कट्यार, गाणी, गीतकार
स्थळ शिवाजी पार्क, दादर.
वेळ संध्याकाळी ७च्या सुमारची,
मी CCDजवळ वाट पाहत होतो. शेवटी एकदाचा धापा टाकत समीर आला, तेवढ्यात मागोमाग मंदारही आला. आता तुम्ही
म्हणाल की कोण समीर? कोण मंदार? तर समीर सामंत आणि मंदार चोळकर. हे दोघेही तरुण पिढीचे तरुण कवी, गीतकार.
कविता करणं आणि आपल्या समविचारी मित्रांबरोबर मैफली जमवून त्या ऐकणं, ऐकवणं हा आवडता उद्योग. २०१०-११च्या सुमारास या दोघांना आणि अशाच काही इतर तरुणांना अचानक एक व्यासपीठ मिळालं. Orkut. आजपर्यंत जे मिळालं नव्हतं, ते त्यांना ह्या व्यासपीठावर मिळायला लागलं - प्रतिक्रिया.