कोबी कोफ्ता करी ..
आमच्या घरात कोबी म्हटले कि सगळे तोंड वाकड करतात मला स्वत:ला कोबी फार आवडतो. पण मग कधी कधी इतराना आवडत नाही म्हणून कोबी घेण आपोपाप टाळल जात म्हणून नेटवर कोबीच्या वेगवेगळ्या रेसेपी धुंडाळून हि रेसेपी मिळाली तिच्यात मी थोडे फार बदल केले न बनवली सगळ्यांना खूप आवडली देखील, म्हणून आता हा लेखन प्रपंच
साहित्य : (कोफ्त्यासाठी )
१) बारीक चिरलेला कोबी -२ वाट्या.
२) २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून.
३) लाल तिखट - १ छोटा चमचा
४) बेसन - १ वाटी
५) मीठ चवीनुसार
६) तळण्यासाठी तेल
७) कोथीबीर चिरुन - २ चमचे
कृती : चिरलेल्या कोबीत सर्व साहित्य मिसळून थोड किंचित पाणी घालून घट्टसर कालवून त्याचे लहान लहान गोळे करून घ्या न थोडे चपटे ठेवा म्हणजे आतपर्यंत तळले जातील . तेल गरम करून मध्यम आचेवर सर्व कोफ्ते तांबूस लालसर तळून घ्या .
आता ग्रेवि बनवु ..
साहित्य : -
१) ४ मोठे tomato
२) १ हिरवी मिरची
३) लाल तिखट - २ छोटे चमचे.
४ ) धने पावडर - १ चमचा .
५) जिरे पावडर - १ चमचा .
६) गरम मसाला - २ चमचे ( हा होम मेड गरम असला आहे आमचा )
७) आल लसुण पेस्ट - १ चमचा.
८) मीठ चवीनुसार.
९) ३ मोठे चमचे तेल.
१० ) हळद - १ छोटा चमचा
कृती : tomato धुवून त्यात १ हिरवी मिरची घालून त्याची मिक्सीवर प्युरी करून घ्या , कढइत तेल तापवून त्यात जिरे , चिमुटभर हिंग ,अन हळद घाला , आता त्यात आधी लाल तिखट घालून घ्या ( याने ग्रेविचा रंग लाल राहतो ) मग tomato प्युरी घाला परतून परतून घ्या अगदी तेल सुटेपर्यंत , मग अनुक्रमे गरम मसाला , धना पावडर ,जिरे पावडर घाला हे करत असताना शेजारी थोड पाणी गरम करून घ्या . सर्व मसाले निट परतल्यावर त्यात चवीनुसार मीठ घाला न तुम्हाला जशी ग्रेवी हवी त्यानुसार गरम पाणी घाला ,थंड पाणी घालण्यापेक्षा गरम पाणी घातल्यामुळे ग्रेवीची चव टिकून राहते. आता ४-५ मिनिट ग्रेवी मंद आचेवर निट उकळून घेऊन त्यात तळलेले कोबीचे कोफ्ते घाला , बारीक चिरलेली कोथीबीर घालून सजवा यात कसुरी मेथी हि घालतात. आता २ मिनिटे वाफ काढा कोबी कोफ्ता करी चापण्यासाठी तयार आहे
यात जरा कोफ्ते विर्घळेत ;) पण चालतय ;)
* तुम्ही यात कोबी ऐवजी बटाटा / भोपळा / मेथी / तुमची आवडती कुठलीही आवडती भाजी वापरू शकता.

वाचने
15402
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाण तेच्या मारी. पिवडे.
व्हेज मंचूरियन ह्या इंडियन
वा, टेंप्टिंग !
झक्कास एकदम. पिवशी रॉक्स...
जिल्बुचा भुकवलस !
आय हाय!
टिप्स बद्दल धन्स हो पुढल्या
In reply to आय हाय! by निशांत_खाडे
सही,पियु,झकास दिसाहेत कोफ्ते.
पिवशीला 'पियु' म्हणण्याचा
In reply to सही,पियु,झकास दिसाहेत कोफ्ते. by नूतन सावंत
हेल्लो, मी पण पियूच म्हणते
In reply to पिवशीला 'पियु' म्हणण्याचा by सस्नेह
सही,पियु,झकास दिसाहेत कोफ्ते.
फोटो! बघुनच तोपासु.ते कोफ्ते
फोटो! बघुनच तोपासु.ते कोफ्ते
हा ना.
In reply to फोटो! बघुनच तोपासु.ते कोफ्ते by इशा१२३
झक्कास. फोटो एकदम तोंपासु.
केवडा राॅक्स ;)
छान झालेत कोफ्ते
पियुशा, मस्त दिसतायत कोफ्ते.
आहा!
पाकृ आवडली
वाह!!!
कृती आवडली. कोफ्ते तसे मला
आमच्या सौ गाजर आणि गोबी किसून
In reply to कृती आवडली. कोफ्ते तसे मला by विवेकपटाईत
ओ विवेकजी ४ टमाटर टाकले आहेत
In reply to कृती आवडली. कोफ्ते तसे मला by विवेकपटाईत
पियु
लैच भारी.
ह्या सिर्यलींचे एपिसोड परत
त्यास पचडी असे म्हणतात!
In reply to ह्या सिर्यलींचे एपिसोड परत by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्हालाचं ठौक असणार. आम्ही
In reply to त्यास पचडी असे म्हणतात! by अत्रुप्त आत्मा
हातोडिमारात्मबंध
In reply to तुम्हालाचं ठौक असणार. आम्ही by कॅप्टन जॅक स्पॅरो
झकास लागते ही.फोटू छान.
वाव झक्कास रेशिपी..
एकदम मस्तं दिसताहेत कोफ्ते.
अरे वा , खंग्री दिसतायेत
लेकाला
वा!
पिवडे
पियुशा .. बर्याच दिवसानी ग.