Skip to main content

कोकण दर्शन

लेखक जानु यांनी शुक्रवार, 11/03/2016 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
मला सहकुटुंब, सहपरिवार होळीच्या वेळेस कोकण पाहावयाचा आहे. दोन दिवस निवांत राहणे व शक्यतो एकाच ठिकाणी निवास असा विचार आहे. मागे गविंनी यावर एक छान टुर सांगितला होता. मला लिंक द्या. किंवा कोणास निवांत आणि शांत जागा माहित असेल तर सांगा. मुळात होळीला कोकणात जावे का हा मुळ प्रश्न आहे. या व्यतिरिक्त कोणती वेगळी जागा असेल समुद्रकिनारा सोडुन तरी चालेल. तीन जोड्या चार मुले असा लवाजमा आहे. मुख्य म्हणजे शुध्द शाकाहरी हे लक्षात असु द्यावे ही कळकळीची विनंती.

कोबी कोफ्ता करी ..

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 11/03/2016 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोबी कोफ्ता करी .. आमच्या घरात कोबी म्हटले कि सगळे तोंड वाकड करतात मला स्वत:ला कोबी फार आवडतो. पण मग कधी कधी इतराना आवडत नाही म्हणून कोबी घेण आपोपाप टाळल जात म्हणून नेटवर कोबीच्या वेगवेगळ्या रेसेपी धुंडाळून हि रेसेपी मिळाली तिच्यात मी थोडे फार बदल केले न बनवली सगळ्यांना खूप आवडली देखील, म्हणून आता हा लेखन प्रपंच साहित्य : (कोफ्त्यासाठी ) १) बारीक चिरलेला कोबी -२ वाट्या. २) २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून.

ग्वाटेमाला - चित्रपुरवणी

लेखक समर्पक यांनी शुक्रवार, 11/03/2016 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
इडली डोसा यांच्या प्रवासवर्णनामध्ये सचित्र भर म्हणून हा पुरवणी लेख. त्यांच्या लेखामुळे बऱ्याच जणांना हा देश नव्याने माहिती झाला आहे तर काही जणांना माहित असलेली जागा चित्रातून पहावयास मिळत आहे, त्यात माझीही दोन मुठी भर… मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला व तीन शेजारी देशांची तीन ठळक पैलूंविषयी माहिती:

एक पिपाणी द्या पप्पूस आणुनी

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 11/03/2016 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
एक पिपाणी द्या पप्पूस आणुनी पिचकीन जी तो परप्राणाने छेदुनी टान्गूनी सारी लक्तरे दीर्घ तिच्या त्या किंकाळीने, अशी पिपाणी द्या हीज आणुनी मती जाऊ द्या मरणालागुनि जाळूनी किंवा पुरुनी टाका कुन्थत न एका ठायी ठाका सावध ऐका पुढला धोका खांद्यास चला खांदा देऊनी एक 'कन्हैया' द्या हीज आणुनी (वाजवील तो बासुरी सुन्दर) प्राप्तकाल हा विशाल धूसर सुंदर बेणी तयात खोदा निजधामे त्या वरती नोंदा बसुनी का गाढवीवर मेदा विक्रम काही करा चला तर हल्ला करण्या ह्या सि.न्हावर,ह्या वाघीणीवर मुढानो या त्वरा करा रे मूढते चा ध्वज उंच धरा रे बेअकले ची द्वाही फिरवा रे पिपाणीच्या या सुरा बरोबर मूळ कविता : एक तुतारी द्या मज आणुनी

१५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने...

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 11/03/2016 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
"ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा राजा आहे; उत्पादक, व्यापारी, सेवांचे पुरवठादार इ. वर्गांचा तो पोशिंदा आहे, त्याच्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती मिळते इ. वाक्ये अर्थशास्त्राच्या पुस्तकात वाचतांना मन सुखावते. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ग्राहकाला कशी वागणूक दिली जाते याचे दर्शन याच संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सत्यकथांवरून घडते. ग्राहकाचे अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती स्थान आणि त्याचे मूलभूत हक्क यांचा प्रथम उच्चार केला तो अमेरिकेचे प्रे. जॉन एफ. केनेडी यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून तेथील प्रतीनिधीगृहात १५ मार्च १९६२ रोजी केलेल्या पहिल्या भाषणात! आपण सर्वजण ग्राहक आहोत.

भूतकथा - "दुराई"

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 11/03/2016 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणच्या समुद्रकिनार्याावरील कुचवडे गावची गोष्ट ... पक्या आणि तुक्या हे दोघे जिगरी दोस्त , सकाळी उठायचे .. मिश्री लावून चहा पीवून गावात फिरायला जायचे आणि आवश्यक ते “संशोधन” करून १० वाजेपर्यंत घरी परत यायचे ,... मग न्याहारी करून १२ वाजता सख्याच्या अड्ड्यावर जावून पावशेर गावठी दारू ढोसायची आणि मग घरी येवून जेवायचे आणि मस्तपैकी सहा वाजेपर्यंत ताणून द्यायची हा त्यांचा नेहमीचा उद्योग ....त्यांचा दिवस खर्याी अर्थाने सुरू व्हायचा तो रात्री दहा वाजल्यावर ! सगळीकडे नीजांनीज झाल्यावर मग हे दोघे वाड्यांतून आंबा काजू बागा धुंडाळायला बाहेर पडायचे !.

ही कोंबड्याची'चव'हा,वेड लावी जिह्वा

लेखक खालीमुंडी पाताळधुंडी यांनी गुरुवार, 10/03/2016 18:25 या दिवशी प्रकाशित केले.

ही कोंबड्याची'चव'हा,वेड लावी जिह्वा(जिभ)

(टीप : सदर गाणे "ही गुलाबी हवा"च्या चालीत म्हणावे. आरवा=कोंबड्याचे आरवणे या अर्थाने घ्यावे) ही कोंबड्याची 'चव'हा, वेड लावी जिह्वा(जिभ) हाय रश्श्यातही,ऐकू ये आरवा...... तंगडी फोडी कुणी,कड्डकडाडूनी सुख प्रकटले,आज माझ्या मनी पांढर्या रश्श्यातही,गंध दाटे नवा ऐकू ये आरवा....... का किती पेग हे,रिचवले(पचवले) उदरा भान हरपून मी,हावराबावरा का कळेना तरी,जाणवतो गारवा ऐकू ये आरवा....... - - - खाली मुंडी कोंबडी धुंडी

एक हवीहवीशी शाळा

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 10/03/2016 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा सुटण्याचा आनंद जिथे शाळा भरण्याच्या आनंदापेक्षा छोटा असतो, अशा शाळा विरळाच. अशाच एका शाळेबद्दल नुकतंच वाचलं. वाचून मनात प्रचंड कौतुक, प्रचंड आदर, प्रचंड प्रेरणा असे अनेक भाव दाटून आले. शाळेबद्दल; परंतु त्याहून अधिक या शाळेचा ख-या अर्थाने कायापालट करणा-या त्या एका व्यक्तीबद्दल. पुण्याजवळील शिक्रापूर नजीक वाबळेवाडी नावाचं गाव आहे. तिथल्या जिल्हापरिषदेच्या शाळेची ही गोष्ट आहे. २०१२ साली दत्तत्रय वरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. शाळेतील प्रवेशांचं घटणारं प्रमाण, विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची कमी होत चाललेली ओढ, या गोष्टींची वरे सरांना कल्पना होती.

वटवाघुळ..

लेखक निशांत_खाडे यांनी गुरुवार, 10/03/2016 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज तो सकाळी सहा वाजता उठला, डोळे उघडून खाटेवर पडल्यापडल्याच त्याने खिडकीतून बाहेर पहिले, शेजाऱ्याच्या लिंबाच्या झाडाच्या फांद्यांच्या पलीकडे नुकताच उगवलेला सुर्य लहान बाळासारखा दिसत होता, निरागस, सौम्य. ते पाहून तो कावला. रात्री अडीच पर्यंत जागून परत आज हा सकाळी उठायचा वैताग. बरं उठणं का होईना, पण आता पूर्ण दिवस कदाचित जागावे लागेल, बस स्टेशन वर जाउन अण्णा आणि आईला आणावे लागेल, म्हणजे आणखीनच वैताग. काम बरेच शिल्लक राहिलेय, रात्री कसेही करून पूर्ण करावेच लागेल, म्हणजे निदान तीन पर्यंत तरी जागावे लागेलच, परत अण्णा असल्यावर उद्या सकाळी सहाच्या पुढे झोप घेणे शक्यच नाही, परत उद्याचा पूर्ण दिवस तसाच धावपळीत जाणार, असा विचार करत करत, हळू हळू त्याचे डोळे परत झाकायला लागले. कशाचाच कशाला मेळ नाही अशी स्थिर स्वप्निक झोप प्रचंड वेगाने गरगरत त्याच्याकडे येऊ लागली, त्याला अलगद उचलून तिने स्वतःच्या मऊशार कुशीत घेतले. शांत, पांढरे शुभ्र, निर्मनुष्य ठिकाण डोळ्यासमोर येऊ लागले. कस्तुरीसारखा कशाचा तरी सुगंध वाऱ्याच्या आल्हाद आणि थंड झुळके बरोबर त्याला सुखावून जात होता, वरती ढगांची पांढरी चादर, आणि सुटे सुटे होत पुन्हा कायम गडद राहणारे आभाळ. निर्विकार शांतता, आणि तिथे हा एकटाच असाच पडलेला. पिढ्या न पिढ्यांचा थकवा गेल्यासारखे सुख, तिथे स्तब्ध होऊन पडलेले याचे शरीर.. तो पूर्ण गुरफटून, गोठून गेला होता..

(शाक दाट वाटान्याची)

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 10/03/2016 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
पैजारबुवा, नीमोतै आणि सध्या अद्रुश्य झालेले/ल्या दमामि येऊन षटकार ठोकून जायच्या आधी दोन रन काढून ठेवते. प्रेरणा द्यायचा कंटाळा आला आहे. घेतो खीर ओरपून ही किमया गोडाची बेल्ट जरा सैलावून चिंता करतो घेराची पुरीआड दडती भजी भय घालती केलरी डोळे वटारता बायको देऊ मोत्यांच्या सरी येता ताटात पुलाव शोधू काजूचे काप कसा टाकू शिल्लक नको माथी पाप डायट मारती माथी इथे सारेच पापड* जो मारतो मिटक्या त्याला म्हणती खादाड कशी सरता सरेना शाक दाट वाटान्याची गच्च भरल्या पोटाला ओढ भारी मठ्ठ्याची *पापड : बारीक या अर्थाने.