Skip to main content

निर्गुणी भजने‬ (भाग २.७) सुनता है गुरु ग्यानी - समाप्त

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 29/07/2016 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्ण भजनाचा अर्थ एकत्र लावायचा प्रयत्न केला तर मला हे भजन जीवाची आणि शिवाची भेट कशी घडवावी त्याचे वर्णन वाटते. म्हणून मग जीवाचा सोहं, शिवाचा ओहं आणि या दोघांचा कायम झीनी झीनी वाजत राहणारा बाजा म्हणजे "ओहं सोहं". धृवपदाबद्दल लिहिताना मी याचेच वर्णन, "कायम होत रहाणारा शांत आवाज" असे केले होते. हा जरी कायम चालू असला तरी त्याचे ऐक्य फक्त ज्ञानी साधकाला कळते. आणि मग त्या साधकाचे वर्णन करताना कबीर म्हणतात, सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी | गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी || असा अर्थ मला जास्त सुसंगत वाटतो.

दडपण

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 29/07/2016 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
"अवो अजौन किती वेळ?" "अगं यीलच इतक्यात रोज याच येळेला येती की" "माझं हात दुखाया लागलं, बाळ्याला खाली ठेवा तो काय एकडाव झोपला की उठाचा न्हाई ; अन जरा हिला घ्या" "अगं ती बघ लाईट दिसाया लागली, आलीच बघ ती?" *** त्याने सतत कर्णकर्कश शीट्टी वाजवली तेव्हा बाजुच्या खुर्चीत डुलक्या देणारा सिनियर झटकन जागा झाला. "काय झालं? " "ते ते " इंजिनाच्या प्रकाशझोतात सिनियरने समोर पाहिलं. एक शिवी हासडत म्हणाला "भोसडीचे झेपत नाही तर एवढी पोरं कशाला काढतात कुणास ठाऊक?" खिडकीतुन हात बाहेर काढुन हलवत "बाजुला व्हा" सांगण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ती ढिम्म हलली नाहीत.

web Hosting

लेखक अबोली२१५ यांनी शुक्रवार, 29/07/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
मला web hosting घ्यायच आहे . कुठलं घेऊ Linux कि window Domain घेतलं आहे Go daddy वरून

असेच काहितरी सुचलेले

लेखक राजू यांनी गुरुवार, 28/07/2016 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आपल्या लहानपणी सर्वांना आकर्षण असायचे ते दिवाळीला मिळणारे फटाक्यांच्या बरोबर नविन कपड्यांचे कारण फटाके फुटल्यानंतर मोठा आवाज व्हायचा आणि नंतर येणारा धुराचा वास जसा आवडायचा तसाच दिवाळीत अंगावर असणाऱ्या नविन कपड्यांचा सुगंध हा मनाला वेडे करायचा. थोडे मोठे झाल्यावर कधीकधी गावातल्या कोणाच्यातरी लग्नात मोठाल्या पंख्यांवरून सोडलेला अत्तरमिश्रित पाण्याचा फवाराही आवडू लागला नंतर नंतर तर नवरा-नवरी यांच्या आसपास वावरताना कार्यालयातील पंखा नाहीतर आलेला वारा सुद्धा अत्तर,सेंटचा मनमोहक सुगंधी झुळूक द्यायचा. कॉलेजला गेल्यावर चार्ली,डार्लिंग,ब्रुट, स्वीटहार्ट अशी काही नावे कानावर पडू लागली नव्हे त्या

बादलीयुद्ध

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 28/07/2016 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
"केवड्याला दिली ओ ही बादली?" "सत्तर रुपये" मी क्यान्सल केली. एकतर सत्तर रुपये ही एक अवाढव्य रक्कम होती. एकरकमी एवढा प्रचंड खर्च करणे तेही एका बादलीसाठी मला अजिबात आवडले नव्हते. दुसरं म्हणजे शंभराची नोट मोडणे माझ्या जिवावर आले होते. खिशात शंभर रुपये असणे ही काय किरकोळ बाब नव्हती. शंभर रुपयात मी इथल्या मॅटीनी थेटरात किमान दोन महिने पिच्चर बघू शकलो असतो. गेलाबाजार शाबुद्दीनच्या गाड्यावर महीनाभर नाष्टाही करु शकलो असतो, पण त्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे लागले असते. जे की मी ठरवलेच होते. बादली क्यान्सल करुन मी न्यू राजस्थान स्वीटमध्ये जाऊन अंडा पॅटीस खाल्ले.

अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत-अमेरीका संबंध

लेखक विकास यांनी गुरुवार, 28/07/2016 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकतल्या निवडणुकांच्या दरम्यान भारतीयांमधे भारत-अमेरीका संबंध चर्चा होणे अपरीहार्य होत असते. त्यात डेमोक्रॅट्स आवडणारे, न आवडणारे, रिपब्लिकन्स कसे बरोबर आहेत वगैरे सांगणारे सर्वच येतात. मी देखील त्यातला एक आहेच! ह्या लेखाचा विषय प्रामुख्याने केवळ अमेरीका-भारत संबंध या संदर्भातच असल्याने या लेखादरम्यान इतर अमेरीकन राजकीय घडामोडींचा कमीत कमी अथवा शून्य संदर्भ देण्याचा प्रयत्न/हेतू आहे. ओबामाच्या विशेष करून पहील्या निवडणुकीच्या वेळेस, त्याच्यावर संशय घेत मॅकेनला पाठींबा देणारे होते आणि आत्ता देखील हिलरी ऐवजी ट्रंप (भारत-अमेरीका संदर्भात) अधिक योग्य असेल असे देखील म्हणणारे आहेत.

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.६) सुनता है गुरु ग्यानी - चौथा आणि पाचवा चरण

लेखक Anand More यांनी गुरुवार, 28/07/2016 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
सुनता है गुरु ग्यानी या भजनाचा कुंडलिनीच्या प्रवासाशी मी लावलेला संबंध काही वाचकांना, "मारून मुटकून गणपती" बनवण्याचा माझा प्रयत्न वाटला. आणि काहींनी सौम्य शब्दात तशी प्रतिक्रिया देखील दिली. अर्थ लावण्याचा माझा हा प्रयत्न म्हणजे ढगांच्या आकारातून प्राणी शोधण्याचा एक प्रकार वाटू शकतो हे मला मान्य आहे, पण माझ्या मनात कुंडलिनी आणि या भजनाचा संबंध लागण्याचे सगळ्यात मोठे कारण असलेल्या चरणापर्यंत आपण आता पोहोचलो आहोत. त्यामुळे या दोन चरणांचा अर्थ वाचताना कदाचित माझा सगळा प्रयत्न वायफळाचे मळे फुलवण्याचा नव्हता हे वाचकांना पटेल असे मला वाटते.

सोबतीण (भाग ३)(शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 28/07/2016 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
"पृथा तुला तर पार त्यातीथे कोकणात अनुभव आला. तोसुद्धा रात्रीच्या अंधारात काहीसा आवाज आणि एक धुसर आकृती... ज्याची तुला आत्ता विचारले तर खात्री देता येणार नाही. पण माझा अनुभव या इथे गजबजलेल्या मुंबईमधला आहे. तो अनुभवच इतका जिवंत आहे की त्यापुढे मरण सोपं  वाटेल," अपर्णा म्हणाली. "ए अपर्णा उगाच नमनाला घडाभर तेल अस करू नकोस हा. काय घडल नक्की सांग बघू मला." पृथा हसत अपर्णाला म्हणाली. "तेच सांगते आहे. पण मला मध्ये  मध्ये बोलून माझी लिंक नको ह तोडुस  पृथा." अपर्णाने तिला दम दिला. त्यावर हसत पृथा म्हणाली, "बर बाई. माझी हाताची घडी आणि तोंडावर बोट. एकदम गप्प बसते आता. तूच बोल... हम्.

विस्फोट

लेखक योगेश कोकरे यांनी गुरुवार, 28/07/2016 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
खुप भांडावस वाटत , ओरडावसं वाटत, जेव्हा गरिबांवर होतो अन्याय, सत्य बोलणाऱ्याची जीभ कापली जाते, जिथे कष्टाचे पैसे उन्माद झालेली गिधाडं पळवतात, अशी एकेक ठिणगी पडत राहते, ठिणग्यांचा बनतो अग्नीगोल, अग्नी गोलाचा बनतो ज्वालामुखी, हाच ज्वालामुखी घेऊन जाऊ इच्छितो, अन्याय करणारे,भ्रष्टाचारी,गुंड,माफिया,बलात्कारी, आतंकवादी यांच्या समुहामध्ये आणि ब्रम्हाडाची निर्मिती ज्या शक्तिशाली स्फोटाने झाली तितक्याच ताकतीने तो ज्वालामुखी फोडू इच्छितो, भस्म होउदेंत सगळे भाडखाऊ यांच्याबरोबर मी देखील भस्म होउदे कारण त्या स्फोटानंतर होणाऱ्या नवनिर्मितीचे सुख असेल मला, माहितीय मला एकटा नाही लढू शकणार इतक्या हरामी
काव्यरस

देवदासच्या निमित्ताने....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी गुरुवार, 28/07/2016 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
आजच आंतरजालावर नेहमीप्रमाणे काहीबाही शोधत असताना समोर बातमी दिसली.... मराठीतल्या देवदासचा पहिला टिझर लाँच.. नेहमीप्रमाणे उत्सुकता चाळवली गेली अन मी त्या लिंकवर क्लिक केलं... 'तुझं लग्न हे माझं स्वप्न होतं आणि ते मी पाहिलंही पण तुझ्या रुपाच्या आणि मनाच्या सौंदर्यात इतका वाहुन गेलो कि नवर्‍याच्या रुपात मलाच पाहायला विसरुन गेलो. आता तर साठलेल्या अश्रुंना पाउलवाटही सापडत नाही ग.त्या अश्रुंची विहीर कधी तुला पाहायला मिळाली असती तर माझ्या दु:खांचा अंदाज तुला लावता आला असता.....मी काय करेन माहिती आहे, मी नक्कि न रडताच श्वास सोडेन.