खुळ्या सांजवेळा...
खुळ्या सांजवेळा खुळा तोच गहिवर कुणी रोज त्याला कसे सावरे ??
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..
उन्हासोबतीने असे चालते की जणू सावलीशी न नाते जुळे
झुगारून देई जुन्या रीतभाती मिठी मारते वादळाला खुळे
फिरे धुंद, संदिग्ध पण सोवळेसे, थव्यातून फिरती जशी पाखरे
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..
दिवे लागणीची जशी वेळ येते दिसे अंगणी सांजवातीपरी
जणू होत स्मरणे विरागी स्वरांनी फिरे अंतराळी जशी सावरी
तमा ना कुणाची कशाची मनाला, जसे मन म्हणे ते तसे वावरे
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय!
काव्यरस
मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई
मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
___________________________________________________________________
जेव्हा हल्ला झाला, तेव्हा गल्लीतल्या अल्पसंख्यांक माणसांचा खून झाला, जे बाकी होते, ते जीव वाचवून पळाले. एक माणूस आणि त्याची बायको त्यांच्या घराच्या तळघरात लपले.
दोन दिवस-दोन रात्री त्या नवरा-बायकोने मारेकरी कधीही मारायला येतील या भीतीत घालवले, पण कोणीही आलं नाही. असेच दोन दिवस गेले.झुक्किनी - चीज बाइट्स
ऑक्टोबर हीट सरुन आता हळूहळू पारा खाली सरकतोय. बाकी ठिकाणीही कुठे बोचरी थंडी, कुठे हिमवर्षाव सुरु झालाय. अश्या वेळी काहीतरी नवीन चमचमीत, गरमागरम करुन बघावे म्हणून आणि घरात आणलेल्या झुक्किनीचा काही उपयोग करता येईल म्हणून हा पदार्थ बनवून पाहिला. आप्पेपात्राचाही सदुपयोग आणि तेलाचाही नाममात्र वापर, शिवाय पाकृ फार वेळखाऊ नाही, आणि चवीला.. अहाहा! त्यात गरम बाइट्समधले वितळलेले चीज .... दुपारच्या चहाबरोबर, जेवताना स्टार्टर्स म्हणून सर्वांनाच हे बाइट्स फारच आवडले.
कदंब
सळसळणारी हिरवळ देही, विस्तीर्णाचे पान
समांतराचा ध्यास उराशी, सममितीचे भान
हिरवट पिवळे, तांबूस लोलक, नाजुक इवली फुले
वार्यावरती सरसरणारे , गंधविभोरी झुले
हिरवाईवर तांबूस हळदी, केसर भरले तुरे
चेंडूवरती कशिदाकारी, रुणझुणती गोपुरे
कृष्णासखा की म्हणू कदंब, रूप तुझे भरजरी
पानोपानी जणू वाजते कान्हाची बासरी
अवतीभवती पिंगा घालत भ्रमरांची लीला
मोह वाटुनी सोडून येई आम्रतरु कोकिळा
रुंद–अरुंदशा हिरवाईची दाट तुझी सावली
शांत असा विश्रांत जीवाला, स्मरते मज माऊली
- प्राजु
सदर फोट
मंटो च्या लघुकथा ३ : बेखबरी का फायदा
बेखबरी का फायदा
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
-------------------------------------------------------------------------------------------
खटका दबला : बंदुकीतून गोळी बाहेर पडली.
खिडकीतून बाहेर पाहणारा माणूस जागेवरच आडवा झाला.
थोड्या वेळाने खटका पुन्हा दबला : बंदुकीतून दुसरी गोळी बाहेर पडली.
तो रस्त्यावर पडला, आणि त्याचं रक्त रस्त्यावर वहायला लागलं.
तिसऱ्यांदा खटका दबला.बायका बायकांची बरोबरी का करतात
बायका बायकांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की आकर्षक,टंच,अधिकार पदावर असलेल्या बायका ज्या गोष्टी करतात त्या केल्या की अन्य सामान्य बायकांना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो.
१. कतरिना कैफ छोटे कपडे घालते, करा अनुकरण. प्रियांका चोप्रा बिकिनी घालते, करा अनुकरण. मग बेफिकीरीत आपल्या बेढब देहावर तंग कपडे घालून स्वतःला माधुरी दीक्षितच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा ' लूक ' देत असतात
२. शेजारची टंच मुलगी जिन्स ,टी शर्ट वापरते. मग इतर बायकाही तिचे अनुकरण करतात.
योगशिबीरातले दिवस २: योगाभ्यास- A man is as old as his spine is flexible
मागच्या लेखात शिबीराची ओळख, दिनचर्या सांगितली . या लेखात शिबीरात काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे. अर्थात शेवटी, केंद्रातले व्यासंगी, प्रगल्भ वक्ते हे सगळे अतिशय प्रभावीपणे अगदी सहजगत्या उलगडुन सांगतात. तिथले प्रदुषणमुक्त वातावरण, आहार-विहार आणी मुख्यतः सामुहिक साधनेचा खुप फरक पडतो. सकारात्मक स्पंदने मिळतात.
अष्टांग योगात यम नियम वगैरे असतात हे आपण वाचले/ऐकले आहे. पण यम नियम म्हणजे तरी काय, याबद्दल जे आम्हाला सांगितले ते इथे मुद्द्यानिशी मांडतेय .
मिसळपाव