धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धा
ऋण आणि व्याज यांच्या बाबतीत फसवणूकीचा इतिहास सोबतीने कुटूंब, समुह, देश यांच्यावर रास्त स्वरुपाचे नसलेल्या ऋण आणि व्याज या मुळे उध्वस्त होण्याची वेळ येणे खरेच खेद कारक असते. यामुळे कदाचित काही (कदाचित बहुतेक) धर्मसंस्था धर्मविचार ऋण आणि व्याज व्यवहाराचा निषेध करतात अर्थात अगदी टोकाची भूमिकाही इस्लाम सारख्या एखाद दुसर्या धर्मातून घेतली जाताना दिसते. ऋण आणि व्याज यांचा उपयोग करुन फसवणूक करणारी सावकारी, अव्वाच्या सव्वा व्याजदर, गुलामी अथवा वेठ बिगारी करवणे, कुटूंबाचा साराच निवारा अथवा देशाची संपूर्ण स्वावलंबनच संपवणे ह्या टोकाच्या नकारात्मक बाजू ह्या निषेधार्ह निश्चित आहेत.
महत्वाची सूचना
सर्व सदस्यांना सूचना. मिसळपावचे धोरण सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा नजरेखालून घालावे ही विनंती. यात उल्लेख केलेल्या बाबींव्यतिरिक्त आणखी एक बाब स्पष्टपणे सांगू इच्छितो, की गेल्या काही दिवसांत सदस्यांनी एकमेकांना असांसदीय भाषेचा वापर करून त्रास देण्याचे प्रकार वाढलेले नजरेस आले आहेत.
मिसळपाव हे आपले सर्वांचे आणि सर्वांसाठी असले तरी वादाच्या भरात किंवा केवळ भडकवण्याची हेतूने असे वैयक्तिक अपमानास्पद लिखाण करणारे सदस्य संस्थळाचे वातावरण बिघडवतात तसेच अन्य वाचकांमधे संस्थळाची वाईट प्रतिमा उभी करतात.
शिक्षण संस्थांच्या जाहिराती; किती ख-या-खोटया?
सध्या एप्रिल महिना सुरू आहे. सध्या विविध शिक्षण संस्थांच्या मोठमोठया जाहिराती सुरू झाल्या आहेत. या जाहिरातींना भाळून न जाता पालक व विद्यार्थ्यांनी त्याची शहानिशा केली पाहिजे. त्यातून दोघांचेही होणारे नुकसान टळू शकेल. कारण सध्याचे कोणतेही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क लाखोंच्या घरात असते. त्यामुळे जाहिरातींच्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या मदतीसाठी ASCI आहेच. त्याचा वापर ग्राहकांनी करून स्वत:ची फसवणूक टाळावी.
'राजलक्ष्मी आज भिशीला येणार नाही ती राजस्थानात कुठे तरी मुलाच्या शाळेत गेली आहे.’’ अरुणाने आल्या आल्या सांगून टाकले.
पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी, जिल्हा. परभणी .
सध्या मी जेष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. गो.बं. देगलूरकर सरांच्या "Temple Architecture and Sculptures of Maharashtra" या अपरांतच्या पुस्तकाचे काम करत आहे. या पु्स्तकात प्राचीन महाराष्ट्रातील ४थ्या शतकापासून ते १४व्या शतकापर्यंतची अनेक मंदिरांच्या वैशिष्ट्यांची माहिती प्रकाशचित्रांसहित (फोटो) दिली जाणार आहे. या अंदाजे १००० वर्षाच्या काळात महाराष्ट्रात वाकाटक, चालुक्य, कलचुरी, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, सोळंकी, प्रतिहार अशा अनेक प्रमुख राजवटींच्या काळात किंवा या राजवटींची वैशिष्ट्ये असलेली मंदिरे बांधली गेलेली दिसुन येतात.
सायकलीशी जडले नाते २५: आठवे शतक
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
आउटलायर्स : पुस्तक परिचय
आपण आपल्या आजूबाजूला लोकांना आयुष्यात यशस्वी झालेले पाहतो आणि त्यातल्या कित्येकांचे वर्णन ‘स्वकर्तृत्वावर पुढे आलेला’ असे ऐकतो. परंतु यशस्वी होण्याकरता हुशारी आणि कर्तुत्व सोडून इतरही अनेक घटक कारणीभूत असतात असे माल्कम ग्लाड्वेल या लेखकाला वाटते. या इतर ‘अदृश्य’ घटकांचा शोध त्याने त्याच्या ‘आउटलायर’ या पुस्तकामधून घेतला आहे. लेखकाच्या मते यशस्वी होण्याकरता ‘हुशारी’ हा जरी मुलभूत घटक आवश्यक असला तरी एका ठराविक टप्प्यानंतर, बुद्धी आणि यश यांचा संबंध नसतो. नाहीतर प्रत्येक हुशार माणूस यशस्वी झाला असता.
यापैकी सगळ्यात पहिला ‘अदृश्य’ घटक म्हणजे ‘जगावेगळ्या संधी आणि नशीब’.
पोशाखावरून पात्रता ठरवता येते काय?
आज शनिवार म्हणून नेहमी प्रमाणे मी प्रोझोन मॉल मधील स्टार बजार मध्ये भाजीपाला वैगेरे खरेदी करण्यासाठी गेले होते.
ताल
ठाक ठण्ण ठाक आवाजाने विजू उठला, भीमसू बारक्या पितळी हातोडीनं संबळ ठोकत होता. बापाला कितींदा सांगितलं अंधाराचं दिवाबत्ती तर कर म्हणून. आयकायचं रक्तातच नाही. गार पाणी डोक्यावर ओतून विजूने कापडं हुडकायला सुरुवात केली. शाळेचा गणवेशाच्या चड्डीवरच मंडळाने दिलेला शर्ट घालूस्तवर भीमश्या कवड्यानी सजलेली अन कुंकवानं माखलेली पडशी घेऊन बाहेर झाला. पहाटेच्या अंधारातच बापलेकानी देवळाच्या बाहेरुन हात जोडले. देवडीचा चिंचोळा जिना चढून बसताच गाभारा उजळलेला दिसला. हरीभटजी काकड्याला सुरुवात करायला अन चौघडा वाजायला गेली ५० वर्शं तरी खंड पडलेला नव्हता.
..
आभाळ गुलाबी व्हायला लागलं तसं भीमश्याचं हात भरु भरु आलं.
देशोदेशीची वाद्येः रोमानिया
यापूर्वी ‘काही अपरिचित वाद्ये’ या छोटेखानी लेखातून नेटवर भेटलेल्या काही अपरिचित तरीही नादमधुर संगीत वाद्यांचा अल्पस्वल्प परिचय करुन दिलेला होता. अनेक वाचकांनी लेख आवडल्याचे नमूद केले. तसेच मिपावरील काही दिग्गज, जुन्याजाणत्या आयडींनी देखील लेख आवडल्याचे नमूद केले. त्यातूनच पुढे माझ्या मनात असा विचार आला की स्वतंत्र देशनिहाय किंवा विभागनिहाय जर असा संगीतवाद्यांचा आढावा घेतला तर ते जास्त उपयुक्त आणि कल्पक ठरेल.
तर त्याप्रमाणे आज सुरुवात करीत आहे ट्रान्सिल्व्हानिया या प्रदेशापासून.
मिसळपाव