Skip to main content

आक्की

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 23/03/2016 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
आक्की आली. फटफटीवर बसून. साधं वळून बघितलं पण नाही. फटफट गेली पुढे. पाठीमागं धूरच धूर. मग आमची गाडी काढली. क्रेट बांधलं. बाप म्हणाला बारक्यालापण घीऊन जा. मग बसलो मागं. गाडी पळाली. कॅनालच्या कडंला पत्र्याचं शेड. शेडमधी बाटल्याच बाटल्या. मिरींडा न पेप्सी. भरली क्रेटमधी. मग क्रेट घेऊन पुन्हा गाडीवर. क्रेटचा बॉटम मांडीत रुतला. गाडी निघाली भुरभुरभुरभूर. परत आल्यावर आक्की कुठं दिसली नाही. आधी कसं वाळूच्या ढिगाऱ्यावर. तवा तिचं लगीन नव्हतं झालं. पोरांना दगडं फेकून मारायची. वाळूचा ढिगारा तिच्या बानं आणून ओतलेला. पोरं चिडीचूप. शाळेत जायची सकाळीच. सायकलीवर. कराटे शिकायला. लाथा झोडायची.

Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग ३ --- महानायाकांचा करार

लेखक मोग्याम्बो यांनी बुधवार, 23/03/2016 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग १ Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग २ - स्पायडरमॅन एक स्वप्न स्पाइडरमॅनची चित्रपट मालिका परत का सुरु कली? फॅन्टास्टिक फोर चित्रपटांची पहिल्या मालिकेला फारसे यश मिळाले नव्हते तरी दूसरी मालिक त्यांनी का तयार केली? व्होलव्होरिन ह्या महानायकाचे फ़क्त त्याच्यावर संबंधित चित्रपट चालत नाहीत पण त्याचे सतत चित्रपट बनत आहेत, असे का होत आहे?

पट पट पट मोजीत नोटा

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 23/03/2016 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
पट पट पट पट मोजित नोटा चाले राजा नेता ओठावरती जीन मिसळूनी घेतो रुपेरी सोडा उंची फेरारी स्वतःस छान जनास करी ईंधन दरवाढ भाववाढ ती सामान्यांस अन स्वत: फिरवीतो स्कोडा नेता राजा फार हुषार सत्तेवर तो होता स्वार नुसता त्याला पुरे हवाला स्वीस अकौन्ट काढा सात सदनिका भूखंड सात बळकावितो हा एक दमात आला आला राजा नेता सोडा रस्ता सोडा मूळ कविता: टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा उंच भरारी दोन्ही कान ऐटीत वळवी मान कमान मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होता स्वार नुसता त्याला पुरे इशारा कशास चाबुक ओढ़ा सात अरण्ये समुद्र सात ओ
काव्यरस

होळीचे रंग

लेखक nashik chivda यांनी बुधवार, 23/03/2016 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, लिहण्याचा पहिल्यापासूनच कंटाळा असल्याने फ़क्त होळीचे रंग दाखवणारी छाया चित्रे प्रकाशित करीत आहे स्थळ - बरसाने, मथुरा कॅमेरा - निकोंन डी ७५० ५० मीमी आणि २४-१२० . .

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

लेखक गॅरी शोमन यांनी बुधवार, 23/03/2016 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.

पूर्वी

लेखक शैलेन्द्र यांनी बुधवार, 23/03/2016 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी म्हणे जग फार फार छान होत पिंपळाला सोन्याचं खर खर पान होत पूर्वी म्हणे विमान आमचे आकाशात उडायचे धनुष्याच्या लढाईनंतर तिथून फुलं पडायचे बाण घेवून आमचे ऋषी समुद्राला नडायचे साध्याश्या गाईसाठी पण राजाशी लढायचे पूर्वी म्हणे शेतात सकस अन्न पिकायचे बालपणी बचावलेले शंभर वर्ष टिकायचे एका एका गर्भाचे शंभर क्लोन करायचे मोठे मोठे राजे साध्या क्षयाने मरायचे आत्ता आत्ता चाळीत माणुसकी नांदत होती रोज सकाळी नळावर पाण्यासाठी भांडत होती आपल्या वाट्याची मिलो प्रेमाने कांडत होती भरलेल्या एसटीमधून गावो गाव सांडत होती जे होते जसे होते त्याला आपला नमस्कार जिथे आहोत बरे आहोत नको आता माघार आमचं

ताम्हणकर

लेखक हकु यांनी बुधवार, 23/03/2016 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज अनेक वर्षं झाली मी आमच्या आळीतल्या गणेशोत्सवात उत्साहाने कार्यरत आहे. जसं वर्षं नवीन तशी सजावट नवीन, मूर्ती नवीन आणि संकल्पना सुद्धा नवीन. पण तसं बघायला गेलो तर दर वर्षीच्या या गणेशोत्सवाची कथा, पटकथा, पात्रे आणि अगदी संवाद सुद्धा जसेच्या तसे असतात. जरी वर्ष नवीन असलं तरी जणू काही आपण मागेच पाहिलेल्या एखाद्या चित्रपटाचे 'रिपीट टेलिकास्ट' पाहतोय असा भास व्हावा. नाही म्हणायला दर वर्षी 'बावा', 'शिरी', 'वाचव' अश्या निरर्थक शब्दांची भर पडत असते इतकेच. मात्र या चित्रपटाची नेहमीची सर्व पात्रं उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण.

हिवाळ्यातला लदाख - चादर ट्रेक आणि बर्फाच्या गुहेतील एक रात्र (भाग ४)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी मंगळवार, 22/03/2016 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
जागरणहा लेख ३० जून २०१३ ला जागरण पेपर मध्ये छापून आला होता. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिवाळ्यातला लदाख - चादर ट्रेक आणि बर्फाच्या गुहेतील एक रात्र (भाग ४)

मागील पानावरून ............ भटकंती हि काय कोणती शर्यत नाही कि जो

मिपा विडंबन स्पर्धा २०१६ - मतदानापूर्व चाचणी - (भाग १/९८७६५४३२१०)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 22/03/2016 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर सध्या विडंबन स्पर्धेसाठी जोरदार मतदान चालु आहे. कधी एक कविता पुढे जाते तर कधी दुसरी. या स्पर्धेवर देशविदेशातल्या बडयाबड्या लोकांचे लक्ष आहे असे मला खुद्द एका साहित्य संपादकाने सांगीतले. परवा तर म्हणे मोदीसाहेबांनी स्वतः फोन करुन या स्पर्धेचा सविस्तर आढावा घेतला. कोणती कविता बाजी मारणार यावर म्हणे मोठा सट्टाही चालला आहे. मिपावरचे जेष्ठ विष्लेशक आदरणीय श्री क्लिंटन साहेब सुध्दा या मतदानावर लक्ष ठेवुन आहेत. मतदानपूर्व चाचणीचा एक धागा काढावा असे पण त्यांच्या मनात होते. पण सध्या क्लिंटन सरांचे सगळे लक्ष हिलरीताई आणि ट्रंपकाकांकडे आहे.