दोसा साहीत्य:
३ वाटी मुरमुरा
३ वाटी तांदुळ ( जाड / उकडा)
१/२ वाटी उडीद डाळ
१/२ चमचा मेथी दाणे (ऐच्छीक)
कॄती:
डाळ व तांदुळ स्वच्छ धुवुन घ्या .
वरील सर्व साहीत्य एकत्र करुन रात्रभर भीजत ठेवा
सकाळी मिक्सर वर बारीक वाटुन उबदार जागी ठेवा.
पीठ फुगुन आल्यावर, मीठ व पाणी टाकुन सरसरीत करुन घ्या.
तवा गरम करा, तेलाचा हात फिरवुन घ्या.
पीठ पळीने तव्यावर घाला. हा दोसा जाडसरच ठेवतात.
बाजुने थोडे तेल सोडुन झाकण ठेवा. एका बाजुने झाल्यावर दुसर्या बाजुने पण शेकुन घ्या.
दोसा झाल्यावर ताटात काढुन घ्या. आवडीच्या चटणी बरोबर खायला द्या.
हवे असल्यास वरुन कांदा आणी कोथींबीर पेरा.
टमाटो कांदा चटणी
साहीत्य:
टमाटो २
कांदा १
लसुण ७-८ पाकळ्या
मिर्च्या २
तेल
मीठ
साखर चिमुुुुटभर
राई/ कढीपत्ता फोडणी ऐच्छीक
कृती:
कढईत तेल गरम करा. कांदा परतवुन घ्या.
लसुण व मिर्च्या टाकुन परतवुन घ्या
शेवटी टमाटो घालुन टमाटो नरम होइ पर्यंत शिजवुन घ्या.
थंड झाल्यावर मिक्सर वर मीठ आणी साखर घालुन बारीक वाटुन घ्या. चटणी तयार.
चटणी वर हवे असल्यास राई/कढीपत्ता ची फोडणी करा.
वाचने
11258
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा मसत .
छान पाकृ.
मस्त आवडली, आमची सौ. सुद्धा
मस्त दिसताहेत चटणी दोसे!
करून पहिले पाहिजेत एकदा.
मस्त पाकृ! टोम्याटो चटणीचा
मस्त
छान.
छान.
चटणी मस्त आहे.
मस्त वाटले दोसे. लोणी स्पंज
धन्यवाद
मस्तच आहे पाकृ...
मस्तच ....
झकाsssस....
In reply to मस्तच .... by अनिल कपूर
मस्त!
छाण.
मस्त
सोपी आणि रूचकर दिसते पाकृ.
करून पहायची म्हणून थांबले