Skip to main content

खरा पुत्र : बोधकथा

लेखक संदीप डांगे यांनी मंगळवार, 15/11/2016 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
(लहानपणी कधीतरी वाचली होती, आज आठवली काही निमित्ताने) तीन स्त्रिया पाणवठ्यावरून पाणी भरून डोईवर मडकी घेऊन घराकडे निघतात, मान डूगडुगते तिघींची, वय झालंय. त्यांची एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी गावात आलेली असते, तीही त्यांना सामील होते, गप्पा सुरु होतात, बायकाच त्या! साहजिक गोष्ट मुलांवर येते, तिघींपैकी दोघींचे चेहरे अभिमानाने उजळतात. पहिली सांगते माझा मुलगा पंचक्रोशीतला सर्वात बुद्धिमान मनुष्य आहे, संस्कृत, वेद, शास्त्रे यावर त्याच्याशी कोणी जिंकू शकत नाही, त्याने भल्याभल्याना पाणी पाजलं आहे!

नाशिकची उत्सव संस्कृती

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 15/11/2016 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या नाशिक ‍विभागाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला निमंत्रित लेख.) नाशिकची उत्सव संस्कृती हा विषय दिवाळी अंकातील लेखासाठी आपण सुचवला, हे योग्य केले. नाशिकची खास अशी उत्सव संस्कृती आहे, हे खरे आहे. पण नाशिक म्हणजे केवळ नाशिक शहर नव्हे तर नाशिक व परिसर आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील उत्सव संस्कृती हे स्पष्ट केल्याने विषयाची व्याप्ती वाढली. अशा वाढलेल्या व्याप्तीमुळे ग्रामीण भागातील अद्याप उजेडात न आलेल्या प्रथा परंपरांची थोडक्यात नोंद घेता येईल व या परंपरा काय आहेत हे महाराष्ट्रभर कळू शकेल.

गोष्ट एका लग्नाची ...भाग -२

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 15/11/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट एका लग्नाची ..... गोष्ट एका लग्नाची ... भाग - २ बस्ता न खस्ता... लगीन घर म्हनजी आठवडेबाजार पेक्षा कमी नसतंय ,कोण काय बोलतय काय सांगतय कैच ताळमेळ नसतोय काम करणारे ४-५ न उंटावरून शेळ्या हाकणारे बाकी समदे :) सकाळी सकाळी २ जीभडे दारासमूर येऊन उभे राहिले आज बस्ता मह्यावाला :) रातीपासून बाया- बापड्यांची कलकल ऐकून माझं डोकं ठणाणा वाजत होत."निस्ता पसारा करून ठेवलाय घरभर , बबन्या ,अरे गोधड्यांच्या वळकुट्या कर की पाहत काय बसलाय , न तुमी दोघी जरा कौशीला मदत करा का निस्त्या हिंडताल इथून तिथं न तिथून हिथं!

लग्न कशासाठी

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 15/11/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीच्या काळी एकदा लग्न झाले की ते आयुष्यभर टिकवावे लागत असे. लग्न ही संस्था वास्तविक जीवनातल्या काही गरजा भागवण्यासाठी निर्माण झाली, अनेक गरजांपैकी महत्त्वाची एक गरज शारीरीक होती. पण हे लक्षात न घेता लग्न हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला गेला. एखाद्याचे लग्नच झाले नसेल तर त्याच्याबद्दल फार विचित्र मते व्यक्त केली जातात, याच्यात काहीतरी कमतरता असली पाहीजे असे बोलले जाते. स्त्रियांना तर बिन लग्नाचे राहण्याची परवानगीच नाही. "आई" होण्या मधेच तिच्या जन्माचे सार्थक आहे. आता आई ही जगातली सर्वात महान गोष्ट आहे. आई होण्यासाठी आधी कुणाची पत्नी झाले पाहीजे.

पाश्शेहजाराच्या गोष्टी: २. नोट

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 15/11/2016 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्टी तशी थंडी अजून जोरदार पडत नसली तरी नोव्हेबरमध्ये सकाळी सहाची वेळ म्हणजे थंडीची वेळ. नाशिककडं जाणा-या एसटी बसमधले प्रवासी खिडक्या बंद करून बसले होते आणि बरेचसे झोपेत होते. सोमवार सकाळची बस म्हणजे दोन दिवस पुण्यात येऊन परत जाणारे कॉलेजचे विद्यार्थी, काही बँकवाले आणि कंपनीत काम करणारे काही नोकरदार लोक, काही सरकारी कर्मचारी. त्यांच्या बसायच्या जागाही ठरलेल्या. बसचे चालक-वाहक ठरलेले त्यामुळे तसे सगळे चेह-याने एकमेकांना ओळखतात, काही नावानिशीही ओळखतात हे “ते आले बघा पाटील साहेब, चल आता” असं वाहक चालकाला म्हणाला त्यावरून लक्षात आलं.

...मग असे द्या पैसे!

लेखक निनाद यांनी मंगळवार, 15/11/2016 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एकात्मिक भरणा पद्धती हा लेख मराठी विकिवर टाकला तोच येथे ही देत आहे. प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग होईल असे वाटते. एकात्मिक भरणा पद्धती हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. यापेक्षा चपखल शब्द सुचत असतील तर जरूर द्या. तसेच या लेखात भर घालण्यासाठी स्वागत आहे!

कट्टा

लेखक अभिजित कुमावत यांनी सोमवार, 14/11/2016 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
कट्टा हा शब्द बहुतेक करुन पुणेरिच. कट्टा जिथे अनेक मित्र एकमेकांना भेटतात. जिथे अनेक नवीन मित्र भेटतात, अनेक व्यक्ती भेटतात. कट्टा म्हणजे एक ठिकाण जिथे सगळ्यांना काही वेळ घालवावा असे वाटते. ईथे बऱ्याच चर्चा रंगतात. कुठलाही विषय पाहिजे असा नाही, बास सोबात कोणीतरी असावे एवढच. कट्टा म्हणजे अशी कुठली जागा fix नाही. एखाद hotel, टपरी, cafe, चौक, पार, ground, अगदीच देऊळ सुद्धा. सर्व मित्रांना योग्य अणि सोईस्कर वाटणारि एक जागा. एक मात्र नक्की कट्याची सवय ज्याला लागते त्याला ती सवय सहजा सहजी काही सोडता येत नाही. कट्टा ही जागाच अशी. इथले विषय सन्दर्भ धरून असतीलच अस नाही.

कल्पनेचे महेर

लेखक कवि मानव यांनी सोमवार, 14/11/2016 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही रात्री, मी झोपलोच नाही, उजेड लोचनांचे, कधी संपलेच नाही, हे देह फार क्षीणले, जाड पापण्या तरी ही, ते....स्वप्न दिसले, जे पाहिलेच नाही !!१!! त्या लक्ख प्रकाशात, गूढ अंधार होते, कल्पनेचे ते महेर, बहुत दार होते, दर्या, पर्वतांना ओलांडून पोचलो तर, ते शब्द कानी पडले, जे ऐकलेच नाही !!२!! ती पाहुनी पुण्यभूमी, मी जाहलो कृतार्थ, सहवास दिग्गजांचा, सह शारदेची साथ, कर जोडता तयांना, जी लागली समाधी, असे काव्य सुचले, जे वाटेलच (लिहिलेच) नाही !!३!!
काव्यरस

वस्तू

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 14/11/2016 17:13 या दिवशी प्रकाशित केले.

गट्टे के चावल : खास मारवाडी पेशकश

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 14/11/2016 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
अस्मादिकांचे सासर मारवाड प्रांत राजस्थान येथे असून जातिवंत खवय्ये लोकांचा हा भाग आम्हाला साहजिकच एकदम आवडतो, त्यात जावईबुआ (स्थानिक भाषेत पावणेसा) म्हणजे आम्ही जरा जास्त स्पेशल असतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर नाश्त्याला प्याज कचौरी अन काजूकतली असले मजबूत आयटम ते डिनरला खास मारवाडी गट्टे के चावल अन कढी हे प्रकार व्हाया लंच मध्ये तुपात पोहणारी दलाबाटी-चुरमा, बिकानेरी भुजिया सब्जी, पापड सब्जी असे सगळे असते. मारवाडी + जैन संस्कृती त्यातही १२ महिने कांदा लसूण न खाणारे बहुसंख्य लोक आजूबाजूला असणे ह्यामुळे मारवाडी जेवणात कांदा लसूण अजिबातच नसतो किंवा फार कमी असतो.