Skip to main content

भारताबाहेरील हिंदू मंदिरे - भाग २ - हिंगलाज माता शक्तीपीठ, बलूचिस्तान (पाकिस्तान)

लेखक विद्यार्थी यांनी शनिवार, 26/03/2016 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
================== भाग १ ================== हिंगलाज माता शक्तीपीठ, बलूचिस्तान (पाकिस्तान) भारतीय उपखंडामध्ये देवी सतीची (पार्वती) ५१ शक्तिपीठे आहेत. हिंगलाज माता शक्तीपीठ (हिंगलाज देवी, हिंगुला देवी) पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतामधील ल्यारी जिल्ह्यातील हिंगलाज या गावात आहे. हिंगोल नदीकाठच्या निसर्गरम्य परिसरातील एका डोंगराच्या गुहेत हे मंदिर आहे. पाकिस्तानातील मुस्लिम लोक या मंदिराला नानी का मंदिर म्हणूनही ओळखतात.

अनबॉक्सिंग सेनहायजर सी एक्स ३.०

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 25/03/2016 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
P1 माझा हा दुसरा सेनहायजर हेडफोन आहे,पहिला एचडी २०२ अनुभवला होता. हा अनुभवच मला इतका भावला की मी सी.एक्स ३.० घेण्याचा निर्णय घेतला.हे तर मूळ कारण झाले... अजुन इतर कारणही होती,जसे आधीचे स्कलकँन्डीचे हेडफोन्स बराच काळ वापरले आणि आता ते कधी बाद होतील याची काही टोटल लावता येणार नाही. ;) एचडी २०२ अनुभव घेउन मला माझ्या कानाची सवय बदलणे काय ते कळले... आधी ऐकलेल गाणं पुन्हा वेगळं का भासतं ? मग आधी ऐकलेली गाणी परतं ऐकुन पाहिली.

सु.शिं.चे मानसपुत्र

लेखक अजिंक्य विश्वास यांनी शुक्रवार, 25/03/2016 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या काही आठवड्यात मी तुम्हाला सु.शिं.च्या मानसपुत्रांच्या काही खास गोष्टी सांगेन. २ मानसपुत्रांच्या जन्मकथा, आणि ४ मानसपुत्रांची वैशिष्ठ्ये. ( अर्थात सु.शिं.नीच लिहिलेली) आणि ब्लॅक किंगच्या गॅंगबद्दल पण (माझ्या आवडत्या मंदार कथा) हे सर्व सु.शिं.नी आधीच सांगितले आहे. मी फक्त तुमच्या आठवणींवरून धूळ झटकायचा प्रयत्न करणार आहे. यात तुमचाही सहभाग अपेक्षीत आहे. चला तर मग- आजची सुरूवात ’दारा बुलंद’ पासून- कादंबरीतील नायक दारा ’बुलंद’ हे व्यक्तिमत्त्व वास्तव मुळीच नाही; आणि या नायकाकडून तसं असण्याची अपेक्षाही नाही-!

१०५( की १०७?) हुतात्मे आणि वेगळा विदर्भ

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 25/03/2016 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे. वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा. मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून.

छोटी राज्ये

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 25/03/2016 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
. महाराष्ट्रामधे गेले काही दिवस गाजत असलेला मुद्दा म्हणजे छोटी राज्ये. वेगळी राज्ये, छोटी राज्ये या मुद्यावर अणेंची सोपी विकेट घेण्यात आली. पण एक लक्षात घेणे गरजेचे आहे. एका अणेंवर जबाबदारी टाकून उपयोग नाही अटलजींच्या काळातच ३ नवी राज्ये अस्तित्त्वात आली होती.

आडवाटेची भ्रमंती - जांभे धरण

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 25/03/2016 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
धुळवडीला दर वर्षी ट्रेक होतोच, पण या वर्षी अति उन्हाळा असल्याने ट्रेक न करता नुसतेच कुठे फिरून येत येईल का या विचारात होतो, ठिकाण पण हटके हवे, म्हणून कंजूष काकांशी बोलणे झाले, त्यांनी सुचवलेला जांभे धरणाचा प्रस्ताव आवडला.यावेळी बाईक ने जायचे नाही असे ठरवले होते. मध्य रेल्वेच्या आसनगाव स्टेशन पासून शहापूर,तिथून नेरवली गावापर्यंत बस(२०किमी),पुढे दीड दोन किमी चालत असा मार्ग होता.

मेट्रो प्रवासात मनुस्मृति वर चर्चा - ब्राम्हण आणि शुद्र

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 25/03/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल. जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही.

हॅप्पी बर्थडे व.पु.

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 25/03/2016 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
'One for the road' असलेल्या या जगात कायम 'जेके मालवणकर' सारखं जगण्याची प्रेरणा देऊन माझ्या 'पार्टनर' असलेल्या 'सखी' शी कायम प्रामाणिक राहण्याची शिकवण देणारा 'दोस्त' म्हणजे व.पु. तुला माहितीये गेल्या वर्ष भरात कित्येक जणांनी 'रंग मनाचे' दाखवलेत. या दुनियेच्या 'भूलभुलैया' मध्ये 'माझं माझ्यापाशी' काहीच राहिलेलं नसताना मनात प्रेरणेचा 'हुंकार' भरून या 'तप्तपदी' वर चालण्याचं बळ तूच दिलंस. तुझ्या प्रत्येक शब्दांत एक जादू भरलेली आहे, जी जगण्याची अखंड प्रेरणा देत राहते.