Skip to main content

गतं न शोच्यं ! !

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी बुधवार, 07/12/2016 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारतात दोन परंपरा सुरु आहेत. त्याविषयी येथे लिहिण्याचा हा प्रयत्न.शासकिय उच्च पदावरील व्यक्ती, जेंव्हा मरण पावते, त्यावेळी राष्ट्रभर अथवा राज्यभर सात्/तीन्/एक दिवसाचा दुखवटा पाळला जाण्याची घोषणा केली जाते.शासकिय जाहिर केलेले कार्यक्रम रद्द केले जातात. मरण कोणालाही चुकलेले नाही, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे, हे काही नवीन नाही. कोणतीही व्यक्ती, मग ती आपल्या घरातील असो, समाजातील असो वा उच्च पदावरील असो, दु:ख्ख तर होणारच." मरणांती वैराणी " असे आपल्या कडे म्हटले जाते. मरण पावल्यानंतर, त्या व्यक्तिशी असलेले वैर संपुष्टात येते, आलेच पाहिजे.

(सत्य घटना)

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 07/12/2016 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
...................... ६५ वर्षाचे काका रस्त्याने जात असतात.. काका "तात्या टोपे" होते.. मस्त दाट केसांचा विग.घातलेला होता... लक्ष्मी रोड शनी पार सारख्या गर्दीच्या ठिकाणाहून काका कडे कडेने जाताना एका भरधाव जाणा-या रिक्षावाल्याने काकांना धक्का दिला... काका चा तोल गेला व ते पडले.

भूनंदनवन काश्मीर – भाग ३ (चरार-ए-शरीफ़ – पाखेरपोरा – युसमर्ग)

लेखक के.के. यांनी बुधवार, 07/12/2016 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================== भूनंदनवन काश्मीर - भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४ ==================================================== भूनंदनवन काश्मीर – भाग ३ (चरार-ए-शरीफ़ – पाखेरपोरा – युसमर्ग) काश्मीरमधे आमची पुढची भेट चरार-ए-शरीफ व युसमर्गला होती.

शेवटी तो दिवस उगवलाच.....

लेखक बाजीप्रभू यांनी बुधवार, 07/12/2016 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
त्यादिवशी सकाळी ऑफिसला निघतांना उंबरठ्यावरच एक डांग्या शिंक आली होती. त्या आवाजाने पॅसेजच्या सिलिंगवरील एक पालीचं पिल्लू अंगावर पडलं नाही पण घाबरून दरवाज्याच्या फटीतून घरामध्ये घुसलं. 'मार दिया जाय, या छोड दिया जाय' हा विचार करण्यात काही सेकंद गेली. ते पिल्लूही "चार दिवस रहाते, किडा-मुंगी खाते, धष्ट-पुष्ट होते, मग तू मला मार" असं चुकचुकत गेल्याचा भास झाला म्हणून लगबगीने दरवाजा लॉक करून निघालो. लिफ्टमधे माझ्याबरोबर तिन-चार काळे कपडेवाले होते. (थायलंडमधे राजासाठी वर्षभर "दुखवटा" असल्याने लोकांचे काळे कपडे नेहमीचेच झालेत).

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १० )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 07/12/2016 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या खालवत चाललेल्या प्रकृतीच्या आठवणी गुरूनाथ सरावाप्रमाणे रोज सोनचाफ्याची फुलं परडीत जमा करून सुम्याला आणून द्यायचा.त्यातलं एक फुल सरावाप्रमाणे सुम्या आपल्या केसात माळायची.उरलेली फुलं देवाच्या फोटोवर आणि आपल्या गेलेल्या प्रियजनांच्या फोटोवर वहायची.असं करीत असतानाचे ते क्षण तिला मनात येणार्‍या काळजी करणार्‍या विचारापासून दूर ठेवायचे.

प्रयोगशील शाळा

लेखक मद्रकन्या यांनी बुधवार, 07/12/2016 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारच्या लोकमत मंथन पुरवणी मध्ये प्रयोगशील शाळांबद्दल लेख आला होता. या शाळांच्या कार्यपद्दतीची थोडक्यात चांगली ओळख करून दिली आहे या लेखात. त्यात महाराष्ट्रातल्या काही शाळांची नावं पण आहेत. http://epaper.lokmat.com/epapernew.php?articleid=LOK_MTHN_20161204_5_1&a... याच लेखाच्या निमित्ताने नाशिक मधील आनंद निकेतन शाळे बद्दल थोडी माहिती: शाळेची वेबसाईट माझा मुलगा तन्मय आनंद निकेतन, नाशिक या शाळेत इयत्ता पहिलीत आहे.