एका गावात एक तरुण मुलगा राहतं होता त्याला २ बहिणी होत्या
एकुलता एक भाऊ असल्याने २ न हि बहिणी ची भावा वर माया असते..
तिघेही गरिबीत दिवस काढत असतात
भावाचे लग्न ठरते ..मुलगी गरीब घरची असते ...
लग्ना निमित्त भावास एक नवा शर्ट व प्यांट शिवण्याचे ठरते..व त्या प्रमाणे शिवायला टाकतो
नेहमी प्रमाणे शिंपी महाराज आज देतो उद्या देतो असे करत शेवटी कसेतरी ्लग्नाच्या अधल्या दिवशी रात्री ८ वाजता कपड्याचे पार्सल त्या तरुणाला देतो..
घरी आल्यावर बहिणी वाट पाहतं असतातच..व त्या म्हणतात आधी जेवून घे...
जेवण गप्पा करत चालले असते ते झाल्यावर बहीण म्हणते बघ तरी कपडे कसे झाले आहेत..
मुलगा शर्ट घालतो तो व्यवस्थित शिवलेला असतो..पण पॅंट घातल्यावर लक्षात येते की शिंप्याने पॅंट एक फूटभर लांब शिवली आहे..
बहीण नाराज होते ..पण इलाज नसतो रात्र झाल्याने दुकान हि बंद झाले असते..पण भाऊ म्हणतो मी पॅट फोल्ड करून घालीन व लग्न झाले की आपण पॅंट दुरुस्त करून आणू..
दुसरे दिवशे सकाळचा मुहूर्त असल्याने सारे निद्रेच्या आहारी जातात..
रात्री एक वाजता बहिणीस जाग येते व तिला भाऊ अशी फोल्ड केलेली पॅंट घालणार हे पटेना म्हणून ति कपाटातुन पॅंट काढते व १ फुट कापून कमी करते व कपाटात ठेवते..व शांतपणे झोपते.
दुस~या बहिणीस २ वाजता जाग येते व तिला हि पॅंंट ची कथा माहीत असल्याने ति उठते व कपाटातुन पॅंट काढते व १ फुट कापून कमी करते व कपाटात ठेवते..व शांतपणे झोपते....
सकाळी उठल्यावर अंघोळ झाल्यावर भाऊ शर्ट घालतो व पॅंट घातल्यावर पाहतो तो काय त्याची बर्मुडा झालेली असते..
काय करणार? बर्मुडा घालून तसाच लग्नाला उभा रहातो...
समन्वय व ताळमेळ नसले कि असे होते ........
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2093
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
चोराची काठी चार वीत वाढेल ही
क्या बात है अकुकाका!
धन्यवाद
In reply to क्या बात है अकुकाका! by प्रचेतस
अहो तुम्ही कसले धन्यवाद देताय
In reply to धन्यवाद by अविनाशकुलकर्णी
सहमत वल्लीसर. मस्तच लिहिलंयत
In reply to क्या बात है अकुकाका! by प्रचेतस
कथाबीज ढापलेले दिसतय छ्या
हाहा सुरय्या रमय्या ने दो दो
मास्टरजी, पिताजी कि पतलून १
समन्वय व ताळमेळ नसले कि असे
नशीब बहिणी चार पाच नव्हत्या!
परिक्षाण
दैनीक सामना.
इकडे भावाची विजार लहान होत असताना सरकार झोपले आहे?>काय म्हणावे याला?दैनीक सकाळ.
पँट्कडे सुरवातीपासून लक्ष्य दिले नाही असे दिसते.साहेबांनी योग्य पँट दिली जाईल असे म्हटले आहे.दैनीक लोकमत
पुर्वीच्या सरकारच्या काळात पँटींचा असा प्रश्न होत नसे,आम्ही घोळ नको म्हणून लुंगीचा सल्ला देत असू.दैनीक लोकसत्ता
बहिणींचा एक्मेकींवर पुरेसा विश्वास नसणे आणि शिंप्याकडे वेळीच पाठपुरावा नसल्याने ही वेळ आली आहे असे आम्ही नमूद करतो. लिहिन सुबेरदैनीक मटा
या पॅण्ट कमी होण्यात कुणा कुणाचा हात आहे ते शोधले पाहिजे. हीच बातमी आम्ही आजच्या अंकात तीन वेग्वेगळ्या शीर्षकाखाली दिली आहेच.दैनीक मिपा समाचार
पॅण्ट कुणाची ताप कुणाला ???एक णाखु, बाकी सगळे वाखु!
In reply to परिक्षाण by नाखु