Skip to main content

सरसगड सुधागड अवचितगड

लेखक चेतन पडियार यांनी बुधवार, 31/08/2016 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
'पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकून देऊन पावसात जाऊन भिजायचं!' महाराष्ट्रात भटकंती करणाऱ्या प्रत्येकाला हि कविता शोभते, कारण आपला सखा सह्याद्री त्याला साद घालत असतो. मग आपल्या शहरातल्या रस्त्यावर पावसात किंवा घराच्या गच्चीत जाऊन भिजायचं कि सरळ सह्याद्रीला जाऊन भिडायचं?? हा प्रश्न आपल्या सर्वांना उद्भवतो आणि अर्थातच त्याच होकारार्थी उत्तर हि आपलं तयारच असतं. मग आपल्या सारखे डोंगर भटके, निसर्गप्रेमी किंवा नुकताच फोटोग्राफी चा छंद बाळगणाऱ्या मित्रांची यादी समोर येते अन फोनाफोनी सुरु! कुणाच्या तरी आईला पटवून सांगावं लागतं तर कुणाच्या मोठ्या भावाला कटवून जावं लागतं.

हिमालय, रॉली आणि मी. भाग २ : लेह - त्सो मोरीरी

लेखक किल्लेदार यांनी बुधवार, 31/08/2016 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय, रॉली आणि मी. भाग १ : लेह - तुर्तुक माझा एक आवडता चित्रकार आहे, व्हिन्सेंट वॅन गॉग. सढळ हाताने आणि अतिशय कल्पकतेने केलेला रंगांचा वापर ही याची खासियत. कॅफे टेरेस ऍट नाईट हे त्याचे तैलचित्र बघितले आणि त्यावर फिदाच झालो. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर केलेला पिवळ्या रंगाचा वापर अफलातून आहे. याची चित्रे अतिशय ओबड-धोबड असली तरी एकंदर मांडणी आणि रंगसंगतीमुळे काळजाचा ठाव घेतात. फ्रांस मधल्या या चित्रकाराची चित्रं प्रत्यक्ष बघण्याचा योग आजतागायत कधी आला नाही पण माझी ती हौस हिमालयाने नेहमीच पूर्ण केली.

देह / अवयव दान - काळाची गरज

लेखक क्रेझी यांनी बुधवार, 31/08/2016 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या टाईम्स ऑफ इंडिया पेपरमधे मी ऑनलाईन ऑर्गन डोनेशन बद्दल वाचलं. खाली दोन साईट्स दिल्या आहेत जिथे जाऊन हे करता येईल www.dmer.org www.ztccmumbai.org काही विचारपूस करावयाची असल्यास हेल्पलाईन नंबर्स helpline numbers: 1800274744, 1800114770 मला ह्याबाबतीत बरंच कुतुहल आहे. मला माझे डोळे दान करायची इच्छा आहे पण मला चष्मा आहे तरी मी डोळे दान करू शकेन का? मध्यंतरी मी एके ठिकाणी वाचलं की, माणसाच्या शरिरातला प्रत्येक अवयव म्हणजे हृदय सुद्धा नविन पेशींनी तयार होतं, त्याला बराच काळ लागतो.

PoE - पॉवर ओव्हर इथरनेट

लेखक रुपी यांनी बुधवार, 31/08/2016 05:44 या दिवशी प्रकाशित केले.
गूगल पाठोपाठ आता फेसबूकही भारतात रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा देण्याच्या विचारात आहे. यासंबंधित अधिकार्‍यांमध्ये यावर चर्चा चालू आहेत. मोफत सुविधा पुरविण्यामागचा हेतू, राजकारण यावर तर स्वतंत्र लेख/ चर्चा होऊ शकते. या लेखाचा उद्देश मात्र एका वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधण्याचा आहे.

भंडारदरा ते शिवनेरी: दोन दिवस ढगात.. भाग 1

लेखक पी. के. यांनी मंगळवार, 30/08/2016 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षीचा निम्मा पावसाळा सरला तरी एकही मोठी भटकंती झाली नव्हती त्यात नवीन बाईक घेऊन चार महिने झाले तरी घर ते स्टेशन आणि स्टेशन ते घर या पेक्षा जास्त चालवायला चान्स भेटला नसल्यामुळे आतुन चरफडत होतो. आणि अशाच एका दिवशी नशीब माझ्यावर फिदा झालं. बायको:- माहेरी आईनं बोलावलंय दोन वीक साठी... (पाच सेकंद शांतता) बायको:- काय, कुठं हरवला.... आता तिला काय सांगू कि या पाच सेकंदात मी रायगडच्या बाजार पेठेतून फिरून, दिवेआगरच्या समुद्रात अंघोळ करून मुरुड च्या पाटील खानावळीत सुरमई खात होतो. (कधी कधी मलाच माझ्या मानाचं कौतुक करावंसं वाटत बायको शेजारी असून ते कसलाही विचार करू शकत.

काही तोंडी लावणी

लेखक औरंगजेब यांनी मंगळवार, 30/08/2016 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
जर घरात पोळी आणि भाताशी काहीही खायला नसेल तर खालील पदार्थ करता येतील. स्वतःच्या जबाबदारीवर हे पदार्थ करावेत. मी केले तेव्हा मला आवडले. ते तुम्हाला आवडतीलाच अस काही नाही. लोणचे+दाणे भाताबरोबर खायला उत्तम. साधे शेंगदाणे भाजून घ्यायचे मग त्यावर लोणच्या चे तेल घालायचे. सगळे एकदम मिक्स करा. मग आनंदाने खाणे. दाणेकूट+ तूप + साखर ह्याचे प्रमाण २:१:१ असे आहे. दोन चमचा दाणे कूटला १ चमचा तूप आणि एक चमचा पिठी साखर. मिक्स करा आणि मस्त खा पोळी बरोबर अजून काही ऑपशनल तोंडी लावणी दिली आहेत त्याची कृती मला माहित नाही.

काही ठिकाणे काही आठवणी - २ [खादाडी स्पेशल भाग]

लेखक औरंगजेब यांनी मंगळवार, 30/08/2016 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
आपण पहिला भाग वाचू शकता ह्या लिंक वर:- http://www.misalpav.com/node/37088 ०१: श्री हनुमान डेअरी - ठाणे \ श्रद्धा सर्व्हिसेस ठाणे गोड प्रचंड आवडत असल्यामुळे राम मारुती रोड वरची श्री हनुमान डेअरी म्हणजे जन्नत. गरम गरम जिलबी , काजूकातली , कलिंगड बर्फी ह्या सगळ्या गोष्टी प्राणाहून प्रिय. हनुमान डेअरी मध्ये नमकीन सुद्धा मिळत. पोहे चिवडा / कचोरी तर अगदी उत्तम. दुसरे ठिकाण म्हणजे श्रद्धा सर्विसेस. आता हे पण मिठाईचे दुकानच आहे.

ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचे निधन

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 30/08/2016 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
.. ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचे निधन नव्वदीचे वय. निसर्गक्रम कुणाला चुकलाय पण बातमी वाचून वाईट वाटले. युद्धस्य कथा रम्यः म्हणतात. तेव्हा आम्ही आठवी नववीत असू. अर्ध्या कच्च्या वयात लहाना मधले प्रौढ अशी गणना होउ लागल्यावर हातात पडलेले पहीले पुस्तक. त्याकाळी तासगाव सारख्या ठिकाणी आम्हा सर्वांच्या घरी पुस्तके खूप असायची. भा.रा.

मंटो च्या लघुकथा २ : कम्युनिजम

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 30/08/2016 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
 कम्युनिजम मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो. १९१२-१९५५ _________________________________________________ तो आपल्या घरातलं सगळं गरजेचं सामान एक ट्रक मध्ये भरून दुसऱ्या शहरात निघाला होता. तेवढ्यात रस्त्यामध्ये त्याला लोकांनी अडवलं. एक जण ट्रक मधल्या सामानावर नजर टाकत म्हणाला, " पहा, एवढा मोठा माल एकटाच उडवून चालला आहे.