माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - 4
भाग चौथा
आज लंडन मधील तिसरा दिवस . आज सकाळी पुन्हा एकदा Hyde पार्क मध्ये गेले. आज परत त्या तलावाच्या इथेच गेले होते. तिथे आजूबाजूला फिरून मग तासाभरात परत घरी आले कारण आज मी संग्रहालये बघायला जाणार होते. Science Museum आणि Natural History Museum. इथे जाण्यासाठी आपल्याला South Kensington या स्टेशन वरून बाहेर पडल्यावर थोडं चालत जावं लागतं. Science Museum, Natural History Museum, Victoria & Albert Museum हि सगळी संग्रहालये जवळपास आहेत पण इतकी मोठी आहेत की एका दिवसात बघून होणं कठीण आहे.
मिसळपाव