Skip to main content

It's Elementary!! (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक स्रुजा यांनी मंगळवार, 26/04/2016 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
Header मी लहान असताना माझ्या जगाचे २ भाग होते. अद्भुतरम्य वाटणारं एक पुस्तकांनी रंगवलेलं जग आणि बुचकळ्यात पाडणारं एक आजुबाजुच्या मोठ्या माणसांचं जग. एका भागातलं जग फारच सुरम्य आणि सुरस होतं. त्यातली पात्रं चमत्कारीक होती, विक्षिप्त होती, ती मला त्यांच्या गोष्टी सांगायची. त्यांच्याबरोबर मी हळदीघाट पाहिला, शाहिस्तेखानाची बोटं तुटताना स्वत:ची बोटं अचंब्याने तोंडात घातली, अफझलखानाच्या शामियान्यात महाराजांना वाघनखं खुपसताना पाहिली.

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 26/04/2016 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ !

खुरटी झुडपं

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 25/04/2016 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
एका अवाढव्य शिळेला टेकून जरावेळ बसलो. त्याची तिरपी सावली अंगावर पडली. रखरखत्या आयुष्यात ओलावा दाटला. मग भरुन घेतली माती ओंजळीत, अन उधळून दिली आभाळात. थोडी डोळ्यात पण घुसली. मग झोळीनंच तोंड पुसलं अन उभारलो ठार वेड्यासारखा. पाठीत उसण भरली. गडद वीज खोल आभाळात जाऊन चमकली. ऐन दुपारी डोळ्यापुढं अंधारी आली. जीव घामाघुम झाला. एक पाय वाकवून हाडं मोडली तेव्हा कुठं उभारी आली. मग झोळी पाठीवर टाकून चालायला लागलो. त्या हिरव्या सपाट मैदानावर म्हटलं तर गवत तसं फारसं नव्हतं. खुरटी झुडपं मात्र बक्कळ. दूरवरचे डोंगरमाथे आभाळाला भिडणारे. उतारावरुन खाली घसरत गेलेल्या नागमोडी पायवाटा.

मरण!

लेखक DEADPOOL यांनी सोमवार, 25/04/2016 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!" म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.

अँजेलिना जोलिची 'कुंडली'

लेखक मार्मिक गोडसे यांनी सोमवार, 25/04/2016 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामींच्या भेटीची वाट पहाणार्‍या लोकांच्या नजरा सँडल्सचा टॉक टॉक असा आवाज करत दरबारात प्रवेश करणार्‍या अँजेलिना जोलिकडे वळल्या. स्वामींची अपॉइंटमेंट घेतल्यामूळे तीला स्वामींच्या भेटीसाठी थेट प्रवेश मिळाला. चेहरा वाचन, हस्तरेषा व कुंडलीवरून अचूक भविष्य सांगण्याच्या कौशल्यामूळे त्यांना देश विदेशात यशस्वी जोतिष विशारद म्हणून ओळखले जाते. स्वामींची किर्ती ऐकून जोली आपले भविष्य जाणण्यासाठी वाराणसीत आली होती. सँडल्स बाहेर काढून जोलि पांढर्‍याशुभ्र गादीवर मांडी घालून स्वामींसमोर बसली, भारतीय पद्धतीने जोलिने स्वामींना नमस्कार केल्यावर स्वामींच्या चेहर्‍यावरील तेजात अजुनच भर पडली.

गूढकथा - आग्या वेताळ

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 25/04/2016 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
तो काळ होता सन 1960. महाराष्ट्रातले एक खेडेगाव- धामनेर! आमच्यासोबत ते सगळे अनाकलनीय घडले ते याच गावात. ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते? एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे? आता मी येथे एका झाडावर बसलो आहे. पोळ्यातला मध कुणी चोरत तर नाही ना यावर जातीने लक्ष देतोय...मी झाडावरच बसलेला असतो. कंटाळा आलाय या आयुष्याचा पण, मी काही करू शकत नाही. या बसा! झाडाखाली बसा, सांगतो सगळं! माझे वडील धामनेर पासून जवळ तालुक्याच्या ठिकाणी शिंकपूर येथे प्राथमिक शिक्षक होते. नुकतीच तिथे त्यांची बदली झाली होती. आम्ही दोघे त्या वेळेस 14 वर्षांचे होतो.

अवधूत (भाग ६)

लेखक विजय पुरोहित यांनी सोमवार, 25/04/2016 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
(मागील भाग ) अवधूत (भाग-५) अवधूत (भाग-४) अवधूत (भाग-३) अवधूत (भाग-२) अवधूत (भाग-१) अद्याप आकाशात ब-यापैकी अंधार होता. पूर्वेकडून थोडंसं फटफटू लागलेलं होतं. शुक्राची चांदणी दिमाखात पूर्वेच्या आकाशात चमकत होती. ढगांचं खिन्न, उदास आवरण आता पूर्णपणे हटलेलं होतं. हिवाळी तारकांचे द्राक्षगुच्छ आकाशात आनंदात चमकताना दिसत होते. रस्त्यावर चिखल अद्याप बराच होता.

उडुपी पासून कुठे कुठे जाऊ शकतो?

लेखक स न वि वि यांनी सोमवार, 25/04/2016 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी हा नवीन धागा काढतेय कारण मला लवकर फ्रेश प्रतिसाद हवेत आणि जो धागा मला चटकन मिळेल. नंतर हवे तर धागा उडवला किन्वा सरकवला तरी चालेल. आम्ही सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी ट्रीप ला जायचे म्हणतोय . नोवेंबर एका मित्राचे लग्न आहे उडुपी मध्ये, लग्नाचे २ दिवस तोच सोय करून देणार आहे . पण त्यानंतरचे ३-४ दिवस थोडे फिरायचे म्हणतोय . तर मग आता तुमची पाळी… उडुपी पासून कोणती ठिकाणे आहेत जी आम्ही फिरू शकतो? जसे एक कुर्ग आहे, पण ते उडुपी पासून ९ तासांच्या drive वर आहे. मला ठिकाणे आणि तिथे काही अश्या जागेची माहिती हवीय जिथे आम्ही ८-९ च्या ग्रुप ने जाऊ शकतो. आम्हाला एखाद्या बंगल्यात राहायची इच्छा आहे.

स्टालिनग्राड भाग - ४ ..शेवटचा...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 25/04/2016 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्टालिनग्राड भाग-१ स्टालिन्ग्राड भाग-२ स्टालिनग्राड भाग-३ स्टालिनग्राड भाग - ४.. शेवटचा ........हिटलरने हे विधान मानवतेला अनुसरुन केले का परिस्थितीला अनुसरुन केले हे समजायला मार्ग नाही. स्टॅलिनग्राडमधे असलेल्या मोठ्या हॉविट्झर तोफांबद्दल हिटलर म्हणाला, ‘त्या जर आपण गमावल्या तर तसल्या तोफा आपण तेथे परत पाठवू शकत नाही. त्या जर आपण तेथेच टाकल्या तर या युद्धाचा उद्देशच नष्ट झाला असे म्हणावे लागेल.

मिल्क एण्ड कुकिज! (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक इडली डोसा यांनी सोमवार, 25/04/2016 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
Header मिल्क एण्ड कुकीजचा आणि पुस्तकांचा काय बरं संबंध ? वर वर बघता काही संबंध नाही पण आमच्या गावातल्या वाचनालयात हा उपक्रम आहे. वयोगट ३ ते ६ वर्षाच्या मुलांना आठवड्यातून एकदा संध्याकाळी वाचनालयात घेऊन जायचं. आपलं काम म्हणजे फक्त मुलाची त्या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करणे आणि नेमून दिलेल्या वेळात आपल्या मुलाला तिथे घेऊन जाणे.