Skip to main content

डोंगरवाटा , पुस्तक परीचय

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 25/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
अजून वाचतोय...या पुस्तकाने भूरळ पाडली, गारुड केलं जणू, मंत्रमुग्ध झालो. --------------------------------------- डोंगरवाटा लेखक : शेखर राजेशिर्के प्रकाशन: सृजनरंग प्रकाशन मुद्रक : प्रमोद घोसाळकर संपादक : श्रीरंग पटवर्धन मुद्रीतशोधन : उदय शेवडे किंमत : रु.900 असं म्हणतात कि वीरांचे पोवाडे,वीरांनीच गावेत... त्याच न्यायाने, ह्या पुस्तकाचा परीचय लिहीण्याआधी पात्रता निकष ( क्लालीफीकेशन राऊंड ) पास करणे मला आवश्यक वाटले, म्हणून कनकेश्वर (अलीबाग) ट्रेक केला, काल पुण्यात पहाटे वेताळटेकडी वर जाऊन आलो.

पॉलीअनाची कथा

लेखक भागो यांनी सोमवार, 25/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो मी अलीकडेच एक कथा वाचली. ती मला एव्हढी भावली की वाटलं कि ह्या कथेची मिपाकरांना ओळख करून द्यावी. म्हणून हा लेख, १९१३ साली अमेरिकन लेखिका एलेनोर पोर्टर ह्यांनी “पॉलीअनाची कथा” नावाची कादंबरी लिहिली. ही पॉलीअना नावाच्या तेरा वर्षाच्या अनाथ बालिकेची आणि तिच्या “शाश्वत आनंदा”च्या खेळाची कथा आहे. ह्या कथेने जनमानसाची एव्हढी पकड घेतली की अमेरिकेत ठिकठीकाणी ह्या कथेत सांगितलेल्या तत्वज्ञानावर आधारित “आनंदी क्लब” सुरु झाले. ह्या क्लबातून पॉलीअना चा सुप्रसिद्ध खेळ खेळला जाऊ लागला. ही कथा जगाच्या अनेक भाषात भाषांतरित झाली. ह्या कादंबरीच्या लाखो प्रती खपल्या.

प्रश्नाच्या उत्तरातल्या प्रश्नाचं उत्तर..

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 24/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
एक सांगू? उत्तरात नं, अलगद एक प्रश्न ठेवून द्यावा.. बासुंदीच्या वाटीवर कसं हलकं केसर पेरतो ना तसा. मग संवादाला लाघवी स्वाद येतो, मोहक रंग चढतो, दिवसभर चेह-यावर कळत नकळतसं एक हसू खेळत रहातं! म्हणून तर! एक तरी प्रश्न उत्तरात असूच द्यावा ... कारण हम्म् शी हम्म् असं किती वेळ चालणार? स्माईली ला स्मायली असं किती वेळ खेळणार? मारून मुटकून कवितेच्या, सुविचारांच्या मोळ्या तरी कुणी किती बांधणार ? त्यापेक्षा उत्तरात अलगद एक प्रश्न असूच'च' द्यावा ... मग कारण मिळतं, अकारण दार खटखटवायचं. नाहीतर "बोलू की नको, आत्ता की मग?

स्वराज्य

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 24/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ हिंदुत्वाचा / कर्मठतेचा / संकुचित पणाचा प्रचार करणार चित्रपट अशी आवई उठवलेला गेलेला "वीर सावरकर" हा हिंदी / मराठी चित्रपट नुकताच पहिला एका शब्दात यावर परिक्षण लिहायचे तर केवळ एक शब्द विचारत येतो, तो म्हणजे "स्वराज्य .... बस ....

बेतुक्याचे चर्हाट.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 22/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
एक वर्षापुर्वी वळलेले चर्हाट...... https://misalpav.com/node/51141 आता पुढे. K-जरी चंचल,चपळ मासोळी लावली जाळी, तरी न लागे गळी खेळतसे जळी, धीवरा संगे खेळतसे रडीचा डाव धीवरा न देतसे भाव आता करू काय उपाव धिवर म्हणे.... धीवरे घातले साकडे वाचून आकडे, प्रार्थना केली मिटला संदेह,सुटला आदेश वाढले बळ, हलले दळ सत्वर पातले धीवर यमुना जळी खेळ रंगला यमुनातीरी "रापण", करण्या फेकली जाळी ओढला किनारी K-जरी,लीलया शक्ती अपरंपार, धीवरा माजी न लागे पार जैसा ठाव जळापरी बेतुक्या म्हणे, -बेतुक्या राॅक्स.
काव्यरस

आम्रतरू-आम्रमंजिरी(मोहर)

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 22/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
a “ते शब्द ऐकून तिचे मन मोहरले ”, “माळरानालाही मोहर फुटला”, “अंकुराचे फुटणे,आंब्याचे मोहरणे आणि चाफ्याचे दरवळणे” अशा अनेक वाक्यांत नाजूक मोहरणे हा शब्द प्रयोग कायमच आवडतो.गात्री रसांचा उन्माद झाली की झाड काय माणसाचे मनही मोहरत अशी आनंददायी ही कविकल्पना आहे. पण वसंतोत्सवाचा खरा प्राण अनेक मनमोहक फुलांचा

आमची संगीत यात्रा..

लेखक भम्पक यांनी गुरुवार, 21/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
काल पोराने ऑनलाईन मागवलेला अँपल चा एअरपोड आला. चेक करू म्हटले तर काय तंत्रज्ञान प्रगत झाले आहे याचा प्रत्यय आला. त्यात नॉइज कॅन्सलेशन चा पर्याय होता .आता नॉइज कॅन्सलेशन म्हणजे त्या एअरपोड मध्ये अशी काही रचना असेल कि ते कानात फिट बसतील अन बाहेरचा गोंगाट कमी होईल अशी माझी भाबडी समजूत.पण या एअरपोड ने तीला मूठमाती दिली.कारण कानात बसवल्या बसवल्या जेव्हा नॉइज कॅन्सलेशन चे ऑप्शन निवडले अन एकदम प्रचंड शांतता पसरली. बापरे हे मात्र जबरीच होते अन संगीत हि एकदम शुद्ध स्वरूपात ऐकायला मिळत होते.अर्थातच इंग्लिश गाणी..आजूबाजूला असलेला गोंधळ कणभरही जाणवत नव्हता.मी प्रचंड प्रभावित झालो.

रखमाई

लेखक मी-दिपाली यांनी गुरुवार, 21/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
“ मून पे कदम रखनेवाला पहला इंसान कौन था ?” लेक्चर हॉलमध्ये प्रोफेसर विरू सहस्रबुद्धे उर्फ व्हायरसने प्रश्न विचारताच एकापाठोपाठ अनेक आवाज ऐकू येतात उत्तरादाखल, “ नील आर्मस्ट्रॉंग, सर. ” “ obviusly he was, we all know it. लेकिन दुसरा कौन था ? ” “.....” विचाराला फारसा अवधीही न देता लगेचच व्हायरसचं पुढचं वाक्य कानावर पडतं, “ Don't waste your time, it is not important. Nobody remembers the man whoever came second..” ‛थ्री इडियट्स' चित्रपटातील हा प्रसंग. असंच काहीसं ‛दुसरेपणाचं’ नशीब घेऊन जन्माला आलेलं एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे ‛डॉ. रखमाबाई राऊत' ! डॉ.

माझी मॅट्रिक आणि आत्ताच्या एक्झाम्स.

लेखक आजी यांनी गुरुवार, 21/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
त्या अनादि,अनंत, सर्वसाक्षी जगन्नियंत्याने आपल्या ललाटावर भाग्यरेखा लिहिताना अहर्निश परीक्षा देणंच लिहिलं आहे,असं प्रत्यंतर प्रत्येक जीवात्म्यास हा भवसागर पार करत असताना येत असतं! बास,बास,बास! पिळापिळी पुरे! ह्याच लायनीवर ही सगळी पोस्ट लिहीत बसले ,तर माझी दमछाक होईल. सोप्या भाषेत मला एवढंच म्हणायचं आहे की, आपल्यापैकी प्रत्येकाच्या नशिबात, रोजच्या व्यवहारात परीक्षा देणं लिहिलेलंच असतं. खरं तर मला रोजच्या रोज येणाऱ्या संकटरुपी परीक्षेवर लिहायचंच नाहीये. मला लिहायचंय ॲक्चुअल परीक्षेवर.

कॉफी...

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 21/03/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरा स्वच्छ टॉवेल गुंडाळून शॉवर मधून बाहेर येत तू मला कॉफी विचारतोस. तुझ्या आजुबाजुला शॅम्पूचा वास घमघमत असतो, माझ्या तनामनावर तृप्तीची गोड साय धरलेली असते. ती मोडून कॉफी पिणं जीवावर येतं. शिवाय तशीही कॉफी काही माझी फार आवडती असंही नसतं. पण तरीही, मी मान हलवत होss म्हणते. कारण तुला ती करताना पहाणं कॉफीहूनही फ्रेश असतं. तू बोलता बोलता पाणी उकळायला ठेवतोस. मग "मग" घेतोस. मी लगेच " मला तुझ्यातलीच शेवटची थोडी" म्हणून तुझी लगबग थोडी कमी करते. तू शांतपणे कॉफीचे दोन सॅचे त्यात रिकामे करतोस.