Skip to main content

वॉर्स ऑफ द रोजीस-भाग 2

लेखक पिशी अबोली यांनी शुक्रवार, 05/08/2016 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
राणी मार्गारेटने लँकेस्टरांचा यॉर्कांविरुद्ध पाठिंबा मिळवणं चालू केलं. यापुढच्या अजून मोठ्या प्रमाणावर लढाया झाल्या त्या १४५९मधे. यात मात्र यॉर्कांचा दणदणीत पराभव झाला व रिचर्ड आणि त्याचा मुलगा एडमंड हे आयर्लंडला, तर त्याचा मोठा मुलगा एडवर्ड आणि त्याच्या बायकोचा भाचा अर्ल ऑफ वॉर्विक हे कालाईच्या बंदरात पळून गेले. पण याचा परिणाम अगदीच उलटा झाला. कालाईचा समुद्री किल्ला आता यॉर्कांच्या ताब्यात आला आणि आयर्लंडने रिचर्डला पाठींबा दिला. परिणामी त्यांनी पुन्हा स्वारी करून राणीला राजपुत्रासहीत पळून जाण्यास भाग पाडले.

आमचा जन्मसिद्ध हक्क !

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 05/08/2016 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
‘अध्यक्ष महाशय, पुज्य गुर्जनवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थीमित्रांनो,... स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करून ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणाया नरकेसरी लोकमान्य टिळकांचा जन्म, ज्याप्रमाणे एखाद्या चिखलात सुंदर कमळ उगवावे त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली या गावी झाला... त्यांच्या वडिलांचे नाव’... ... डोळे मिटून आणि मुठी घट्ट आवळून मागेपुढे झुलत मी टिळक पुण्यतिथीच्या दिवशी आमच्या कोकणातल्या गावातल्या शाळेत भाषणाला सुरुवात केली आणि ‘टिळकांचा जन्म चिखली या गावी झाला’ या वाक्याशी येताच माझी गाडी गडबडली...

थोड्क्यात वळख

लेखक विखि यांनी गुरुवार, 04/08/2016 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवात कराय्च्या आधी थोड्क्यात वळख करुन देतो. काही महीन्यान पुर्वी जाला वर 'मीसळ' वर माहीती गोळा करत होतो.चुकुन हीथ आलो, आन लागली चटक इथली. ईथला भट्कन्ती हा विषय एव्ढा आवडला की तिथली सगळी पान वाचुन काढली. मी सवता हाडाचा भटक्या असल्यामुळ हावर्यागत ते वाचुन टाकल. हळुहळु त्याच्या बाजुला असलेल चर्चा, पाकक्रुती, साहीत्य वाचाय लगलो. इथ्ल्या चर्चा बी चान्गल्याच रन्ग्त्यात. जमल तेवढ वाचल. मग मला बी कायतरी ल्ह्याव वाटु लागल. पन माझ अस वाट्न म्हन्जे एखाद्या ५० किलो च्या नवशिक्या पैल्वान नी डायरेक्ट खुल्या गटाच्या पैल्वानाला खिजवल्या सारख झाल.

गो गोवा... भाग १

लेखक एनिग्मा यांनी गुरुवार, 04/08/2016 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
हिवाळ्याचे दिवस होते. पुण्यात अजून म्हणावी तशी थंडी सुरु नव्हती झाली. अचानक एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमध्ये असताना माझा फोन झर झरला (vibrating mode). माझा जिवलग मित्र विन्या कॉल करत होता. कॉल घेतला की तिकडून आवाज आला, " Party कैसा हे तू ..." , विन्या. "मोजेमे..." मी. "Party, सब लोगा गोआ जानेका पिलाना कऱरे". अचानक मिळालेल्या सुखद धक्यातून सावरत मी त्याला म्हणालो की, " कधी जायचं ? आणि सोबत कोण कोण आहे?" त्यावर विन्या म्हणाला, "अरे बरेच दिवस झाले असं अचानक भयानक काही केल नव्हत म्हणून जेव्हा आज सगळे भेटलो तेव्हाच ठरवलं की गोव्याला जायच सगळ्यांनी" "अरे पण सगळे म्हणजे कोण?", मी.

रिओ ऑलिम्पिक २०१६

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 04/08/2016 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते.

मिपाच्या IT support तज्ञांची मदत हवी आहे..

लेखक सानझरी यांनी गुरुवार, 04/08/2016 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
windows 10 मधे एका user चे desktop icons गायब झालेत. Desktop वर right click पण होत नाही. एका Windows Update मुळे सगळ्याच युझर चे Icons गायब झाले होते. तेव्हा तो perticular windows update (KB3159398) uninstall केल्या नंतर Icons परत आले. पण तेही फक्त windows 7 आणि 8 मधेच. या windows १० मधे तो Update नहिच्चे, त्यामुळे uninstall करण्याचा प्रश्न नाही. System Restore करायचं म्हटलं तर २ दिवसांपुर्वी फक्त Adobe Acrobat update केलं होतं. त्याने काही फरक पडेल असं वाटत नाही. Event Log मधे १५० च्या वर events आहेत. आणि त्यातही नेमकं कशामुळे असं झालंय ते कळेना. Google बाबा कडुनही काही उत्तर मिळेना.

आठवण

लेखक Bhagyashri satish vasane यांनी गुरुवार, 04/08/2016 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
'काळोखाच्या वाटांमध्ये अंधार माझ्या सोबतीला, पावसाळ्याच्या चिंब रात्रीमध्ये तुझ्या आठवणी माझ्या सोबतीला, गेलेले क्षण साक्ष देतात आपल्या प्रितीची, त्या सोबत जागवलेल्या दिर्घ रात्रीची, अबोला तुझा छळतो गं मला क्षणाक्षणाला, असा कसा गं गुंतलो मी तुझ्यात झुगारुन सर्व बंधनांना, आज पाहिलं डोळ्यात तुझ्या जुन्या जखमा ओल्या होतांना.....!

उक्षुम्बाई !

लेखक चिनार यांनी गुरुवार, 04/08/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रभर पावसाची रिपरिप चाललेली..टिनपत्र्याच्या खोलीच्या छतावर होणार टनटन आवाज..खोली कसली?

तसे पाहिले तर....

लेखक दिपाली पोटे यांनी गुरुवार, 04/08/2016 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
तसे पाहिले तर मिसळपाव मला काही नवीन नाही...पण कधी वाटले नाही आपण यावर लिहावे...काल अचानकच सुचले...आता का हे तुम्ही नक्की विचारणार नाही...तर सुचले...लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी एक खुमासदार लेखन...तोवर...

सन १९१६ ते सन २०१६

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 04/08/2016 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
(या धाग्यामध्ये केवळ माझ्या मनातले विचार मांडले आहेत. प्रत्येकाचं मत वेगळ असू शकत.) सन १९१६ "केवळ एकुलती एक लेक आणि तिची इच्छा म्हणून तिला वाड्याबाहेर पडायची आणि घोडा चालवायला शिकायची परवानगी दिली होती आम्ही. पण हे ध्यानात ठेवा की जर तिने शिंद्यांच्या घराण्याची आब्रू वेशीवर टांगायचे ठरवले असेल तर तिच शिर धडावेगळ करून त्याच वेशीवर टांगताना आम्ही एका क्षणाचाही विचार करणार नाही. समजावा आपल्या लेकीला." आप्पासाहेब शिंद्यांनी आपल्या पत्नीला मोठ्या आवाजात समाज दिली.