सध्या मी जेष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. गो.बं. देगलूरकर सरांच्या "Temple Architecture and Sculptures of Maharashtra" या अपरांतच्या पुस्तकाचे काम करत आहे. या पु्स्तकात प्राचीन महाराष्ट्रातील ४थ्या शतकापासून ते १४व्या शतकापर्यंतची अनेक मंदिरांच्या वैशिष्ट्यांची माहिती प्रकाशचित्रांसहित (फोटो) दिली जाणार आहे. या अंदाजे १००० वर्षाच्या काळात महाराष्ट्रात वाकाटक, चालुक्य, कलचुरी, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, सोळंकी, प्रतिहार अशा अनेक प्रमुख राजवटींच्या काळात किंवा या राजवटींची वैशिष्ट्ये असलेली मंदिरे बांधली गेलेली दिसुन येतात. हे पुस्तक येत्या २/३ महिन्यात पूर्ण होउन वाचकांना उपलब्ध होइल. डॉ. गो.बं. देगलूरकर सरांचा पहिल्यांदा हे पुस्तक इंग्लिश मधुन व नंतर मराठी मधुन प्रकाशित करण्याचा विचार आहे.
या पुस्तकासाठी मी अलिकडेच पश्चिम महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील व विदर्भातील काही मंदिरांची प्रकाशचित्रे घेण्यासाठी भटकंती केली. या भटकंतीत मला गावोगावात अनेक प्राचीन मंदिरे दिसली. यातीलच काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची प्रकाशचित्रे आपल्या समोर मांडावी या हेतुने मी हा प्रयत्न करत आहे. मी मंदिरांची त्रोटक माहिती व जास्त प्रकाशचित्रे जास्त देणार आहे कारण मंदिरांच्या वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती आपल्याला डॉ. गो.बं. देगलूरकर सरांच्या पुस्तकातून मिळणार आहे. मात्र वाचकांना विनंती की पुढील मंदिरांची माहिती या मंदिराला मिळणा-या प्रतिसादावर अवलंबुन आहे.
पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी, जिल्हा. परभणी .
पिंगळी हे गाव परभणी शहरापासून अंदाजे २७ कि.मी. अंतरावर आहे. पिंगळेश्वर मंदिर हे पिंगळी गावाच्या मध्यभागी आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिराच्या समोर प्रचंड पुष्करणी आहे. सध्या ही पुष्करणी दुष्काळामुळे पूर्ण कोरडी आहे. मंदिर त्रिदल (तीन गर्भग्रुह असलेले) असुन मंदिरातील मुख्य देवता शिव आहे तर दुस-या एका गर्भग्रुहात आज एका गणपतीची मूर्ती आहे तर तिस-या गर्भग्रुहाची खोली सध्या सामान ठेवण्याची खोली म्हणुन वापरली जाते. संपूर्ण मंदिर दगडात बांधलेले असुन कदाचित कधीकाळी या मंदिराला विटांचे शिखर असावे असे वाटते. मंदिर अंदाजे अडीच ते तीन फुट उंच अधिष्ठानावर उभे आहे. मंदिराच्या समोरचा कक्षासनाचा भाग सोडल्यास मंदिर बाहेरुन खुपच साधे आहे. मंदिराच्या तीनही बाजूंच्या बाह्य भिंतीवर एकच नक्षिचा पट्टा आहे. देवकोष्ठे आहेत पण त्यात सध्या देवतांच्या मूर्ती नाहीत. मंदिराजवळच्या परिसरात इतरही छोटी मंदिरे आहेत तसेच अनेक जुन्या मंदिरांचे व वास्तुंचे अवशेष दिसुन येतात.
अजुनही मंदिर चांगल्या अवस्थेत असुन गावक-यांचा राबता मंदिरात दिसुन येतो. या मंदिरासोबतच परभणी परिसरातील जांब, बोरी, चारठाणा, जिंतुर अशा अनेक प्राचीन मंदिरे व अवशेष असलेल्या ठिकाणांनाही भेट देता येइल.
धन्यवाद !
मंदिराचा दर्शनी भाग
.
मंदिर व समोरील पुष्करणी
.
मंदिर व समोरील पुष्करणी
.
मंदिर व समोरील पुष्करणी
.
पुष्कणी मधील देवकोष्ठातील महिषासुरमर्दिनीची भग्न मूर्ती
.
नरसिंहाची भग्न मूर्ती
.
मंदिराची उत्तरेकडील बाजू
.
मंदिराची दक्षिणेकडील बाजू
.
मंदिराचा सभामंडप व खांब
.
मंदिराच्या मुख्य गर्भग्रुहाची फारच वाइट पध्दतीने रंगवलेली द्वारशाखा
.
मंदिराचा सुंदर कोरीव काम असलेला पण र्ंगवुन वाट लावलेला खांब
.
.
मंदिर व समोरील पुष्करणी
.
मंदिर व समोरील पुष्करणी
.
मंदिर व समोरील पुष्करणी
.
पुष्कणी मधील देवकोष्ठातील महिषासुरमर्दिनीची भग्न मूर्ती
.
नरसिंहाची भग्न मूर्ती
.
मंदिराची उत्तरेकडील बाजू
.
मंदिराची दक्षिणेकडील बाजू
.
मंदिराचा सभामंडप व खांब
.
मंदिराच्या मुख्य गर्भग्रुहाची फारच वाइट पध्दतीने रंगवलेली द्वारशाखा
.
मंदिराचा सुंदर कोरीव काम असलेला पण र्ंगवुन वाट लावलेला खांब
.
वाचने
8130
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
१) छायाचित्र अद्याप दिसत
पिंगळा शब्दाशी संबंधीत खालील स्थलनावे महाराष्ट्रात आढळली
यात एक
In reply to पिंगळा शब्दाशी संबंधीत खालील स्थलनावे महाराष्ट्रात आढळली by माहितगार
मोर्शी जवळच
In reply to पिंगळा शब्दाशी संबंधीत खालील स्थलनावे महाराष्ट्रात आढळली by माहितगार
फोटो दिसत नाहीत...
देवकोष्ठ म्हणजे काय असते ?
In reply to फोटो दिसत नाहीत... by चांदणे संदीप
ह्या पुस्तकाची आतुरतेने वाट
ऑनलाईन सर्च मधून पुढे येणारी
* पिङ्गल नावाचे
In reply to ऑनलाईन सर्च मधून पुढे येणारी by माहितगार
पिंगळा म्हणजे लहानग्या
In reply to ऑनलाईन सर्च मधून पुढे येणारी by माहितगार
हे अधिक पटतयं
In reply to पिंगळा म्हणजे लहानग्या by प्रचेतस
इतक्या जवळ असूनही कधी योग
क्लिअए क्वलिटिइची चित्रे
हे बरे पडते आहे, शिवलिंग आणि
In reply to क्लिअए क्वलिटिइची चित्रे by जव्हेरगंज
पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी, जिल्हा. परभणी .
पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी, जिल्हा. परभणी .
वरील यादीतील
मंदिर छोटेखानी असले तरी
पिंगळा = घुबड = नॉक्टुआ
अजुन एक आठवलं
पुष्करणीचे फोटो विषेश आवडले.