माझे बाबा
नोव्हेंबर २०२३ मध्ये माझे बाबा गेले. वय ८२ पूर्ण होते. लौकिकार्थाने त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या होत्या. तोपर्यंतचे आयुष्य आनंदाने जगले होते. त्यामुळे फार त्रास न होता ते गेले म्हणजे त्यांचं सोनंच झालं. पण... हा पण खूप मोठा आहे. ते गेल्यावर लक्षात आलं की आपल्या बाबांचे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
खरं तर हे इतकं खाजगी असं चव्हाट्यावर मांडायची खरंच काय गरज! इथे लिहिण्यामागे दोन कारणं आहेत. एक तर असं म्हणतात की "More you write personal, more it becomes universal".
मिसळपाव
“पाकिस्तानने भारताला सहज पराभूत केले आणि केवळ संयुक्त राष्ट्रांच्या युद्धविरामामुळे युद्ध थांबले."
- जेम्स विनब्रँड (1965 कच्छ रण युद्धासंबंधी. पाकिस्तान आणि मध्य आशिया तज्ञ)
"कोण जिंकतो आणि कोण हरतो याने काय फरक पडतो? त्यांना कश्मिर हवे होते. ते मिळाले का? नाही. आम्ही आमच्या सीमांचे रक्षण केले.