Skip to main content

विद्यार्थ्यानी केलेले संशोधन (एक संकलन)

लेखक अत्रे यांनी गुरुवार, 31/03/2016 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
"अमुक अमुक च्या विद्यार्थ्याने लावला तमुक तमुक चा शोध" बऱ्याचदा वर्तमानपत्रात या आशयाच्या बातम्या येत असतात। त्यांचे एका ठिकाणी संकलन करावे, जेणेकरून कोणाला संशोधनात रुची निर्माण होईल/नवीन कल्पना सुचतील, या उद्देशाने हा वाहता धागा सुरु करत आहे। तुम्ही सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हाल अशी आशा करतो।

मराठी भाषिकां साठी उपयुक्त Android Apps

लेखक साहना यांनी गुरुवार, 31/03/2016 05:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषिक लोकांसाठी अनेक Android Apps उपलब्ध आहेत. त्यातील काही Apps ची हि ओळख. काही एप राहून गेली असल्यास कमेंट मध्ये टाका. ह्यातील कोणतीही app तुमच्या कडे आधीपासून आहेत तर जरूर सांगा.

१. DailyHunt [ इथे टिचकी द्या ]

भारतीय भाषां मधून बातम्या आणि पुस्तके उपलब्ध करून देणारे अतिशय चांगले एप आहे.

मराठी अनुवादः सबसे खतरनाक होता है - कवी 'पाश'

लेखक तर्राट जोकर यांनी गुरुवार, 31/03/2016 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
अवतार सिंह संधू बर्‍याच कारणांनी गाजलेले कवी. वयाच्या फक्त अडतिसाव्या वर्षी खलिस्तानी अतिरेक्यांनी ह्या माणसाला उडवलं. ह्याचा गुन्हाही साधा सुधा नाही. हा माणूस डाव्या विचारधारेतला. धारदार कविता करणारा. नक्षलवादी चळवळीतला, राजकारणात पुढे आलेला, नक्षलवाद्यांचा कवी म्हणवला जाणारा पण शिख उग्रवाद्यांच्या हिंसाचाराचा विरोध करणारा. त्याच्या कवितांमधून त्याचे डावे विचार स्पष्ट दिसतात. पण आहेत विचार करायला लावणार्‍या. अशीच एक कविता मला खूप आवडलेली. माझ्या अल्पबुद्धीने केलेला अनुवाद सादर करतो.

बचपन के दिल भुला न देना .......१

लेखक शान्तिप्रिय यांनी बुधवार, 30/03/2016 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
बचपन के दिन भुला न देना आज हसे कल रूला न देना ------------------------- एक सामान्य लेख बालपणाच्या आठवणीवर लिहित आहे. बालपणीच्या आठवणी हा निश्चितच प्रत्येकासाठी एक अनमोल ठेवा असतो. मग मी त्याला अपवाद कसा? आज नोकरी , ऑडीट ,मिटींग अप्रैजल अशा रुक्ष गोष्टीनी आपल जग व्यापून गेले असताना या आठवणी निश्चितच आपल्याला एक सुखद गारवा देउन जातात. प्राथमिक शाळेत असतानाचे वय म्हणजे , आई बाबांच्या लाडात तसेच तितक्याशा महत्त्वाच्या नसलेल्या शाळेत (त्या काळी ८० च्या दशकात) बागडण्याचे दिवस.

पूर्वेच्या समुद्रात - १८

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 30/03/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात - १७ अधिक समानता विशाखापटणमच्या कल्याणी या रुग्णालयात काम करीत असताना एक दिवस आर्मीचा सुभेदार सोनोग्राफीसाठी आला होता. त्याला(रुग्णाला) कोणताही त्रास नव्हता पण तपासणीत त्याच्या पित्ताशयात खडे निघाले. सुभेदार साहेब राजस्थानात बाडमेरच्या जवळ नियुक्तीवर होते. त्याना मी त्यांच्या तपासणीचा अहवाल दिला. काय आहे ते समजावून सांगितले. त्यावर ते म्हणाले सर मी तर याच्या अगोदर सियाचेनला होतो आणी मला कोणताही त्रास नाही. या खड्यांच्यामुळे मला बढती मिळायला काही अडचण येईल का?

मार्ग मुक्तिचा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 30/03/2016 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
तहानलेली नदी पाण्याच्या शोधात भटकत होती भयाण वाळवंटात. उडणार्या गिधाडास विचारले तिने भाऊ मिळेल का कुठे जीवनदायी पाणी. पाण्याचे विचारू नको सापडेल तुला पुढे ताई मार्ग मुक्तिचा. एका वळणावर नदीने पहिले शुष्क वडाच्या फांदीवर लटकलेले होते एक प्रेत. झाडाखाली साचलेला होता एक ढीग मोठा कवट्यांचा खेळत होती त्यांच्या सवे गिधाडांची गोंडस पोरे फुटबॉल फुटबॉल. टीप: कवितेचा अर्थ शोधण्यास वाचक स्वतंत्र आहे.

इवल्या त्या डोळ्यांमध्ये

लेखक अभिषेक पांचाळ यांनी बुधवार, 30/03/2016 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
इवल्या इवल्या डोळ्यांना , आस किती मोठी आहे निडर होऊन लढते वेडे , काळ त्याच्या पाठी आहे वादळाची फिकीर मनी , थोडीसुद्धा उरली नाही स्वप्न अधुरे राही , अशी रात कधी सरली नाही जिद्द तरी येते कशी , विचार करी दाही दिशा शंका करती फितूर सारे , केली याने दारू नशा पहाडही ते धस्की घेऊन , जागेवरती टिकून राहते अंगावरती बागडताना , लाटही त्याला दुरून पहाते दिली जरी हि कठोर शिक्षा , जमीन कशी याचा पायाखाली त्रास देऊन तऱ्हेतऱ्हेचा , नियातीही मग बेजार झाली उरले सुरले बळ लावूनि , सारे येती अंगावरती प्रहार करता पूर्ण शक्तीने , नाईलाजाने मागे फिरती गूढ जणू ते लपून बसले , हरेकाच्या कोड्यांमध्ये आसमंतही शांत नि
काव्यरस

शेवग्याच्या शेंगांची भजी-दोन प्रकार.

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 30/03/2016 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
शेवग्याच्या शेंगांची भजी-दोन प्रकार. कोकणपट्ट्यातल्या बायका सुगरणी खऱ्याच.एकाच भाजीचे वेगवेगळे प्रकार करून संसार चालवणे यांना उपजतच जमते. प्रत्येक दारात शेवग्याचे झाड असतेच.

मराठी अनुवाद: शहर का व्याकरण - कवी धूमिल

लेखक तर्राट जोकर यांनी बुधवार, 30/03/2016 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कवी धूमिल ह्यांची शहर का व्याकरण ही कविता वाचली, फार दुर्बोध वाटते. तरी अनुवाद करावीशी वाटली. काही चुकलं असेल तर दुरुस्ती सुचवावी.

आकार

लेखक वैशाली अर्चिक यांनी बुधवार, 30/03/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी २०१३. स्थळ- १०वीचा वर्ग. उपस्थित मंडळी- मी, माझी मुलगी, वर्ग शिक्षिका व भूमितीचा पेपर. “ इतना सन्नाटा क्यूं है भाई?” म्हणण्यासारखी परिस्थिती. पेपरमध्ये पेन्सीलीने काढलेल्या त्रिकोण, चौकौन ह्यांपेक्षा लाल शाईतील गोल जास्त होते. आधीच आकड्यांशी ३६ चा आकडा असलेल्या माझ्या मुलीला आता भूमितीतील वेगवेगळ्या आकारांनीसुध्दा छळायला सुरुवात केली होती! वेगवेगळ्या आकारातील त्रिकोण, त्रिज्या, कोन व प्रमेय ह्यांनी तिचा जीव मेटाकुटीस आला होता. पण लवकरच हे शत्रुत्व मैत्रीत रुपांतरीत झाले जेव्हा तिने कमर्शियल आर्टसला प्रवेश घेतला. तिथे ह्याच आकारांमध्ये ती अक्षरशः गुंगून गेली.