Skip to main content

काही अपरिचित वाद्ये

लेखक विजय पुरोहित यांनी शुक्रवार, 01/04/2016 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
यूट्यूबवर सर्फींग करत असताना काही अपरिचित तरीही अतिशय नादमधुर वाद्यांशी संबंधित व्हीडीओज पहायला मिळाले. त्यांच्याशी संबंधित यूट्यूब दुवे येथे मुद्दाम टेक्स्ट स्वरुपात डकवत आहे जेणेकरुन आपणांस ही त्यांचा आनंद घेता येईल. तसेच त्या त्या वाद्याशी संबंधित विकीपीडियावरील माहिती थोड्याफार प्रमाणात सोबत देत आहे. ते ते वाद्य कसे दिसते हे संबंधित यूट्यूब व्हीडीओत दिसेलच, त्यामुळे स्वतंत्र वर्णन करत बसण्याची गरज नाही. तसेच वाद्याचे मूळ इंग्रजी स्पेलींग मुद्दाम दिलेले आहे जेणेकरुन तुम्हाला तो कीवर्ड वापरून यूट्यूबवरील इतर व्हीडीओदेखील पाहता येतील.

भारताबाहेरील हिंदू मंदिरे - भाग ३ - श्री श्री ढाकेश्वरी मंदिर, ढाका (बांग्लादेश)

लेखक विद्यार्थी यांनी शुक्रवार, 01/04/2016 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
========================================== भाग १ - प्रंबानन मंदिर संयुगे - जावा (इंडोनेशिया) भाग २ - हिंगलाज माता शक्तीपीठ, बलूचिस्तान (पाकिस्तान) ========================================== भाग ३ - श्री श्री ढाकेश्वरी मंदिर, ढाका (बांग्लादेश) ढाकेश्वरी मंदिर हे सध्याच्या बांग्लादेशमधील सर्वात महत्वाचे हिंदू मंदिर आहे. राजधानी ढाका येथील ढाका विद्यापीठाच्या मागील बाजूस हे मंदिर आहे.

माझी ज्यूरी ड्युटी ३

लेखक शेंडेनक्षत्र यांनी शुक्रवार, 01/04/2016 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग आधीच्या भागात एक तपशील राहिला. प्रत्येक उमेदवार ज्युररला साक्षीदारांची यादी दिली होती. जर त्यातले कुणी ओळखीचे असतील तर हात उंचावून तसे सांगायचे होते. ह्या यादीत बलात्कारित स्त्रीही होती. पण कायद्याप्रमाणे तिचे आडनाव डो असे खोटेच ठेवले होते (अमेरिकेत ओळख न पटलेल्या पुरुषाला जॉन डो आणि स्त्रीला जेन डो असे म्हणण्याची पद्धत आहे. उदा. एखादा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला तर. त्याला अनुसरून). कुणाही ज्युररने ह्यातले कुणी आपल्या ओळखीचे आहेत असे म्हटले नाही. आता दोघे वकील रिंगणात उतरले. पाहिली पाळी सरकारी वकिलाची होती.

जर्मनीमध्ये एम.एस - माहिती

लेखक टुंड्रा यांनी गुरुवार, 31/03/2016 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनी हा देश अनेक गोष्टींमध्ये अत्यंत प्रगत देश समजला जातो. मेकॅनिकल इंजिनिअरसाठी तर जर्मनी म्हणजे पंढरीच! म्हणुनच मी इथे उच्चशिक्षण घेण्याचे ठरवले. जर्मनीमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षण मोफत आहे. त्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांशिवाय जर्मनी हा ही एक उत्तम पर्याय आहे. मेकॅनिकल इंजिनिरिंग मध्ये बी.ई केल्यानंतर अजुन थोड्याफार तयारीने मी जर्मनीतल्या डॉर्टमुंड ह्या युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवु शकले. सध्या मला जर्मनीमध्ये एम.एस कसे करावे ह्याची चौकशी करणारे फोन सतत येत आहेत.

बीज

लेखक gsjendra यांनी गुरुवार, 31/03/2016 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या बीजाला अंकूरायचे असते प्रसवायचे असते ते पाहत नाही तापमान किती डिग्री हवेत आर्द्रता किती पावसाची काही शक्यता वा मातीचा ओलसरपणा ते मातीत ढेकळात खडकाच्या फटीत इवल्या पालवीने उभारते अस्तित्वाची दखल आपल्या जगाला घ्यायला लावते
काव्यरस

फूसभाजी(कोवळ्या फणसाची भाजी).

लेखक नूतन सावंत यांनी गुरुवार, 31/03/2016 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
फूसभाजी(कोवळ्या फणसाची भाजी). . मांसाहारी लोक शाकाहारी लोकांना ‘घासफूस खानेवाले’ म्हणतात हे अगदी म्हणजे अगदी खरंय.पण घास म्हणजे शब्दश: गवताच्या जातकुळीतली फोडशीची भाजी आणि शब्दश: फूसभाजी हेच नाव असलेली फणसाची भाजी खाताना मांसाहारी लोकही ‘घासफूस खानेवाले’च होतात हे विसरूनच जातात. फूसभाजी फणसाची भाजी असते पण हा फणस इतका कोवळा असावा लागती कि त्यात गरे धरले नसले पाहिजेत.त्याला ‘कुवरी’ याच योग्य नावाने ओळखले जाते.म्हणतात.कुवरी म्

<जिलबी का टाकावी>

लेखक नाखु यांनी गुरुवार, 31/03/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
"मिपावर का लिहायचे ? न लिहिल्यास अज्ञानातून (आप्लयालाच काय) इतरांनाही आपले अज्ञान कळत नाही." "इतरांच्या धाग्यातून आणि प्रतिसादातून शिकण्यासाठी तरी आपण धागे का वाचावेत! त्या जिलब्या आपण करून पाहू नये यासाठी!" "पण मला स्वत:च्या जिलबीतून दाखवायचे आहे. हे जग मोठी कढई आहे. जिलब्या टाकत टाक्त राहणे मला आवडते! माझे स्वत:चे पाकज्ञान मी निर्माण करणार! चकलीच्या जिलबीतून!" "मान्य आहे.