उदय हुसेन - इराक चा नरराक्षस
उदय सद्दाम हुसेन.. खरे तर असल्या कुप्रसिद्ध माणसावर लेख लिहायची आणि स्वतःचे व इतरांचे मन कलुषित करायची आवश्यकताच काय, परंतु माणूस किती चरित्रहीन असू शकतो हे सांगण्यासाठी हा लेखप्रपंच.
सामान्य इराकी लोकांनी काय कुणाचे वाकडे केले आहे तेच समजत नाही. यादवी व अस्थिरता कायम त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते. माणसाला जेवढा स्वतःचा इतिहास ज्ञात आहे तेवढ्या संपूर्ण काळात त्या देशाचीच नव्हे तर त्या संपूर्ण प्रांताची हीच अवस्था आहे. सद्दाम हुसेन नि १९७९ साली जेंव्हा संपूर्ण इराक वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले तेंव्हा खरे तर इराक ला बरे दिवस आले होते.
मिसळपाव
