Skip to main content

सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 17/03/2016 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

पाक-साहित्य संपदा

लेखक उल्का यांनी गुरुवार, 17/03/2016 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारी आशुतोष जावडेकर यांचा लोकरंग पुरवणीतील 'वा! म्हणताना… 'हा लेख वाचला आणि माझ्या कडील पाक-साहित्य संग्रह खूप दिवसांनी हाताळला. तेव्हा लक्षात आले की हल्ली बाजारात पाककृतीच्या पुस्तकांचे पेव आले आहे. काय बरे घेऊ मी? ह्या विचाराने नवीन पीढी बावरून जात असेल. तर माझ्या कडील पाक-साहित्य संपदेतील काही आवर्जून उल्लेख कराव्या अशा पुस्तकांचा मागोवा घेणारा लेख मी लगेचच लिहिला. तो इथे देत आहे. कोणाला उपयोग झाला तर आनंदच वाटेल मला. पाक-‘कला’आहे, पाक-‘शास्त्र’ आहे. अशा या कलेविषयी आणि शास्त्राविषयी मुबलक साहित्य मराठीत उपलब्ध आहे.

दवाई-ऐ-गुलजार!

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 17/03/2016 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
Gulzar इलाज करवाते हम वही से... जहा जख्म होते है दवाई के लिए जहां पल गुजरे बिना घडी के, जहां हो थोडीसी जमी थोडा आसमां, जहां चाँद पोहोचे बिना इजाजत के, जहां हो मुसाफिर का ठिकाना, जहां आए जाने वाला पल पलट के, जहां दो दीवाने एक शेहर मे, जहां सजते है सपने सात रंग के, जहां पहचान होती है आवाज से, जहां अरमां हो पुरे दिल के, जहां सपनों में दिखे सपने, जहां रात हो ख़्वाबों की, जहां गले लागए झिंदगी, जहां ना हो कोई शिकवा झिंदगी से, जहां नाराज न

मला आता वाटते की माझा फोटो नकोच.

लेखक विदेशी वचाळ यांनी गुरुवार, 17/03/2016 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मी कधीच फोटो जेनिक नव्हतो. जन्मा नंतर शक्यतो सगळे जण फोटो काढतात . पण माझ्यावेळी आमच्याकडे काळा पांढरा फ्लाष नसलेला कामेरा असल्यामुळे तो पण काढला नसावा. म्हणजे तो नाही आहे , अणि त्याचे करण तसे असावे असे वाटते . लहानपणी माझी संभावना "तेल्या मारुती" अशी झाली होती ते मला पक्के आठवते . मी मारुती सारखा केवळ त्या एका गोष्टी साठीच दिसायचो . तसे मला टुमदार पोट होते. मारुतीला मोठे पोट होते का नाही ते आठवत नाही. आमच्या वर्गातल्या मारुतीला भरपूर मोठे पोट होते. पण ह्या मारुतीचा त्या मारुतीशी नावापालीकडे काहीच संबंध नव्हता. ते काहीही असो पण , तेल्या असल्यामुळे फोटो कमीच!

व्हिक्टोरिया स्पॉंज संत्रा केक

लेखक सप्तरंगी यांनी गुरुवार, 17/03/2016 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
व्हिक्टोरिया स्पॉंज संत्रा केक साहित्य २००gm कॅस्टर शुगर २००gm बटर २०० gm सेल्फ रायझिंग फ्लोर ४ अंडी (मिडीयम साईझ) १ tsp बेकिंग पाउडर २ tbsp संत्रा जुस / २ tb sp दुध vanilla इसेंस कृती : १. अंडी दुप्पट होईपर्यंत ब्लेंडरनी फेटून घ्या. बटर-साखर वेगळे फेटा. सेल्फ रायझिंग फ्लोर आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या. २.

धूळ

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 16/03/2016 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
गाव तसं बरं वाटलं. हायवेलाच लागून होतं. गाव कसलं चार घरांची वस्तीच ती. डांबरीवरुन आत गेल्याशिवाय दिसली पण नसती. आडवळणाला एक देऊळपण होतं. तिथं चिटपाखरुपण नव्हतं. गावातल्या घराघरांत मिनमिनतं दिवं तेवढं दिसलं. बाकी सगळा अंधार. वेळ संध्याकाळची. सुर्य बुडून गेलेला. कानोसा घेत घेत देवळाकडं गेलो. देऊळ दगडी होतं. भरभक्कम. काळा पाषाण. अंधारात न्हाय म्हणलं तरी ते भेसूरच दिसत होतं. बाजूनं मोकळं मैदान आणि त्यापलिकडं घनदाट झाडी. बाकी वाऱ्यानं उडवलेली नुसती धूळ. गाभाऱ्यात एक पणती जळत होती. देव काय ओळखीचा नव्हता. हात जोडायची इच्छा कधीच मरुन गेलेली.

शृँगार ८

लेखक अनाहूत यांनी बुधवार, 16/03/2016 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी बराच उशीरपर्यंत झोपलो होतो . जाग आली आणि पाहिल तर मंजू अजूनही झोपली होती . ती इतका वेळ कधी झोपत नाही म्हणून पाहिले तर तिने डोळे उघडले आणि तिला बराच त्रास असल्याच जाणवल . ऑफिसला सुट्टी असल्यामुळे फार घाई नव्हती पण तिचा त्रास जरा जास्त वाटला त्यामुळे नुसता आराम न करता डॉक्टरांकडे जाण्याबद्दल तिला सुचवल . ती सुरूवातीला नाही म्हणाली पण तिला जास्त त्रास होत असावा ज्यामुळे ती तयार झाली डॉक्टरांकडे यायला .डॉक्टरांकडे पोहोचल्यावर पटकन नंबर मिळाला .

संमोहन आणि मानसोपचार

लेखक शि बि आय यांनी बुधवार, 16/03/2016 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
संमोहन किंवा मानासोपाचाराविषयी मी ह्या माझ्या " http://www.misalpav.com/node/32031 " मागील धाग्यात विचारणा केली होती. मानसोपचारतज्ञ संमोहनाद्वारे माणसाच्या मागील आयुष्यातील काही गोष्टी ठराविक उपचार पद्धतीचा अवलंब करून जाणून घेतात आणि त्यावर उपचार ही करतात. माझ्या जवळील व्यक्ती जेव्हा अशा प्रकारचे उपचार घेणार आहे असे समजले आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी काही साईट्स देखील पहिल्या परंतू त्या साईट्स वरील माहिती परिपूर्ण असूनही तशी समाधानकारक नाही वाटली म्हणून मग धाग्याचा प्रपंच करावा लागला.