जलसाक्षरता : पाण्याच्या देशात!
- डॉ. सुधीर रा. देवरे
मला एका संपादक मित्राने विचारलं, ‘लोकसंस्कृतीतील ओव्यांमध्ये वा लोकगीतांमध्ये पाणी वाचवण्यासंदर्भात काही मौखिक परंपरा असतील तर त्या उपयोजित करत लेख लिहाल का?’
मी म्हणालो, ‘नाही.’
मी पटकन दिलेल्या ‘नाही’ उत्तराने त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, ‘का?’ ‘कारण आपल्या लोकसंस्कृतीच्या परंपरेत इथं पाणीच पाणी आहे. भारत हा पर्वतांचा आणि नद्यांचा देश आहे. पूर्वीपार नदीच्या काठांवरच गावं वसलेली होती. इथं भरपूर जंगलं होती. म्हणून पाऊसही भरपूर कोसळायचा. पावसाच्या झड्या लागायच्या. पाण्याचे महत्व कळण्याचे दिवस नव्हतेच पूर्वी.
मिसळपाव