Skip to main content

आडवाटेची भ्रमंती - जांभे धरण

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 25/03/2016 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
धुळवडीला दर वर्षी ट्रेक होतोच, पण या वर्षी अति उन्हाळा असल्याने ट्रेक न करता नुसतेच कुठे फिरून येत येईल का या विचारात होतो, ठिकाण पण हटके हवे, म्हणून कंजूष काकांशी बोलणे झाले, त्यांनी सुचवलेला जांभे धरणाचा प्रस्ताव आवडला.यावेळी बाईक ने जायचे नाही असे ठरवले होते. मध्य रेल्वेच्या आसनगाव स्टेशन पासून शहापूर,तिथून नेरवली गावापर्यंत बस(२०किमी),पुढे दीड दोन किमी चालत असा मार्ग होता. पहाटे ६.१४ ची आसनगाव पकडली,काका,मी आणि माझा एक मित्र असे तिघेच होतो.आसनगाव ते शहापूर रिक्षा मिळाली (१० रुपये सीट).तोथून शहापूर डेपो ला पोचलो.लगेचच ७.२० ची बस मिळाली.साधारण अर्ध्या तासात नेरवणे गावात पोचलो.वातावरण मस्त गार होते.बसमधून उतरल्यावरच मन एकदम प्रसन्न झाले.अशा चेंज ची खूप गरज असते. फ्स्दफ्स गाव जेमतेम २०-३० घरांचे असावे.एक माणसाला धरणाचा रस्ता विचारून पुढे निघालो.सगळीकडे पक्षांची किलबिल सुरु होती.धरण क्षेत्राखालचा परिसर असल्याने सगळीकडे छान हिरवेगार होते.मार्च महिना सुरुये असे अजिबात वाटत नव्हते. rfesf xc ddasd वाटेत काका बरीच पक्षांची माहिती देत होते.पाणी भरपूर असल्याने शेते चांगलीच डवरलेली होती.असेच पाणी सर्वांनी वाचवले तर मराठवाडा, विदर्भ देखील असाच हिरवागार दिसेल असे वाटून गेले.या शेतकर्यांनी केलेली एक चांगली गोष्ट म्हणजे झाडे अजिबात न तोडता आजूबाजूने शेती केलेली होती.मध्येच वाट वाकडी करून एका शेतात घुसलो. सडसड ds एका बाजूला ज्वारी आणि दुसर्या भागात भरपूर भाजी लावलेली होती, एका आंब्याखाली दोन गायी एक म्हैस बांधलेली होती,चिकूची दहा बारा झाडे लगडलेली होती.एकूण एकदम पिक्चर परफेक्ट दृश्य होतं gg फड मग पुढे धरणाकडे कडे निघालो,मध्येच मोहाचा सुगंध आला.बाजूलाच मोहाचे झाड होते,त्याची टपोरी फुले खाली पडत होती.हि खायला भारी लागतात, गोडसर आणि एक स्पेसिफिक सुगंध. मोहाचे झाड स्फ्दफ्द फुले qssd काही वेळातच धरणावर पोचलो,इथे जर झाडी जास्तच दाट झालेली होती.सगळी कडे धुक्याची चादर लपेटली गेली होती.भरपूर पाणी होते.महत्वाची गोष्ट म्हणजे "शांतता". पक्षांचा सोडला तर अजिबातच कसला आवाज नव्हता.इथे बराच वेळ बसलो. सडसड दावड wdd खाली मासे पकडणाऱ्यांचे एक घर होते, कसलेसे ऑफिस सुद्धा होते.तिकडे चहा मिळेल का म्हणून चौकशी केली पण नाही मिळाला. sds धरणातले पाणी वरून खाली येत होते. क्फ्द्फ ddsads ds थोड्यावेळाने निघालो, आता पोटपूजेची सोय बघायची होती.येताना परत त्याच शेतात आंब्याखाली पसरलो.बांधावर मस्त हातपाय तोंड धुवून फ्रेश झालो. वेज चिज सॅन्ड्विच,लसून चटणी-पोळ्या,द्राक्ष, केळी, लाडू,आणि अजून काय काय असा भारी बेत होता.खाऊन झाल्यावर मस्त पैकी तिथेच आडवे झालो, आता करण्यासारखे काहीही नव्हतेच.शांतता ऐकत कसा वेळ गेला समजला नाही, काका त्यांच्या भटकंतीचे भरपूर किस्से सांगत होते, त्या मानाने आपण काहीच फिरलो नाही याचीची खंत वाटत होती.थोड्यावेळाने सगळे आवरून परतीला लागलो. आता भयंकर उन्ह तापलेले होते.सकाळचा गारवा कुठच्या कुठे गेलेला होता.बस येते त्या जागी आलो.अजून एक तास वेळ असल्याने तसेच उगाच बसून राहिलो. गावात धुळवड असल्याने सोंग नाचत आली.फुल तर्राट. आमच्या सोबतच्या एका गावकर्याने मग "अरे ए पावन हैती, जा गावात हिगडे नगा त्रास देऊ" म्हणत त्यांना पळवून लावले. बस येईस्तोवर मग उगाच गप्पा मारत बसलो.बरोबर एक ला बस आली. आणि परतीचा प्रवास सुरु झाला. ffg

वाचने 17358
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

मस्त छोटेखानी भटकंती. कंजूसकाका, नूलकरकाका ह्यांसारख्या दर्दी माणसांसोबत भटकायला खूप मस्त वाटतं. ह्यांच अनुभवविश्व समृद्ध आहे. सतत काहीनाकाही माहिती आपसूकच मिळत जाते.

In reply to by एस

पुण्याहून यायचे म्हणजे गाडी असेल तर पुणे- नगरमार्गे मुरबाड तिथून शहापुर . किंवा मग ट्रेन ने कल्याणला येऊन पुढे लोकल

In reply to by स्पा

पुणे- नगरमार्गे मुरबाड कल्याण - नगर रोड वर आळेफाटा आहे. पुण्याहून आळेफाटा आणि तिथून कल्याणला एस.टी. ने जातांना कल्याणच्या (नक्की आठवत नाही पण) ~ अर्धा तास आधी आहे मुरबाड.

मस्त ठिकाण आहे.छान झालेली दिसते निवांत भटकंती. आमच्या भागातल्या धरणांना चक्कर मारायला हवी वाटायला लागलं ही भटकंती वाचून. कंजूस काकांना तीही ठिकाणं माहित असणार यात संदेह नाही!

वाचून अन फोटो बघून एकदम मस्त वाटलं!

मस्त फोटो काढतो स्पा.मला तो दृष्यातला फोटो कसा शोधतो ते आवडलं. नेरवली नाही ने ह रो ली. मुंबई ठाणेकरांनी पावसाळ्यात नक्की जावे.हे धरण लगेच वाहते आणि भिंतीवरून वाहणारे शुभ्र पाणी मस्तच. पुण्याहून येण्यासाठी : मागे कशेळेलेला आलात तोच रस्ता परंतू कशेळे येथे उजवीकडे आत वळायचं नाही पुढे मुरबाडला जायचं.(वाटेत म्हसा येथेही उजवीकडे सहा किमिवर एक जांभुरडे तलाव सिद्धगडाच्या पायथ्याशी आहे.) मुरबाडवरून शहापुर रस्ता आहे त्या रस्त्याने लेणारखुर्द येथे उजवीकडे नेहरोली गाव आहे.पुण्याकडून तसं बरंच दूर आहे. #रसायनीपासून जवळ जांभिवली/सवणे गावचा पाटबंधारे तलाव आहे.रम्य ठिकाण रिलाअन्स पेट्रो जवळ आहे.याविषयी मागे एकदा लिहिलं होतं.

छोटेखानी वृत्तांत आवडला. फोटो स्पाटच. मोहाची फुलं पाहून वृत्तांतात काही तपशील वगळले असतील का असे उगाच वाटले. ;) -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सही पहचाना डाॅक :D

भारी रे स्पावड्या. महिन्द्रा कमांडरचा दुसरा फोटो लै आवडला. त्यांची अ‍ॅड कॅम्पेन अशीच असायची. जीप हिरवी/खाकी असायची फक्त. ;)

वाह,किती सुंदर प्रचि अन सुरेख वर्णन ! स्पावडुभाऊ, तुमच्या bबरोबर जाम्भे धरणाची सहल करtताना मजा आली. मस्तच !

अजून एका अनवट पर्यटन स्थळाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद ही जागा सुनियोजित पद्धतीने विकसित झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळू शकतो सरकार ला कर आणि पर्यटकांना एक अजून पर्याय

पांSsssssssssडूSsssssssss ऊऊऊऊ http://www.freesmileys.org/smileys/smiley-hug001.gif वाईट्ट काडलीव फोटू तू पांडू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif आत्ताच्या आत्ता तिकडं जाऊ वाटायलय! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif दुत्त दुत्त ! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

स्पा, फोटो आवडले. कंजूसकाकांनी दिलेले फोटो दिसत नाहीयेत मला.

मस्तं रे. बरेचं दिवसात अश्या भटकंतीला जायला नाही मिळालं :(!!!!!!!!! तो वठलेल्या झाडाचा फोटो एक नंबर आलाय.

फोटो आणि वर्णन दोन्ही छान! स्वाती

या जागी जाणं आलं आता.

क्या बात हे ! किती सुंदर जागा.. अशा अपरिचित जागांवर जायला हवं. कंजुस काकांचे लेख शोधुन वाचायला हवेत. तुमचे फोटोज पण झकास !

क्या बात हे ! किती सुंदर जागा.. अशा अपरिचित जागांवर जायला हवं. कंजुस काकांचे लेख शोधुन वाचायला हवेत. तुमचे फोटोज पण झकास !

सुंदर भटकंती आणि अफाट मस्त फोटो. छानच ठिकाण निवडलंय रे.. आवडली भ्रमंती

मस्त भटकंती...धरणात डुंबला नाही वाटते?

सुंदर!

खुपच सुंदर फोटो ! ॐ किल्कक्लिकफोटोकाढनाथाय पांडुब्बाय नमः !