Skip to main content

सासुरवाशीण

लेखक मीनादि यांनी गुरुवार, 25/02/2016 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
झालेय आता सासुरवाशीण तरी आई तुझ्याकडे यायचंय आई तुझ्याकडे यायचंय , मला परत लहान व्हायचंय नाही सहन होत ग आता जबाबदारीच ओझ तुझ्या कुशीत शिरून मला खूप खूप रडायचंय नाही इथे कुणालाच माझ ऐकायचंय मनात साठलेलं तुलाच फक्त सांगायचंय पुन्हा तुझी आळशी मुलगी मला बनायचंय पुन्हा मला उशिरा पर्यंत लोळायचय तुझ्या हातच गरमगरम जेवायचंय इथे कुणाला माहीतही नाही मला काय आवडत, सासुरवाशिणी साठी नसतो हा नियम जाणलंय मी तरीही आई मला तुझ्याकडे यायचंय मला तुझ्याकडे यायचंय आई, मला पुन्हा लहान व्हायचंय . होईल का ग हे शक्य नाही ना !!!!
काव्यरस

भारत 'माझा' देश आहे , खरच ?

लेखक अँन्ड्रोमेडा यांनी गुरुवार, 25/02/2016 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
भारत 'माझा' देश आहे , खरच ? मी आणि माझ घर या पलीकडे आपण कधी विचार करतो का ? घरातला कचरा कचराकुंडीत टाकतानाही आपण जराही काळजी घेत नाही . सरळ भिरकावून देण्याचा प्रयत्न करतो. मग तो कचरा कुंडीत वा बाहेर आपल्याला काळजी नसते . कारण हा रस्ता आपला नसतो . बसमधुन प्रवास करताना बसची आसने फाडली जातात त्यातुन स्पंज काढला जातो .कारण बस आपली नसते .देशातील विविध स्मारक ,पर्यटन स्थळ इथं जाऊन आपण परिसर अस्वच्छ करतो.अयोग्य मजकूर लिहिला जातो.कारण ही स्मारक ,पर्यटन स्थळ आपली नसतात. इथले रस्ते ,बगिचे,कार्यालय ,सार्वजनिक वाहतुक व्यवस्था ,जंगलं,स्मारक ,पर्यटन स्थळ यातल आपल काहिच नसत.

ढग, पाउस, आठवणी आणि भावना...

लेखक सतिश गावडे यांनी गुरुवार, 25/02/2016 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
मन कोरडं कोरडं नाही पाऊस पडत जरी जळालं हे रान नाही मोहर झडत नियतीच्या दरबारात आता मागेन मी दाद आंधळ्या न्यायदेवतेला आता घालेन मी साद आले काळेभोर हे ढग नाही पाऊस हा त्यात गेले कितीक ऋतू असे नाही तिची माझी भेट आता उरल्या आठवांचा सखे मी घालतो जागर इवल्याशा मनी माझ्या दाटे गहिरा भावना सागर

गुजराती मिठाई: हलवासन

लेखक अनन्न्या यांनी गुरुवार, 25/02/2016 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरातच्या खंबातची प्रसिद्ध मिठाई म्हणजे हलवासन. माझ्या सासूबाईंचे माहेर बडोद्याला असल्याने तिकडे गेल्यावर हलवासन हमखास आणले जाई. जेव्हा मला जायची संधी मिळाली तेव्हा खंबातला जाऊन हलवासनची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

कधीतरी.........

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 25/02/2016 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी पुन्हा भेटशील त्या रिमझिमणार्या पावसात असावीस फ़क्त तू आणि मी सोबत एक चिंब शहारणारी बरसात कधीतरी पुन्हा भेटशील त्या पहाटेच्या धुक्यात असावीस फ़क्त तू आणि मी सोबत एक गुलाबी मिठी गारठ्यात कधीतरी पुन्हा भेटशील त्या एकांती शिवारात असावीस फ़क्त तू आणि मी सोबत एक उत्कट आसुसलेली सांजरात कधीतरी पुन्हा भेटशील त्या लुकलुकणार्या चांदण्यात असावीस फ़क्त तू आणि मी सोबत एक मदहोश निशिगंध अंगणात कधीतरी खरीखुरी भेटशील माझ्या एकएकट्या प्रवासात सोबत असावीस फ़क्त तू तेव्हाच अर्थ येईल ह्या जगण्यात सांग ना...... एकदातरी भेटशील.........

माजे मामात्यांच्यो गजाली (चित्पावनी) (मराठी भाषा दिन २०१६)

लेखक प्रीत-मोहर यांनी गुरुवार, 25/02/2016 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिसळपाव.कॉम "मराठी भाषा दिन २०१६" चे निमित्तान मराठी बोलीभाषा सप्ताह साजरो करीतसे, अणि हें सप्ताहांत माज्या बोली भाषांत कितां तरी ल्हेंणार हें येवजोनीच आंगावर काटो फुलसे. पण एठा माजो हो चित्पावनी भाशांतलो पयलोच लेख म्हणटकत ह्या भाशाबद्दल थोडांसाच ल्हेंणार असां मनात सलां पण आदी ठरयलां माजे पणजीआज्याबद्दल ल्हेन पण त्याचेबद्दल में महिलादिन अंकात ल्हेला से मराठ्यांत तशी मग दिसलां माजे मामात्यांच्यो गजाली तुमला सांगेव्यो. तसां तुमी बालकांड वाचलां सेल ते तुमला थोडो नमुनो बघे गावलो सनार. तुमला हो लेख आवडलो जाले अजुनीय ल्हेंव शकसां. हो लेख माज्या स्व. पणज्याच्या स्मृत्याला अर्पण.

साहित्याचे मारेकरी - चेतन भगत, सुदीप नगरकर, दुर्जोय दत्ता.

लेखक निशांत_खाडे यांनी गुरुवार, 25/02/2016 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी परत एकदा 'एबीपी माझा' वरती महाराष्ट्रीयन इंग्रजी लेखक (?) सुदीप नगरकराची मुलाखत पहिली. याच सुदीप नगरकरला एबीपी माझाने काही वर्षांपूर्वी 'महाराष्ट्राचा शिलेदार' म्हणून नावाजले होते. थोडेसे त्याच्याविषयी आणि त्याच्या सारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हणतोय. तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे भारतीय लोक राहतात तिथे त्यांना चेतन भगत, दुर्जोय दत्ता, आणि सुदीप नगरकर हि नावे थोड्या बोहत प्रमाणात परिचयाची असतील.

घोळक्याने केले जाणारे 'वर्तमानपत्री' लिखाण- आणि नव्या लेखनाविषयीची असहिष्णुता- भाग एक

लेखक निशांत_खाडे यांनी गुरुवार, 25/02/2016 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर मी दोन दिवसांपूर्वीच आलो आहे. तसे मिपाचे वाचन खूप दिवसांपासून करत आहे. आज आल्या आल्या एक शाब्दिक चकमक झाली जिच्यामुळे हा लेख लिहिणे महत्वाचे वाटले. प्रथम, वर्तमानपत्री लिखाण याविषयीचा माझा समज म्हणजे निरर्थक ताणून धरलेले आणि मराठी भाषेला परिचयाचे नसलेले किंवा 'रोमांटीक लव' सारख्या पाश्च्यात संकल्पनांना मराठीतल्या शृंगार रसाशी जुळवून मुक्तछंदात लेखन करणारे कवी आणि तत्सम लेखक यांचा लेखन प्रपंच. याचेच एक उदाहरण म्हणजे फक्त वाचकांना रंजक वाटावी याच हेतूने लिहिली जाणारी आधुनिक प्रकारची धड गद्यही नाही आणि पद्यही नाही अशी कथा.

विज्ञान - अप टू डेट

लेखक पॉइंट ब्लँक यांनी गुरुवार, 25/02/2016 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञानानं फार प्रगती केली आहे आणि सगळे अवघड प्रश्न आता जवळजवळ सुटल्यात जमा आहेत आणि इतर प्रश्न निरर्थक आहेत असं आजकाल फार वाचनात येत आहे. खरच तशी परिस्थिती आहे का आणि ह्या संदर्भात खात्रीलायक माहिती कुठे मिळवायची ह्या प्रश्नांवर थोडा प्रकाश टाकण्यासाठी हा लेख. डिस्क्लेमर :- इथं मराठी लेखमाला चालू करण्याचा उद्देश नाही. मिपा हे मराठी अंतरंग ..... तस्मात भावनांचा आदर आहे पण काही गोष्टी मराठीत आणि सोप्या करून लिहण्याची माझी कुवत नाही. शिवाय सर्व विषय समजण्याइतके प्रकांड पंडित अजून झालेलो नाही. त्यामुळे अमुक मराठीत लिहा असा आग्रह करू नये.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ४)

लेखक Anand More यांनी गुरुवार, 25/02/2016 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ ------------- काश्मीर प्रश्नाचे वेगळे[पण समजून घेण्यासाठी मी प्रथम त्याची जुनागढ आणि हैद्राबाद बरोबर तुलना करतो आणि मग तेंव्हाचा घटनाक्रम सांगतो. जुनागढ भारतीय भूभागाला लागून होते. हैद्राबाद भारतीय भूभागाने वेढलेले होते. या दोन्ही संस्थानांची पाकिस्तानशी भौगोलिक जवळीक किंवा सलगता नव्हती. तर काश्मीर भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांबरोबर मोठी सीमा असलेले संस्थान होते.