Skip to main content

न्यू यॉर्क : ०२ : शहराची तोंडओळख

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 29/08/2016 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================================== न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...               ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर...

झाडावर पाखरू बसलं : लावणी

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 28/08/2016 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं

भुंकला

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 28/08/2016 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी याच दिवसांत लिहीलेलं हे विडंबन. केवळ असावं म्हणून प्रकाशित करतोय. (चांगलं नाही हे माहित असूनसुद्धा). इशारा : हे लिखाण 'छी बाबा' प्रकारात मोडणारे असून न वाचलेलेच बरे. .................................................................. शेकड्यातील एकेकास... मी एक ढेल्या नावाचा कुत्रा आहे. माझ्याकडे उदाहरणार्थ एक चांगली लांबसडक शेपटी आहे. बाकी सांगण्यासारखं विशेष असं काही नाही. आपलं नाक सारख गळतं, आणि पाठीला मी सारखा पंज्याने खाजवतो. यापलिकडे स्वतःचं असं काही वैयक्तिक मी सांगणार नाही, कारण ते तर माझ्या पट्ट्यालासुद्धा ठाऊक आहे. मांजर हा प्राणी आपल्याला आवडत नाही.

बेधुंद (भाग : १७ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी रविवार, 28/08/2016 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
सुऱ्याचे दिवस आनंदात 'न्हाऊन' सरत होते . स्वप्नातही त्याने त्याला पियासारखी 'गर्लफ्रेंड' मिळेल असा विचार केला नव्हता. स्वर्ग जर कुठे असेल तर इथेच - पियाच्या मिठीत ! अजून २ वेळा तरी त्याला पियाला भेटता येणार होते , त्याचे दिवसरात्र पियाच्या 'गरम' श्वासांच्या आठवणीत जात होते - स्वर्ग कुठे असेल तर इथेच ! अन, दुसरीकडे एकाच रूम मध्ये राहून नित्याला काहीच चांगले भासत नव्हते ! ऐनवेळी हर्षलाचे 'ट्रेनींग' बदलल्याने , तो दिवसातून २०-२५ वेळा तरी तिला कॉल करत असे पण तीचा नंबर लागत नव्हता . दुसऱ्या कुणाला फोन करायची सोय नव्हती ! महाराष्ट्रापासून दूर असल्याने त्याला काय करावे हे कळत नव्हते .

फाळणीच्या कथा 2 : हमारा देश

लेखक महासंग्राम यांनी रविवार, 28/08/2016 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ उर्दू कथा : इब्ने इंशा ________________________________ इराण मध्ये कोण राहतात ?? इराण मध्ये इराणी लोक राहतात इंग्लिस्तान (इंग्लंड) मध्ये कोण राहतात ?? इंग्लिस्तान मध्ये इंग्लिश लोक राहतात. फ्रान्स मध्ये कोण राहते ?? फ्रान्स मध्ये फ्रांसिसी लोक राहतात!!! हा कोणता देश आहे ?? हा पाकिस्तान आहे !!! इथे पाकिस्तानी लोक राहत असतील ना ?? नाही, इथे पाकिस्तानी नाही राहत !!! इथे सिंधी राहतात !!! इथे पंजाबी राहतात !!! इथे बंगाली राहतात !!! इथे हे लोक राहतात, इथे ते लोक राहतात पण पंजाबी तर हिंदुस्तानात पण राहतात ??? सिंधी तर हिंदुस्तानात पण राहतात ??? बंगाली तर हिंदुस्तानात पण राहतात ??? मग हा व

पावसाची रुपे

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 28/08/2016 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
नभांसवे वा-याची नवी तान घुमली जलधारांच्या नादसंगिताची साथ लाभली डबक्यातल्या पाण्यात होडी डुलू लागली निरागस पावसात ती कैकवार डोलली शोधार्थ त्याच्या ती ही बाहेर पडली जिची छत्र्ी मुद्दामच होती विसरलेली खट्याळ पावसात ती जास्तच भिजली गालावरील आसवे सर्वांपासुन लपुन राहिली एक बाग उदास होती बनलेली जिथे कैक व्रद्ध जोडपी होती विसावलेली एक सरी त्या जोडप्यावरही बरसली भुतकाळच्या आठवणीत ती आजही रमली क्षणोक्षणी ह्या पावसाने रुपे बदलली परि त्याची साथ न सुटली

सायकल कट्टा - पुणे - २७ ऑगस्ट २०१६

लेखक मोदक यांनी शनिवार, 27/08/2016 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच महिन्यांपासून ठरत असलेला सायकल कट्टा आज पुण्यात पार पडला. प्रत्येक वीकांताला कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या राईडमध्ये बिझी असल्याने एकत्र भेटीचा योग येत नव्हता. घमासान चर्चा आणि फोनाफोनी होवून शेवटी पुण्याचा कट्टा शनिवारी सकाळी ठरलाच.. ग्रूपवर ठरल्याप्रमाणे ज्यांना जमणार आहे ते सायकलवीर सायकल चालवत चांदणी चौकात जमणार.. आनंदराव बुलेट आणि कपिलमुनी कारमधून येणार असेही ठरले. पुपेंसाठी (पुण्याचे पेशवे) ठिकाण जवळच असल्याने ते डायरेक्ट मल्टीस्पाईसला भेटणार होते. मी सकाळी सकाळी स्वच्छ उजेडात बाहेर पडलो आणि अर्धा पाऊण तासात चांदणी चौकात पोहोचलो. तेथे सागर, अभिजीत आणि प्रशांत मालक भेटले.

गारभेंड्यांची भाजी

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 27/08/2016 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्या सर्वत्र रानभाज्यांची चर्चा सुरु आहे. त्यातलीच ही "गारभेंड्यांची भाजी".  इतकी वर्षं जांभळी नाक्यावर जातेय पण कधी ही भाजी विकायला दिसली नव्हती. हिची ओळख झाली एका येऊरच्या ट्रेकमध्ये. ट्रेक संपला तेव्हा आमच्या बरोबर आलेल्या आदिवासी वाटाडयाची  पोतडी भरपूर रानभाज्यांची भरली होती. अळू (तेरं), बांबूचे कोंब याबरोबर होती ती लाल लाल देठांची गारभेंडी. दिसायला पटकन लाल माठ वाटते पण याची जातकुळी  वेगळी. पानं फुलं यायच्या आधी लाल मोठा कोंब उगवतो तो तोडायचा. उकडून साल काढून आणि मीठ लावून पण ही खातात.

काय, कधी कुठे? - अमेरिका

लेखक पिलीयन रायडर यांनी शनिवार, 27/08/2016 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं.. तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं. जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत. आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली! किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं!

माणसं वाचणारा शायर : राजेश रेड्डी

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 27/08/2016 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे. मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली. आधुनिक काळात राजेश रेडडी हे नाव याच यादीत घेतलं जात. त्यांची उर्दू भाषेवर तेवढीच पकड आहे जेवढी हिंदीवर. त्यामुळे मातृभाषा उर्दू नसतांना त्यांनी उर्दू गझलेत जे मानाचं स्थान प्राप्त केलंय ते निश्चितच कौतुक करण्याजोगं आहे.