Skip to main content

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 09/05/2016 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ !

सैराटच्या निमित्ताने....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 08/05/2016 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिनेमा बघीतला नाही आणि कदाचित बघणारही नाही.त्यामुळे, "सैराट" न बघताही प्रेमी युगलाची जात एक नसतांना पण संसार सुखी होवू शकतो का? ह्या विषयीचे मी पाहिलेल्या घटना लिहित आहे. १. मुलगा गुजर आणि मुलगी को.ब्रा.मुलगा डिप्लोमा तर मुलगी एम.एस.सी. दोघांचे प्रेम जमल्यावर, मुलाला दम मिळाला.मुलाने आणि मुलीने पळून जावून लग्न गेले. आज दोघेही सुखाने नांदत आहेत. २. मुलगा तामिळ आणि मुलगी कोब्रा.मुलाच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि दोघेही संसारात सुखी आहेत. ३. मुलगा कोब्रा आणि मुलगी ९६ कुळी मराठा.मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत. ४.

हरिश्चंद्रगड – उत्तरार्ध : साधले घाट

लेखक हकु यांनी रविवार, 08/05/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
हरिश्चंद्रगड – पूर्वार्ध : नळीची वाट आता पुढे - आज माझा दिवस हरिश्चंद्रगडावर उशिराच उगवला. आजसाठी सकाळचा काहीही कार्यक्रम ठरलेला नव्हता. दोन महिन्यांपूर्वी आलो होतो तेव्हा तारामती शिखर बघून झालं होतं. सकाळी उठून चहा नाश्ता करून साधले घाटा मार्गे उतरायचं, एवढंच ठरलं होतं. या ट्रेकचा मूळ उद्देश 'नळीची वाट' एवढाच होता मुळी. त्यामुळे बाकी काहीही कार्यक्रम नव्हता. मात्र आज झोपेतून जागं होतानाच एक मजेशीर गोष्ट घडली.

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५

लेखक ५० फक्त यांनी रविवार, 08/05/2016 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी ..

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी रविवार, 08/05/2016 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना आज पर्यावरणात अनेक ठिकाणी उद्रेक होताना दिसतात. देशामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पसरला आहे, पहाडामध्ये वणवे पेटत आहेत आणि संपूर्ण जगात कुठे भूकंप येत आहेत, कुठे वादळ तर कुठे लँडस्लाईड. आपल्या देशाच्या संदर्भात दुष्काळाची समस्या अगदी गंभीर स्थितीत आहे. अशावेळी प्रश्न पडतो की, ह्या सगळ्यांसाठी आपण काय करू शकतो? ह्या विषयावर आपल्याशी बोलू इच्छितो. आजवर ह्या विषयाबद्दल जे समजून घेतलं ते आपल्याला सांगू इच्छितो. दुष्काळाच्या संदर्भात वर दिसत असलेली स्थिती ही मूळ समस्येची समोरची बाजू. समस्येचं समोर येणारं आणि दिसत असलेलं रूप.

....थांबले ट्राफीक आता...

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 08/05/2016 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
थांबले ट्राफीक आता. माग लवकर भीक आता. शांततेचा पॅक्ट झाला वाढले सैनीक आता जा पुरा व्यवहार झाला तुझि नको जवळीक आता! लग्न झाले..ते हि झाले चांगले सोशीक आता.. दु:ख झाले भोगुनीया हासणे ऐच्छिक आता.! (प्रश्न झाले मांडुनिया उत्तरे ऐच्छिक आता!) लागु केली कर्जमाफी काढ लवकर पीक आता! उंच त्याचा भाव नेला वाढले भावीक आता...! विसर सारे शीकलेले एवढे तू शीक आता चेहरा सभ्य दिसावा शिकुन घे ही ट्रीक आता. हा लढा अंतिम आहे फक्त थोडे टीक आता - कानडाऊ योगेशु

विखार - कथा - काल्पनीक

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 08/05/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
विखार - कथा - काल्पनीक लग्नसमारंभाचा हॉल छान सजवलेला होता . सकाळपासुन पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली . थोड्याच वेळात लग्नाचे विधी सुरु झाले . वधुपक्षाची मंडळी लगबगीने इकडुन तिकडे धावत होती . दोन्ही बाजुंकडील लोकांचे आगत- स्वागत , मानपान कौतुकाने करीत होती . वरपक्षाच्या लोकांना काय हवे नको ते बघुन त्यांच्या मागण्या हसत हसत पुरवीत होती. पण हळुहळु वरपक्षाची मंडळी पिसाटल्यासारखे करु लागली . त्यांच्या मागण्या अचानक वाढतच जाउ लागल्या . "मुलाला नवीन घड्याळ हवे " , "मुलाच्या अमक्या तमक्या नातेवाईकांचे आहेर , मानपान नीट झाले नाही ते आधी पार पाडा" अशा एकेक फर्माईशी सुटु लागल्या .

माय

लेखक ऊध्दव गावंडे यांनी रविवार, 08/05/2016 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
माही माय माही माय नाई शिकली लेयनं रातं दिसं मेहनतं जीवं मातीले जायनं चुरुक भुरुक अशी लावे झाकटीतं रई देते पाह्यटीचं मले खायाले सायी चं दई ठूनं हातावरं डोक्सं तिचं वगारु पाजनं शाळेतल्या पोराईचं यकं दोनं आईकनं चुनं भाकरं थापूनं घाई घाई वावरातं कापूस येचता येचता जोळे नख्ख्याईशी नातं सोसून सासरवासं तरी राये समाधानी पोरं शिकतीलं लयं सदा राये ह्याचं ध्यानी दुध तपवूनं राती टाके त्यातं इरजनं व्हते दई,लोनी चं ते नाई नासलं आजुनं

हत्यार( कथा)

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 08/05/2016 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
अभिमन्यू राजाचा दरबार भरलेला आहे.शेजारच्या आदित्यराज्यासोबत होणारया संभाव्य युदधाची छाया सगळया दरबारावर पडली आहे.. राजा अभिमन्यू - सेनापती आपली योजना जाहिर करण्याची वेळ आली आहे. वेळ न दडवता त्या योजनेची माहिती दरबारास दया सेनापती - राजाधिराज अभिमन्यूंच्या योजनेप्रमाणे आपण लहान असुनही मोठ्या पल्लांच्या तोफा तयार करण्याची महत्वकांशी योजना हाती घेतली होती. अरबी धातुतज्ञ्ांच्या मदतीने कैक सालांपासुन यावर गुप्त पद्धतीने काम चालू होते. या तोफा आता वापरण्यासाठी तयार आहेत. केवळ दोन माणसे एक तोफ वाहून नेऊन , वापरुही शकतात.. प्रधान - केवळ दोन माणसे ? असंभवही अरबी कारागिरांनी करुन दाखवले म्हणायाचे !

मराठी टंकलेखन आणि कीबोर्ड लेआउट

लेखक अज्ञात यांनी रविवार, 08/05/2016 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच मी नवीन संगणक विकत घेतला आहे व त्यात विंडोस १० आहे. त्यामध्ये मी मराठी आणि जपानी भाषा निवडली आहे. इंग्रजी तसेच जपानी भाषा सुद्धा मस्त चालते. परंतु मराठी चा कळफलक (कीबोर्ड लेआउट) अत्यंत वेगळा आणि कठीण वाटला. गूगलवर शोधल्यावर कोणालाच काही त्रास असल्याचा दिसलं नाही. अजून शोधल्यावर कळले कि तो नवीन कळफलक inscript असून अन्य भारतीय भाषांना पूरक म्हणून बनविलेला आहे. मला यावर काही शंका आहेत.
  • हा inscript वापरण्याआधी शिकवा लागेल. मला वाटते त्यासाठी स्वतंत्र कळफलक नसल्याने शिकतांना अडचणी येतील. जपानी कळफलक फोनेटिक असून वापरण्यास अत्यंत सोपा आहे.