Skip to main content

प्रवास २

लेखक जॉनी यांनी शनिवार, 29/10/2016 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग: प्रवास १ "हो आई सगळं व्यवस्थित आहे इकडे, मस्त चाललंय" "हो हो जेवण पण चांगलं असतं गं" "तू काळजी नको करू, आय थिंक रजा मिळेल थोड्या दिवसात, मी कळवेन तसं" "बाय" आईने मुलगी बघितली असणार लग्नासाठी आणि म्हणून सुट्टी काढून ये लवकर म्हणून मागे लागली होती. आपल्या साध्या सरळ घराबद्दल आठवून त्याला मजा वाटत होती. आई तर काल परवा पर्यंत म्हणत होती कोणत्याही कंपनीत वगैरे चांगली नोकरी मिळेल, सोड आर्मीचा नाद म्हणून, पण तिने कधी त्याच्या जिद्दीला लगाम सुद्धा घातला नव्हता.

मॉरल ऑफ द स्टोरी

लेखक वडगावकर यांनी शनिवार, 29/10/2016 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टीचा दिवस.... दबाके खाना खाया.... दमआलु और रोटी (पोळीच पण रोटी म्हणालं की त्या पोळीला स्टेटस वाढल्या सारखं,शिवाय त्या दमआलु ला पण उगीच इन्सल्टिंग वाटत नाही ).... आणी आफ्टरनून वॉक साठी बाहेर पडलो.. नदीपात्रा च्या काठावर एक दोन जणं वाकून काहीतरी करत होते... ती पोरं काय करतायेत?..... नको तिथं माझं कुतूहल जागं होतं....

मोस्ट एलिजिबल बॅचलर...2016

लेखक जयू कर्णिक यांनी शनिवार, 29/10/2016 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाइलची बेल वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, ‘०२२’ आणि पहिले चार डिजिट… अरे हा तर ‘बॉंबे हाऊस’ मधून आलेला, म्हणजे टाटा मोटर्स मधील कुणा मित्राचा फोन असणार. ‘हॅलो…’ आता कुणा मित्राचा परिचित आवाज कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, इझ जयंथ कार्निक देअर?’ – जयंत कर्णिक ची एवढी वाट लावली म्हणजे मित्रांपैकी कोणीच नाही.

क्षणाचे सोबती....

लेखक राजेंद्र देवी यांनी शनिवार, 29/10/2016 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणाचे सोबती.... कशाला हवेत नगारे नौबती आपण सारे क्षणाचे सोबती जुळुनी येती जेव्हा प्रेमाची नाती कशाला हवीत रक्ताची नाती नुसतेच फोफावती वृक्ष सारे भगवंताच्या माथी तृणाचीच पाती वृथा तळपती सूर्याची किरणे तिमिरात तळपती समईच्याच ज्योती रोवून दाव एकतरी निशाण जगात आहेत मोजकेच जगज्जेती राजेंद्र देवी

Nature's Thoughtful Trail

लेखक अश्विनी वैद्य यांनी शनिवार, 29/10/2016 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
Nature's Thoughtful Trail असंच एका पहाटे - अर्थातच सुट्टीच्या दिवशी, पाठीवर छोटी बॅग (पोटापाण्याची सोय) अडकवून आणि आवडत्या गाण्यांची playlist load केलेला फोन बरोबर घेऊन अगदी एकटीने पायी बाहेर पडले. ठरवलं असं काहीच नव्हतं. म्हणायला तरी, रस्ता नेईल तिकडे पाय वळवणार होते… पण पायाखालची माती अगदीच अनोळखी नव्हती, त्यामुळे नेहमीच्या रस्त्याने गावाबाहेर पडले. बाहेर पडताना आजवर चिकटलेले किंवा चिकटवून घेतलेले सगळे मुखवटे, सगळ्या जबाबदार्‍या, सगळी लेबलं तात्पुरती तरी काढून ठेवून, निदान तसा प्रयत्न करून घराबाहेर पडणार होते.

शेअरबाजार : सहजसोपी गुंतवणूक हीच यशाची गुरुकिल्ली!!!

लेखक प्रसाद भागवत यांनी शनिवार, 29/10/2016 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
शेअरबाजार : सहजसोपी गुंतवणूक हीच यशाची गुरुकिल्ली!!! ...१९८०-९०च्या दशकातील रशिया आणि अमेरिका यांच्यामधील शीतयुद्ध संपल्यानंतरचा हा किस्सा आहे. या दोन बलाढ्य राष्ट्रांचे वैज्ञानिक काहीतरी कारणानिमित्त एकत्र भेटले. बर्‍याच विषयांवर चर्चा होत असताना चांद्रमोहिमेचा विषय निघाला, तेव्हा अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितले की मोहिमेत बाकी विषेष तांत्रिक अडचणी नव्हत्या, पण शेवटच्या टप्प्यात चंद्रावर गुरुत्वाकर्षण नसल्याने तेथे चालू शकेल अशा 'स्पेस पेनातली' शाई तयार करण्यासाठी मात्र फार डोकेदुखी आणि अफाट खर्च झाला.

दशकुमारचरितम वाकाटक

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 29/10/2016 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्राची लिंक http://www.mediafire.com/view/518ak8qx2z0xxkc/Dashkumar-Covers-web.jpg 1 मी मध्ये 'दशकुमारचरितम'चे भाषांतर करायला घेतले आणि मोठ्या कष्टाने ते पूर्णही केले, त्या पुस्तकाची ही प्रस्तावना. हे भाषांतर करताना मी श्री. जॅकॉ यांच्या इंग्रजी भाषांतराचा मूळ संस्कृत ग्रंथाचा आधार घेतला आहे. त्यामुळे माझी फारच तारांबळ उडाली. पण मूळ संस्कृत ग्रंथ वाचायलाच लागला.

तडिंजु

लेखक आतिवास यांनी शनिवार, 29/10/2016 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
तडिंजु यंदा माझ्यासाठी दिवाळी जरा लवकरच आली. एक-दोन दिवस पुढेमागे नाही, चांगली पंधरा दिवस आधी आली. फटाक्यांचे आवाज, घरांसमोरच्या अंगणात मंद तेवणार्‍या पणत्या आणि मेणबत्त्या, घरांच्या खिडकीतून डोकावणारे आकाशकंदील. सुपरमार्केटमध्ये लागलेले जंगी सेल आणि मालाने भरलेली दुकानं. रस्त्यावर दिसणारी अगणित माणसं. खरेदीची लगबग आणि सगळीकडे ओसंडून वाहणारा उत्साह.

व्यसनाच्या मगरमिठीतून सुटताना...

लेखक मोदक यांनी शनिवार, 29/10/2016 00:33 या दिवशी प्रकाशित केले.

आपल्या नातेवाइकांमध्ये, मित्रांमध्ये, ओळखीच्या लोकांमध्ये व्यसनाच्या आहारी गेलेले अनेक लोक असतात. मात्र योग्य वेळी डोळे उघडून व्यसनाधीनतेच्या दु:खदायक चक्रातून बाहेर उडी मारून पुन्हा नव्याने आयुष्याची घडी बसवणे खरोखरी धैर्याचे काम आहे.
व्यसनाशी चिकाटीने लढून तब्बल १८ वर्षे व्यसनमुक्त राहणारे आपले असेच एक मिपाकर मित्र मानस चंद्रात्रेंशी आज गप्पा मारू या..

आपल्या लहानपणाबद्दल थोडी माहिती आणि कौटुंबिक पार्श्वभूमी सांगाल का?