Skip to main content

गड्या... परदेस पन बरा...!!!

लेखक घाटी फ्लेमिंगो यांनी मंगळवार, 10/05/2016 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज येक वरिस झालं बगता बगता... हिकडं ईवुन... जवा कळालं व्हतं की परदेशात नोकरीधंद्याला जावं लागनार तवा पन इस्वास बसला नव्हता... अन आता पन तशिच गत झालीया... मानूस म्हंजे एक ठिपका हाये असं देवळातलं आन्ना म्हनले व्हते... पन त्याच्या जिवणात जर अशी वर्स ठिपक्यावानी पटा-पटा जाऊ लागली तर कवा म्हातारपन आलं समजनार पन न्हाई...!! येक वर्सात लै नवी लोकं भेटली... नवं मित्र जालं... लै ठिकानी फिरुनशान आलू... लै फोटू काडलं... येकीकडं बायका-पोरास्न सोडून आल्याचं दुख होतं पन नव्या ठिकानी जाऊन आल्याचा आनंद पन व्हता...! ज्या गोर्या लोकास्नी लांबूनच बगत व्हतॊ त्यांच्याच देशात नव्हं...

एक संघ मैदानातला - भाग ७

लेखक शि बि आय यांनी मंगळवार, 10/05/2016 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
आमचं हरणं सेलिब्रेट करावं म्हणून आपापल्या पैशाने वडापाव खात खात घरी गेलो. घरी गेल्यावर हात पाय धुवून बेडरूम मध्ये डोकावले तर माझे दूरचे काका आले होते. ते शिक्षक असल्यामुळे त्यांना उठता-बसता कोणाला तरी लेक्चर द्यायला आवडत असावं. सध्या माझ्या धाकट्या भावाची म्हणजे पप्याची शाळा सुरु होती. मी घाईघाईने किचन गाठलं, " ऎ आई हे बडबडं कासव कधी आणि का आलं गं ???" आजीने पाठीत धपाटा घालत, " मोठ्यांना अस बोलू नये केव्हा कळणार तुला... हे काही तुझं ग्राउंड नाही... " डोस पाजायला सुरुवात केली. आजीनेच सुरुवात केली मग काय आईसाहेब खुश झाल्या, तिनेही सुरुवात केली.

जुनी वास्तु...

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 10/05/2016 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
॥ श्री ॥ Akshi जुनी वास्तु... भाग १ असा प्रकार की जेव्हा असते तेव्हा किम्मत नसते, आता खुप आठवण येते... पण टिकवुन ठेवल्ये... आहे मनात अजुन! आज तुम्हाला पण घेऊन जातो... भावे यांचे आक्षी गावातील एक कौलारु ८०-८५वर्ष जूने घर, पुरुषोत्तम जनार्दन भावे नावाची पाटी... मोरपीशी रंगाचा दुहेरी दरवाजा... त्या दरवाजाच्या उजव्या डाव्या बाजूला शंकरपाळी लाकडी फळ्या...

आस

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 10/05/2016 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
बांधावरचा पिंपळ सांगे सोनसावळी दुःखे ओली फांदी-फांदी जीर्ण पर्णिका बांडगुळांची गर्दी सगळी अस्ताईचे सूर अनोळखी शुष्क पान्हा हळवी देवकी कशी रुचावी जगण्यालाही अस्थाईविन बंदिश पोरकी सुकली पाने सुकली माती खिन्न विरहिणी होय पालवी पाणी सुकले बुंध्यापाशी त्राही त्राही अंकुर डोकावी कधी अकस्मित ओल मुळांना कधी मेघांचे हळवे चुंबन लागे जलदांना ओढ भूमीची कधी अचानक अधीरे मिलन नश्वर स्वप्ने, नश्वर दुःखे नश्वरतेचा शाप सुखाला शाश्वत ऐसे इथे न काही श्वासांचा का ध्यास जीवाला ? सोनसावळा पिंपळ वेडा शुष्क डहाळ्या तरीही जपतो आस लाजऱ्या मृगथेंबाची मनी बाळगून जगत राहतो विशाल १०-०५-२०१६
काव्यरस

"शतकोटी" सैराट

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 09/05/2016 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
काही मित्र सैराटच्या गल्ल्याबद्दल चर्चा करत होते. एकाचं मत पडलं की सैराट १०० कोट कमावणारच!(ग्रॉस) दुसरा म्हणाला की १०० नाही, पण ५० कमावेल आणि मराठी चित्रपटांचा आवाका आणि अडचणी बघता ५० म्हणजेच ५०० कोटी! पण एकंदर सगळ्यांच्या मते लवकरच मराठी सिनेमा शतकोटी उड्डाणे भरू लागेल ह्यावर सार्‍यांचे एकमत होते. माझ्याही मते हे अशक्य नाहीच, पण त्याआधी बरेच बदल घडावे/घडवावे लागतील.

शिव दुग्धाभिषेक -सत्य घटने वर आधारित

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 09/05/2016 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
सन १९७०-७२चा काळ. जुन्या दिल्लीत नवी बस्तीतून एक गल्ली नया बाजार कडे जाते, त्या गल्लीत एका घरात राधा-कृष्णाचे मंदिर होते. मंदिराच्या प्रांगणात शिवपंचायत हि होती. भक्त गण आधी महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक/ जलाभिषेक करायचे आणि नंतर राधा-कृष्णाचे दर्शन घेत असे. मंदिर निजी संपती असली तरी जवळपासच्या भक्तांसाठी मंदिर सकाळी १० पर्यंत उघडे राहात होते. मंदिराच्या बाहेर एका पायाने अधू असलेली भिकारीण भिक मागण्यासाठी बसत होती. तिची कहाणी हि अत्यंत दारूण होती. जवळपास दोन एक वर्षांपूर्वी आपल्या नवर्यासोबत ती मजदूरी करायला जुन्या दिल्लीत आली होती.

आंबे - जनातले, मनातले.

लेखक आनन्दा यांनी सोमवार, 09/05/2016 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ च्या मे महिन्यातले दिवस, बायको आंब्याच्या दुकानात बसली होती. समोरून एक ओळखीचे काका आले, ओळखीचे म्हणजे आम्ही त्यांना ओळखायचो, ते बहुधा आम्हाला ओळखत नसावेत. बरोबर त्यांचे दोन समवयस्क. आंबा कसा? म्हणून त्यांनी विचारले, बायकोने काय ते दर सांगितले. त्यांनी आंबा हातात घेतला, "हा कर्नाटक आहे" - बायको आ वासून. "काय हो कसा काय?" "ही काय या आंब्याला चोच दिसतेय, रत्नागिरी हापूसला हे चोच नसते" टाकूनिया बाबा गेला.. आम्ही मनातल्या मनात त्या काकांना सास्टांग नमस्कार घातला. आजही ते काका दिसले नकळत रस्ता बदलला जातो. काय करणार?

व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न

लेखक माहितगार यांनी सोमवार, 09/05/2016 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
व्हिटॅमीनला मराठीत जीवनसत्व म्हणतात. जीवनसत्त्वे हे शरीरातील प्रक्रियांसाठी थोड्याप्रमाणात लागणारे पण अत्यंत महत्त्वाचे -म्हणजे यांची आहारातील/शरीरातील कमतरता आजारांचे कारण होऊ शकते- असे पोषणघटक असतात. यात A,B,C,D,E,K अशा प्रकारच्या नावांची जीवनसत्वे असतात. (इथपर्यंत मराठी विकिपीडिया) यातील B या जीवनसत्वाचे विवीध क्रमांक असतात त्यातीलच शाकाहारी लोकांना अकस्मिक सॉलीड शारीरीक धक्का देऊ शकते ते म्हणजे व्हिटॅमीन बी-१२ ची कमतरता.

तर्राट

लेखक खटासि खट यांनी सोमवार, 09/05/2016 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार आम्ही एक सिनेमा बनवत आहोत ज्याचे नाव आहे तर्राट. हा एका सामाजिक विषयाला ब ब .. वाचा फोडणारा सिनेमा असेल. सिनेमा बनवण्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे. आपल्या मिपावर अनेक गुणी, होतकरू, सहृदय, ज्ञानी लोक आहेत. यातूनच तर्राटची टीम बनवावी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. खालील डिपार्टमेंट मधे भरती करणे आहे. आपापला कौशल्याधारित बायोडेटा व्यनीतून पाठवावा. आणि आपणास काय येते याची झलक म्हणून प्रतिसादातून गुण उधळावेत ही नम्र विनंती १. कथा - गरजू लेखकांनी तर्राट या विषयाला न्याय देईल अशी संवेदनशील कथा लिहावी. अनेकांनी मिळून लिहीली तर प्रत्येकाला संधी मिळेल (मानधनाचे नंतर पाहू). २.