Skip to main content

ते... (तेवीस वर्षांपूर्वी!) भाग-२

लेखक सटक यांनी गुरुवार, 25/02/2016 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
देगल्याच्या बापाला काळी विद्या वश होती! जारण-मारण, मूठ-करणी, वशीकरण, भानामती, स्मशानविद्या...सगळे येत होते त्याला. हाताशी चार दोन पिशाच्चेही होती. सतत तांबारलेल्या डोळ्यानी आणि दारूचा दर्प असणार्‍या तोंडानी वावरणारा देगल्याचा बाप बगलुआईचा भक्त होता. जागल्याच्या ताब्यात अख्खे रुसाळे होते! रुसाळे गाव तसे सधन! गावाचे नाव रुसाळे कसे पडले ह्याचीही एक गंमत होती, गावची देवी येजाई म्हसोबावर रुसून दूर एका तळ्यापाशी जाऊन राहिल्याची आख्यायिका होती. रूसलेल्या देवीचा गाव म्हणून हे रूसाळे! देवीच्या तळ्याला सगळे जाईची कोंड म्हणत. तिथे येजाईचे मंदिर होते.

मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 25/02/2016 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल... हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत... १. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील. २.

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ८ : बद्रीनाथ आणि हरिद्वार

लेखक आकाश खोत यांनी गुरुवार, 25/02/2016 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ मागच्या पोस्टमध्ये मी बद्रीनाथ आणि जवळचे भारतीय सीमेवरचे अंतिम गाव माना येथे जाऊन आल्याचे वर्णन केले आहे.

कथा ( भाग ४ )

लेखक अँन्ड्रोमेडा यांनी गुरुवार, 25/02/2016 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो सर कशाला विषाची परीक्षा घ्यायला निघाला आहात तुम्ही ? आणि बाकी फक्त तुम्ही तुमच्यापुरता निर्णय घेत असता तर माझा काही अधिकारही नव्हता तुम्हाला विरोध करायचा पण तुम्ही इतक्या मुलांना सोबत घेऊन जायचं म्हणत आहात मी कशी परवानगी देऊ ? आणि ज्यांना घेऊन जाणार आहात त्या मुलांच्या पालकांची परवानगी नको का ? आणि एकदा का त्यांना समजलं की मुलांना कुठे घेऊन जायचं म्हणत आहात तर शाळेवरची कौलच काय पण आपल्या डोक्यावरचे केसही शिल्लक राहणार नाहीत . " " ते का सर ? " " अहो इतके जोडे पडल्यानंतर केस राहतील का ? " " ते नाही सर मी म्हणतोय ते लोक अस का करतील ?

< दोन पक्षी (एकाच वेळी) >

लेखक नाखु यांनी गुरुवार, 25/02/2016 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर मी सात वर्ष ११ महिन्यांपुर्वीच आलो आहे. तसे मिपाचे चिंतन आणि मनन खूप दिवसांपासून करत आहे.

मिसळपावचे मारेकरी - ... ... ...

लेखक नीलमोहर यांनी गुरुवार, 25/02/2016 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्‍यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले. तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ...

कणिक-नाचणी केक

लेखक इशा१२३ यांनी गुरुवार, 25/02/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
cake साहित्यः गव्हाचे पिठ : १ १/२ कप नाचणी पिठ : १/२ कप साखर : १ कप दुध : १ कप दहि : १ कप तुप : १/४ कप बेकिंग पावडर : १/२ चमचा केळ : २ व्हॅनिला इसेन्स : १/२ चमचा ट्रुटिफ्रुटि,सुकामेवा : २ चमचे sahity

कुत्री पालन ---- भाग २ ---- बीगल

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 25/02/2016 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागाची लिंक ===> http://www.misalpav.com/node/34821 आमची स्वीटी (लॅब्रेडॉर जातीची) देवाघरी गेली आणि मी मानसीक रोगी झालो.(साधारणपणे कुत्री पाळणारे बहूतेक जण ह्या स्थितीतून जातात.) मी जिथे असेन तिथे स्वीटी माझ्या जवळच असल्याने, तिचा विरह मला सहन होईना.बायकोच्या आणि मुलांच्या लक्षांत ही गोष्ट आली.३-४ दिवस रडण्यातच गेले पण मनाला काही आराम मिळेना.शेवटी एक दिवस बायको म्हणाली की, आपण आता अजून एक कुत्री पाळू या. ह्या वेळी मात्र एक ठरवले की, मोठे कुत्रे घेण्यापेक्षा एखादे छोटे-खानी कुत्रे घेवू. छोट्या कुत्र्यांची माहिती घेतांना बरीच कुत्री

मराठी भाषा दिनानिमित्त

लेखक शान्तिप्रिय यांनी गुरुवार, 25/02/2016 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजीचा अभ्यास करा पण मराठी कडे दुर्लक्ष नको. उगीचच कोस्मोपोलिटन बनून प्रादेशिक भाषा हिन्दी आणि इंग्रजीचा वापर मराठी समुहात बोलताना नको. साध्या साध्या शब्दांसाठी इंग्रजीची लाचारी नको. खूपच संस्कृतोद्भव शब्द मराठीत आणण्याचा अट्टाहास नको मराठी पत्रकावर करू मराठीतूनच सही द्या बघू ही महाराष्ट्राला ग्वाही !

ज्योती आणि स्मृती

लेखक विनायक पन्त यांनी गुरुवार, 25/02/2016 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, काल तब्येत ठीक नसल्यामुळे पूर्ण वेळ लोकसभा आणि राज्यसभा channels पाहिले. ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती इराणी आणि अनुराग ठाकूर यांची संसदिय भाषणे ऐकली. स्मृती इराणी आणि ज्योतिरादित्य यांनी जे काही दाखले/पुरावे दिलेत, त्यावरून तरी काँग्रेस आणि भाजप JNU प्रकरणात राजकारण करत आहे असंच वाटतंय. खरं-खोटं न्यायव्यवस्था बघून घेईल. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे, देशाच्या एकात्मतेविरोधात जर एखादी घटना घडत असेल (सिद्ध झालेले नाहीये, तरी पण गृहीत धरू कि घडलीये), तर सरकार म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून जी असंवेदनशीलता यांनी दाखवलेली आहे तो योग्य आहे का?