Skip to main content

मिपा विडंबन स्पर्धा - निकाल

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 28/03/2016 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा मोठी रंगतदार झाली. आणि तिच्यात रंग भरण्याचं काम स्पर्धकांनी जितकं चोख केलं, तितकंच मतदात्यांनीही केलं. प्रेम, राजकारण, फजिती अशा तीनही विषयांच्या प्रवेशिकांना भरपूर मतदान झालं. वाचकांनी त्यांचा मनसोक्त आस्वादही घेतला. बुरा ना मानो होली है! ही उक्ती सार्थ ठरवत अवघ्या मिपाविश्वाने या सगळ्याची मजा लुटली. आता शेवटचा टप्पा; निकालाचा. प्रत्येक विषयाचे अग्रणी तीन क्रमांक इथे जाहीर करत आहोत.

लिफ्ट

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 28/03/2016 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
'लिफ्ट' जाम पाऊस पडत होता, रात्रीचे ११वाजत आलेले, एक रिक्षा थांबायला तयार नाही, शंभर टक्के भीजलेलो, तेव्हढ्यात एक स्कूटरवाले काका थांबले, हेल्मेटवरची फुटलेली काच वर करत 'कुठे जायचय' ची खूण केली, मी म्हणालो... 'डेक्कन' मागे बसायची खूण केली, मी पटकन जाऊन सवई प्रमाणे उगाच सीट हातानी झटकुन बसलो, अर्धा तास भिजल्यानी थंडीने कुडकूडत होतो, त्यात लांब पाय टाकून स्कूटर वर 'आई आई ग्ग'करत कसाबसा बसलो... क्रैंम्प आलेला बेक्कार! काका मागे न वळताच, काय झालं रे?ची 'खुण करत' तोच हात झटकनी गीयरवर टाकून जोरात पिकअप घेतला, मला काहीच उत्तर देता येई ना, ओठ-दात चावत अभाळाकडे पाहत...

“उभारू आपण गुढी!”

लेखक उल्का यांनी सोमवार, 28/03/2016 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
( हल्ली जमाना आहे ‘एक्स्चेंज ऑफर’चा! अशीच एक ऑफर येते ‘रिडेवलपमेंट’ची. जुन्या इमारतीच्या बदल्यात नवी कोरी दणकट इमारत! मग काय? जुन्या पिढीची 'जिवाची घालमेल'. नव्या पिढीची 'उत्साही लगबग'. पण, त्या जुन्या इमारतीला काय बरे सांगायचे असावे?

हिवाळ्यातला लदाख - लेह पैलेस आणि शान्ति स्तूप (भाग ६)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी सोमवार, 28/03/2016 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
1 . --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिवाळ्यातला लदाख - लेह पैलेस आणि शान्ति स्तूप (भाग ६)

मागील पानावरून ............ मी मोलभाव करून ३५०० ची चादर २००० ला ठरवली. ती चादर पैक झाल्यावर मी पैसे द्यायला लागलो तितक्यात एक लद्दाखी बाई तिथे आली.

पर्वचा

लेखक विद्यार्थी यांनी सोमवार, 28/03/2016 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही लहान असताना घरातील वयस्कर मंडळी (बहुतेकवेळा आजी) दिवेलागणीला आमच्याकडून पर्वचा म्हणून घेत असे. पर्वचा झाल्यानंतर मराठी वार, मराठी महिने, मराठी तिथी वैगेरे घोकून घेतले जाई. जसे मोठे झालो तसे त्यात पाढेसुद्धा सुरु झाले होते. पर्वचा म्हणण्याची परंपरा अलीकडे लोपच पावली आहे असे म्हणता येईल (अगदी माझा मुलगासुद्धा हे काही करत नाही आणि घरात आजी-आजोबा नसणे हे कारण त्यामागे असू शकते.) गम्मत म्हणून आम्ही रोज म्हणत असणारे श्लोक येथे टाकत आहे. पर्वचा म्हणण्यासाठी माझ्या मुलाच्या मागे लागण्याची प्रेरणा यातून मला होत आहे (यश कितपत मिळेल माहित नाही).

माझी ज्यूरी ड्युटी १

लेखक शेंडेनक्षत्र यांनी सोमवार, 28/03/2016 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत रहाणारे देशी लोक दोन गोष्टींना घाबरून असतात एक म्हणजे टॅक्स ऑडिट अर्थात आयकर खात्याची धाड. भारतात ती बड्या फिल्म स्टार, उद्योगपतींवर पडते. इथे तसे नाही कुणाकडेही पडू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यूरी ड्युटीचे आमंत्रण! अनेक देशी लोक हे असले बोलावणे टाळण्याकरता वर्षानुवर्षे ग्रीन कार्ड बाळगून असतात. शक्य असूनही नागरिक बनत नाहीत. काय असते हे? अमेरिकन न्यायसंस्थेत खटला चालवण्याकरता ज्यूरी हा एक मोठा महत्त्वाचा घटक आहे. आरोपी, फिर्यादी, दोन्ही बाजूंचे वकील, न्यायाधीश हे तर आवश्यक आहेतच.

घी देखा पर ......... ...... .........

लेखक पुणे मुंग्रापं यांनी रविवार, 27/03/2016 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत ग्राहक संरक्षण कायद्याच्या मदतीने ग्राहकांनी कसा न्याय मिळवला याच्या काही सत्यकथा आतापर्यंत आपण वाचल्या. मात्र आजची कथा त्यापेक्षा निराळी आहे. या कायद्याचा दुरुपयोग व्यापारी, उत्पादक तसेच सेवा पुरवणारे इ. ना त्रास देण्यासाठी किंवा 'एखादा जुना हिशोब चुकता करण्यासाठी' केला जाऊ नये अशी तरतूदही या कायद्यात केलेली आहे, हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे.

स्वस्तात लेह २०१६

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी रविवार, 27/03/2016 17:08 या दिवशी प्रकाशित केले.

स्वस्तात लेह २०१६

युथ होस्टेल असोसियान ऑफ इंडिया हि ना नफा ना तोटा यावर चालणारी संस्था आहे. ती ट्रेकर साठी वेगवेगळे ट्रेक भारतभर आयोजित करते. तसेच फैमिली असणार्यांसाठी पण ती ट्रेक चे आयोजन करते. यावेळी पण लेह साठी बुकिंग चालू झाली आहे. बहुतेक जागा बुक झाल्या आहेत थोड्याच शिल्लक आहेत. त्यांचे नियम, अटी आणि फायदे पुढील प्रमाणे. 1) तो प्रथम युथ होस्टेल असोसियान ऑफ इंडिया चा मेंबर असावा. मेंबरशिप ऑनलाइन पण मिळवू शकता. फी वर्षाला २२० रुपये आहे.

रघू दिक्षित एक प्रोजेक्ट

लेखक मित्रहो यांनी रविवार, 27/03/2016 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
“यावेळेस कोण येनार आहे तुमच्या ऑफिसच्या पार्टीला?” “न ऐकलेले नाव आहे. कुणी रघू दिक्षित ” नाव बदलले तरीही हा संवाद दरवर्षीचाच, नांव ओळखीची असली तरी कार्यक्रमला जाण्याचा उत्साह आणि प्रतिक्रीया ही अशीच असते. कुणीतरी येनार, चार गाणी म्हणनार, अर्धी बॉलीवुडची काही तॉलीवुडची. आपण पोर सांभाळायची, गर्दीतून रेटारेटीतून खाण्याच्या प्लेट आणायच्या, पोरांना खाउ घालायचे मग आपण खायचे. हे सार करीत असताना वेळ मिळेल तसे स्टेजवर चाललेले गाणे ऐकायचे. पार्टी फक्त खाण्यासाठी असते असे वाटावे इतकी गर्दी खाण्याच्या काउंटरवर असते आणि गायकाच्या अगदी समोरच्या खुर्च्या देखील रिकाम्या असतात.