागायच्या. त्याच्या नशेत सगळं स्मशान डोक्यात घुमत राहायचं. अनंतकाळ. येरवाळी बरं असायचं. राती नऊ-दहालाच सराण पेटवून देऊन खोपट्यात निवांत पडायला मिळायचं.

मार्गसूची

लेखक मधुरा देशपांडे यांनी शुक्रवार, 19/02/2016 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
MargSuchi body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleuse
विशेष

आसावरीची पर्यटन भरारी

लेखक मधुरा देशपांडे यांनी शुक्रवार, 19/02/2016 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleuse

शृँगार ३

लेखक अनाहूत यांनी शुक्रवार, 19/02/2016 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
उठतो तर रोजच पण आज उठलो ते जरा लवकरच . एवढ्या सकाळी , सॉरी पहाटे उठायच म्हणजे थोडे श्रम पडलेच . नुसत गजर लावून चालत नाही , तो वाजल्यावर जाग यायलाही हवी आणि नुसती जाग येऊन भागत नाही तर नाईलाजाने का होईना अंथरूणातून बाहेर याव लागत . मोठ्या प्रयासाने या गोष्टी करून एकदाचा तयार झालो . आजपासून जिम सुरू करायची थोडी फिटणेस पाहिजे ना राव . स्वतःच आवरल्यावर बायकोपाशी गेलो . तिला कालच सांगितल होत जिमला सोबत येण्याबद्दल . तिनेही जिम केली तर लवकर फरक पडणार होता , म्हणून हा सगळा खटाटोप .तिला आवाज दिला आणि उठवण्याचा प्रयत्न केला . ती अशी काही वसकन अंगावर आली की मी घाबरून मागे सरकलो .

चंद्रगड ते आर्थर सीट, महाबळेश्वर

लेखक सुनिल साळी यांनी शुक्रवार, 19/02/2016 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
फार काही दिवस झाले नाही राजगड ते तोरणा हा रेंज ट्रेक करून.. पण मन काही स्वस्थ बसवेना सह्याद्रीच्या ओढीने. पुढील ट्रेक ची आखणी चालू आहे. चंद्रगड ते आर्थर सीट, महाबळेश्वर रेन्ज ट्रेक... एकूण 7-8 भटके आहेत. शक्यतो बाइक ने प्रस्थान. बाइक महाबळेश्वर ला लावणार. तेथून चंद्रगड पायथ्याला आपल्या लाल डब्याने. रात्री गावात मुक्काम. सकाळी 6 वाजता आर्थर सीट कडे प्रयाण. आपल्यातले काही मिपाकर मंडळी नेहेमी भटकंती करीत असतात. जर कोणी चंद्रगड ते आर्थर सीट हा ट्रेक केला असेल तर कृपया अधिक माहिती द्याल का? ह्या ट्रेक बदद्ल.

लदाख सायकल ने : श्रीनगर ते दिल्ली (भाग १९)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी शुक्रवार, 19/02/2016 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
खर म्हणजे मी खूप थकलो होतो. १०० किलोमीटर पेक्षा आज जास्त सायकल चालवली होती. त्याचे मी लगेच ऐकला आणि दुकानाच्या पायर्यावर बसलो. बाकीचे लोक म्हणायला लागले कि इथे नको बसू आत जाउन खुर्ची वर बस. मी नाही म्हंटला इथेच ठीक आहे. मग सगळे जवळ आले. खूप गप्पा मारल्या. दिल्ली वरून आलोय, मनाली वरून सुरु केलं होतं आणि आज इथे संपवतोय. ते खूप लक्ष्य देऊन ऐकत होते. त्यांनी त्यांच्या घरी यायचे निमंत्रण दिला. मी सरळ नाही म्हणून सांगितले. मला आशा नव्हती कि काश्मीर मध्ये एवडे प्रेम मिळेल ते. पण हे गाव होतं त्यामुळे असेल कदाचित. शहराची गोष्ट वेगळी आहे. अर्धा तास थांबल्यानंतर तेथून निघालो.

(अशी कबुतरे येती)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 18/02/2016 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
अशी कबुतरे येती; आणिक घाण ठेवुनी जाती दोन घरांची पुण्यकमाई दहा घरांच्या खाती कपोत आला, पहिला वहिला खिड़कीमागे उभा राहिला तया मागे, येई साजणी गूटर्गूच्या साथी... दुरून येती थवे देखिले मी ग्याल्रीचे दार लोटिले धड़क मारती तरी निरंतर गंधित झाल्या भिंती पंख दोन ते हळु फ़डफ़डले खोलीभर मायेने फिरले हॉलकिचनाच्या भिंतीमधुनि लागेना मज हाती 'पुण्यवान' तो येता गाठी शिव्या पाच मोहरल्या ओठी त्या तुटल्या दातांची गाथा क्रूर कबुतरे गाती -- स्वामी कपोतगावकर
काव्यरस

प्रसार माध्यमे आणि टिपिंग पॉईंट - एक रोचक संशोधन

लेखक विकास यांनी गुरुवार, 18/02/2016 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
दि न्यूयॉर्कर साप्ताहीकाचा पत्रकार माल्कम ग्लाडवेल, याने २००० मधे एक पुस्तक लिहीले होते - "The Tipping Point - How Little Things Can Make a Big Difference". कुठलिही गोष्ट अचानक मोठी होण्याआधी कशा घटना घडत असतात त्या एकमेकांना कशा लागलेल्या असतात, याचा अन्वयार्थ लावताना या पुस्तकात अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे. असा टिपिंग पॉईंट हा रोगराई, युद्धे, गुन्हेवारी वाढ इथपासून ते राजकीय बदल या सर्वत्रच दिसू शकतो. उदा. "ऑस्ट्रीयाच्या राजपुत्राचा खून हे पहील्या महायुद्धाचे तात्कालीक कारण" समजले जाते.