Skip to main content

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ३)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 23/02/2016 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ ------------- जुनागढ हे आजच्या गुजरात मधील एक संस्थान. इथल्या नवाबाने १५ ऑगस्ट १९४७ ला माउंटबॅटनच्या भौगोलिक जवळिकीचा सिद्धांत धुडकावून लावत पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेतला. युक्तिवाद होता, समुद्रमार्गे पाकिस्तान जवळ आहे. मंगरूळ आणि बाबरीवाडा हे जुनागढचे दोन अंकित प्रदेश होते. त्यांनी जुनागढच्या नवाबाच्या इच्छेप्रमाणे पाकिस्तानात सामील होण्यास नकार दिला. म्हणून नवाबाने या दोन प्रदेशात आपले सैन्य पाठवले. त्यामुळे आजूबाजूची इतर संस्थाने खवळली आणि त्यानी आपापले सैन्य जुनागढच्या सीमेवर नेवून भारतीय सरकारला साकडे घातले. आणि जुनागढ मध्ये एक अस्थायी सरकार देखील स्थापण्यात आले.

शृँगार ४

लेखक अनाहूत यांनी मंगळवार, 23/02/2016 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो . " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर ती खाली लागेल . " " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . " " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या .

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 23/02/2016 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

अ‍ॅना फ्रँक!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 23/02/2016 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
. . 'डायरी ऑफ अ‍ॅना फ्रँक 'ची पारायणं केल्यापासून म्हणजे शालेय वयापासूनच तिच्याविषयी एक सुप्त उत्सुकता होती.त्यामुळे अ‍ॅमस्टरडॅमला गेलं की 'अ‍ॅना फ्रँक हाऊस'ला भेट द्यायची हे मी युरोपमध्ये राहण्याची सुतराम शक्यता नव्हती तेव्हाच ठरवून टाकलं होतं‍.

Elementary, my dear Watson!

लेखक केडी यांनी मंगळवार, 23/02/2016 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
शेरलॉक होल्म्स साठी जरी काही गोष्टी इतक्या elementary असायच्या तरीही माझ्या आयुष्यात मात्र "elementary exam" हि काही इतकी elementary गोष्ट न्हवती. त्या काळी, म्हणजे अस्मादिक जेंव्हा आठवीत होते, तेव्हा आमच्या पालकांना कोणी सांगितला कोणास ठाऊक, कि बुवा elementary आणि Intermediate ह्या २ चित्रकला परीक्षा पास झाल्या कि दाहावीच्या परीक्षेत अर्धा का एक टक्का बोनस मिळतो म्हणे! तसेही, आमची अभ्यासातली एकंदर गती बघता ,आमची drawing च्या क्लास ला रवानगी न झाली तरच नवल! आणि त्या काळी, मी हे करणार नाही, किंवा मला जमणार नाही असे ऐकून घेणारे समजूतदार पालक जन्माला यायचे होते.

आम्हाला इंग्लिश येतंय

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 23/02/2016 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा मराठी, इंग्रजी, भाषेबद्दलचं प्रेम, इंग्रजीत वाटणारा उच्चभ्रूपणा, मराठी बोलण्यातला न्यूनगंड, हे आणि संबंधित सगळे विषय काही नवीन नव्हेत. पण कधी जुने होणारेही नव्हेत. मराठी भाषा सप्ताह सुरू आहे.

बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/02/2016 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - १ .....या सर्व कारणाने जर्मनीने ऑपरेशन बार्बारोसा आखले आणि अमलात आणले.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जाता जाता या मोहिमेचे नाव हिटलरने बार्बारोसा का ठेवले हे पाहणे मनोरंजक ठरेल. बार्बारोसा या जर्मन शब्दाचा अर्थ होतो लाल दाढीचा किंवा लाल केसांचा (रानटी ?) माणूस.

ते...

लेखक सटक यांनी मंगळवार, 23/02/2016 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी तो गावी पोचला होता. बरोब्बर २३ वर्षांनी. त्याच्या मनातला ध्यास आता पूर्णत्वाकडे जाण्याची चिन्हे त्याला स्पष्ट दिसू लागली होती. तेरा वर्षात अफ्रिकेच्या जंगलातून त्याने जी विद्या घासून पुसून आणली तिच्या वापराने त्याचा सूड पूर्ण होणार होता. लहान चणीचा तो तरूण आपल्याच विचारात हरवून वेशीपर्यंत पोहोचला. त्याच्या लहानपणी चांगली धडधाकट असणारी वेस आता मोडकळीला आली होती. पण अजून होती. वाटेतल्या बर्‍याच गावातल्या वेशींसारखी पार पुसली गेली नव्हती. त्याने शांतपणे जवळच्या थैलीतून राख काढली आणि वेस बांधून घेतली. मग त्या राखेचे दोन फटकारे दोन दिशांना मारून तो तेथून निघाला. अजून बरेच अंतर कापायचे होते.

गोजल

लेखक अद्द्या यांनी सोमवार, 22/02/2016 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या कोणा राक्षसाने "अलार्म" हा प्रकार तयार केला न. देव करो आणि दर १५ मिनिटाने अलार्म वाजात राहो त्याच्या कानात. आणि सुट्टीच्या दिवशी कशाला वाजतो हा मूर्खपणा. रविवारचा दिवस आणि ६ वाजता उठणे म्हणजे पाप आहे पाप. पण नाही, हा वाजलाच . म्हणजे मला काही फरक पडत नाही , मला ऐकूही येत नाही. माझ्या खोलीत (माझ्या उश्याशी म्हणू )वाजत असलेला अलार्म ऐकून वरच्या खोलीतून आई / बाबा / बहिण कोणी तरी येउन ते बंद करतं आणि मला उठवतं. पण चूक त्यांची नाही . अलार्म वाजलाच नाही तर ते येणारच नाही माझी झोपमोड करायला. आता तुम्ही म्हणाल कि "अरे मुर्ख माणसा , लावतोच कशाला अलार्म ? " लोकहो, तोच तर प्रोब्लेम अहे.

पांढरा दिवस

लेखक सुरवंट यांनी सोमवार, 22/02/2016 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
बशीतून चहा पिताना फार बरे वाटते हातात घेतलेल्या कपाला मग बाजूला ठेवावे लागते नाष्ट्याला पोहे असल्यास तोंडाला पाणी सुटते चटणीवर दही घेऊन मग लोणचं खाऊ वाटते बुट घालून झाल्यावर गाडीला किक बसते कितीही हॉर्न वाजवला तरी एखादी कार मध्येच घुसते दिवस डोक्यावर येतो सुर्यनारायणाची भट्टी तापते वेगळ्या अँगल मधून पाहिल्यास दुपारची काशी होते घरी आल्यावर मला माझी कविता म्हणते मालक बशी फुटली, तसं कपातून चहा पितानाही फार बरे वाटते
काव्यरस