Skip to main content

लॉजिक-जिम-लॉजिक

लेखक माझीही शॅम्पेन यांनी रविवार, 26/06/2016 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
लॉजिक-जिम-लॉजिक प्रस्तावना : लेखाचं नाव वाचून फार अपेक्षा ठेवू नका , तुम्हालाही अशी नग मंडळी कुठेना कुठे दिसतील जमल्यास त्यांचं वर्णन इथे करू शकता , बरेच दिवसांनी बोर्डावर पदार्पण करतोय सांभाळून घ्या -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आम्रविकेत ४ वर्ष जीवाची अमेरिका करताना आरोग्या कडे अर्थात पूर्ण दुर्लक्ष झाले , कार ते कार्पेट प्रवास , चालणं कमीत कमी किंवा नाहिच पार्किंग लॉट सर्वात जवळ पार्किंग साठी कसरत , वीकांताला मजबूत पार्ट्या , बटाटा , चीज आणि अमेरिका जागतिक मेलटिंग प

माझ्या मराठी भाषेची ......

लेखक एकप्रवासी यांनी रविवार, 26/06/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मराठी भाषेची किती अभेद्य बांधणी किती तोडाल लचके ही तर रणाची रागिणी माझ्या मराठी भाषेची करा एकदा भेट तुम्हा गवसेल जगण्याची नवी पायवाट माझ्या मराठी भाषेत साऱ्या भावनांचे रंग खोली सागराची गोडव्यात वर प्रेमाचा तरंग माझ्या मराठी भाषेत भक्ती शक्तीचा मिलाप अभंग भारुडा संगे गुंजतो पोवाड्याचा आलाप माझ्या मराठी भाषेची माया तुम्हा काय सांगू आई माझ्या सोबती जगी काय मांगु

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -15

लेखक मेघना मन्दार यांनी रविवार, 26/06/2016 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पंधरावा - टीप - या भागामध्ये मी खूप फोटो टाकलेले आहेत. कारण तिथे मे गेले होते तिथला निसर्ग आणि वातावरण इतका सुरेख होता की मला राहवलं नाही. आणि मी खूप सुंदर फुलं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिली आणि वाटलं मिपाकरांना पण हिची सुंदर फुलं पाहायला मिळालीच पाहिजेत :) म्हणून तुम्हा सर्वांबरोबर हे फोटो शेअर करावेसे वाटले. तेंव्हा हा फोटोंचा रतीब गोड मानून घ्याल अशी अशा करते :) आज मी जाणार होते क्यू गार्डन बघायला. ही बाग खूपच सुंदर आहे. इथे जाण्यासाठी सर्वात जवळचे ट्युब स्टेशन म्हणजे क्यू गार्डन्स. मुख्य सेन्ट्रल लंडन पेक्षा ही जागा लांब आहे.

मुरमुरा दोसा/ उत्तपा व टमाटो चटणी

लेखक मानसी१ यांनी शनिवार, 25/06/2016 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
दोसा साहीत्य: ३ वाटी मुरमुरा ३ वाटी तांदुळ ( जाड / उकडा) १/२ वाटी उडीद डाळ १/२ चमचा मेथी दाणे (ऐच्छीक) कॄती: डाळ व तांदुळ स्वच्छ धुवुन घ्या . वरील सर्व साहीत्य एकत्र करुन रात्रभर भीजत ठेवा सकाळी मिक्सर वर बारीक वाटुन उबदार जागी ठेवा. पीठ फुगुन आल्यावर, मीठ व पाणी टाकुन सरसरीत करुन घ्या. तवा गरम करा, तेलाचा हात फिरवुन घ्या. पीठ पळीने तव्यावर घाला. हा दोसा जाडसरच ठेवतात. बाजुने थोडे तेल सोडुन झाकण ठेवा. एका बाजुने झाल्यावर दुसर्या बाजुने पण शेकुन घ्या. दोसा झाल्यावर ताटात काढुन घ्या.

सफर ग्रीसची: भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात

लेखक निशाचर यांनी शनिवार, 25/06/2016 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन भाग २ - प्राचीन कोरिंथ
कोरिंथचे वस्तूसंग्रहालय
कोरिंथच्या अवशेषांजवळ तिथे झालेल्या उत्खननांमधून मिळालेल्या वस्तू, पुतळे, मातीची भांडी वगैरेंचं एक छोटेखानी संग्रहालय आहे. तिथल्या दालनांमधे ग्रीक संस्कृतीतील वेगवेगळ्या कालखंडांप्रमाणे वस्तू मांडून ठेवल्या आहेत.

एक ओपन व्यथा ४

लेखक वटवट यांनी शनिवार, 25/06/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054 एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086 एक ओपन व्यथा ३- http://www.misalpav.com/node/36148 __________________________________________________________________________ "तू लॉ ला का अ‍ॅडमिशन घेत आहेस?" " ………………" "अरे तुला इतकेपण कमी नाहीयेत रे मार्क्स" " ………………" "जाऊ द्या ना सर….

माझा sky diving चा अनुभव

लेखक Jack_Bauer यांनी शनिवार, 25/06/2016 05:33 या दिवशी प्रकाशित केले.
जिंदगी मिलेगी ना दोबारा हा चित्रपट मी २०११ मध्ये पहिला आणि तेव्हापासून sky diving करायची इच्छा मनात होती. माझ्या पत्नीला ही इच्छा बोलून दाखवल्यावर ती पण यायला तयार झाली आणि हा योग मागच्या आठवड्यात आला. ह्यासाठी थोडी तयारी करावी लागली आणि हे सर्व तुमच्याशी शेअर करायचे आहे जेणेकरून ज्यांना हा अनुभव घायची इच्छा आहे त्यांना मदत होईल आणि ह्याच बरोबर जाणकार ह्या माहितीत त्यांची भर घालतील. हे लेख म्हणजे आमचा अनुभव + टिप्स असा आहे. पूर्वतयारी : ------------ आमची ही पहिलीच वेळ असल्याने मला Tandem जम्प हाच पर्याय होता.

शेवटी बाप हाय म्या-3

लेखक आनंद कांबीकर यांनी शनिवार, 25/06/2016 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुला बुलट घिवुन द्यायची आपली ऐपत नवती अण एवढंच काय हे बी कबुल हई म्या तुला कधी खेळायची मोटर बी नै घिउ शकलो. पर तु आठीव अतापोस्तवर तुला कदी बी शाळाची वाट सोडुन रानाची वाट धरा लावली नाय. दोन घास कमी खाल्लं पर तोहया पुस्तकाची सोय लावली. तु बारवी झालास तवापासुण त्याट छाती काडुन गावात फिरायचु. आपुण लावलेलं झाड़ आता गार गार सावली देणार म्हणायचु. मस लोकं मनली, तोहं पोरगं कालेज सोडुन गावांत उंडरतय, पाटलाच्या लेकिवर् उडतय. पर आपला भरुसा होता. म्या म्हणायचु, आपलं रघत हाय फुकट जाणार नाय. पर महा शिक्का खोटा निघला. म्या पिरमात आंधळा झालतु.

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग- 14

लेखक मेघना मन्दार यांनी शुक्रवार, 24/06/2016 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
भाग चौदावा - आज मी जाणार होते कॅमडन मार्केट आणि रॉयल एअरफोर्स म्युझिअम पाहायला. कॅमडन मार्केट इथे जाण्यसाठी कॅमडेन टाऊन नावाचे ट्युब स्टेशन आहे. या स्टेशन मधून बाहेर पडलो की १० मिनिटे चालत जायला लागतं. स्टेशन मधून बाहेर पडल्या पडल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानाच्या रांगा सुरु होतात. थोडं पुढे गेल्यावर ची कॅमडन मार्केट मोठी भिंत आणि कॅमडन लॉक दिसते तिथून आत जायचे. हे एक स्ट्रीट मार्केट आहे. खरेदी करण्यासाठी पण तसं स्वस्त आहे. इथे कपडे, शूज , वेगवेळ्या अक्सेसरीज, आणि बरंच काय काय मिळतं. स्वस्त जरी असलं तरी चीप नाही वाटलं मला. लोकं इथे जात असतील ते म्हणजे खाण्यासाठी.

अश्याच एका पावसाळ्या रात्री .........

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 24/06/2016 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
अश्याच एका पावसाळ्या रात्री, जेव्हा ती मला भेटली होती लखलखत्या काळोखात, तेव्हा तिच्या कानातली चांदणी चमकली होती एकुलत्या एका शेडखाली मला खेटुन ती उभी होती अन माझ्या नकळतच्या स्पर्शाने तिची ओली काया शहारत होती बाहेर रस्त्यावरती पाउस मात्र, एकसारखा कधीचा कोसळत होता मला वाटलं की तोही तिच्यासाठीच आज ज़रा जास्तीचा रेंगाळत होता वाटलं की तिला कवेत घेउन ह्या पावसात चिंब भिजावं मिठीत तिच्या विरघळून जावं अन स्वता:लाही विसरावं ढगांच्या गडगडाटांनी घाबरून ती अशी काही मला बिलगावी की, हि धरणीही त्याला अशी कधी भेटत नाही, पाहून त्या पावसाचीही जिरावी पाउस ही आता जरा जास्तच इरेला पेटला होता वाऱ्य