Skip to main content

राख !

लेखक चिनार यांनी सोमवार, 12/12/2016 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
स्मशानातील गर्दी आता सरली होती.पण आजच्या घटनेमुळे, चिरनिद्रेत विश्रान्ती घेणाऱ्या बनाबाईचा आत्मसुद्धा दोन क्षण का होईना पण सुखावला असेल.............. ************************************************************************************* शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या त्या आश्रमात पहाटे चार वाजता हलकल्लोळ माजला होता. त्याला कारणही तसंच होतं. आश्रमात एका साध्वीचा अचानक मृत्यू झाला होता. काही वेळापूर्वी साध्वीच्या खोलीत आगेच्या ज्वाळा दिसल्याने आश्रमातले सगळे तिकडे धावले. पण आग लागल्याचे उशीरा लक्षात आल्याने आता काहीही उपयोग नव्हता.

रस - रस - रसायन

लेखक हर_हुन्नरी यांनी सोमवार, 12/12/2016 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
रस - रस - रसायन [रसायनंसर्वत्रचआहेतअनादिकालापासूनमगमनुष्यआलामनुष्याचीप्रगतीझालीरसायनशास्त्राची देखीलपाळण्यापासूनसरणापर्यंतरसायनंमाणसाचीसोबतीझालीसुंदरकुरूपतरुणवयस्ककुठल्याही प्रकारच्यामाणसालाभूकलागतेतेव्हा जठरातकाहीरसायनंस्त्रवतअसतात ] सकाळ पासून खोलीत कसलासा वास येतो अर्धवट झोपेतच हा वास नाकात घुसतो आणि ढिले पडलेले न्यूरॉन एकदम धावपळ करू लागतात कसला हा उग्र वास , याचा शोध घेऊ लागतात झोप चाळवते , स्वप्नं तुटतात जिना धुताना कोणाकडून तरी रसायनाची बाटली फुटते बिल्डिंग भर त्याचा गन्ध भरून राहतो फिकट हिरव्या रंगाच्या या बाटलीवर मोगऱ्याची फुलं आहेत पण भस्सकन रसायन सांडल्यावर मोगऱ्याच्या फुलांचा म

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५

लेखक अबोली२१५ यांनी सोमवार, 12/12/2016 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्या सॅलरी स्लिप त्याने बँकेत जमा केल्यावर त्याने (आनंदाने) एक बातमी दिली तुझी सॅलरी २,००,००० पेक्षा कमी आहे त्यामुळे तुझं लोन फक्त १,७०,००० एवढच होऊ शकत... (काय???? बाकीचे १,८०,००० कुठून आणु.) मी माझ्या मैत्रिणीला फोन केला मी ३. ५० लाख जमा करू शकत नाही आहे. तर तू मला थोडी मदत करशील का या वर माझ्या चुलत सासूबाई आजारी आहेत माझा नवरा चेकबुक आताच घेऊन गेलाय त्यामुळे मी काही मदत करू शकत नाही तुझं तुला पाहावं लागेल. (अरे हि तर म्हणत होती कि तुझ्या पैशांची जबाबदारी मी घेते, कमी पडलं तर मी मदत करेन ) मी गप्प बसलेली पाहून ती बोलली अग त्या खूप सिरिअस आहेत त्यामुळे मी तुला मदत नाही करू शकत.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ११ )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 12/12/2016 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या निधनाच्या आठवणी काल गुरूकाकाने आईबद्दल जे सांगीतलं ते ऐकून सुम्याची मुलगी मनातून भयभयीत झाली होती.तिला आपल्या आईची खूपच काळजी वाटायला लागली होती.आपली आई आता जास्त दिवस काढणार नाही हे तिने मनात निश्चीत केलं होतं.त्या दिशेने म्हणजेच तिला कसलीही खाण्याची इच्छा झाली ती ती पुरवत होती.खरं म्हणजे सुम्याला खाण्याची कसलीच इच्छा राहिली नव्हती.आपल्या मुलीला किंवा गुरूनाथला वाईट वाटेल म्हणून ती बोलत नव्हती पण मनोमनी तिला वाटत होतं की आपण आता या जीवनातून मुक्त व्हावं.पण तशी इच्छा करून भागत नाही.प्राण जाणं कुणाच्या हातात नाही.परंतु,मला जगावं असं वाटत नाही असं आपल्याच लोकाना परत परत सांगून त्यां

अश्रू अनावर झाले..

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 11/12/2016 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
पिंपरी अशी उंच टेकडीवर उभी राहून पुण्याला साद घालत होती. दुपार टळटळत होती. गिधाडे उडत होती. पुणं आपलं आभाळाला देणगी देत निवांतपणे पहुडलं होतं. यावेळी कोथरुड जरी दारात आलं असतं तरी पुण्यानं त्याला हुंगलं नसतं. मुळा मुठा नावाच्या समुद्राला भरती आली होती. पाखरे उडत होती. दूरवरची साद ऐकल्यावर पुण्यानं कूस बदलली. च्यायला काय कटकट आहे. मागं एकदा भोसरी अशीच साद घालायची. त्यावेळीसुद्धा पुणं असंच वैतागलं होतं. मग त्यानं भोसरीची वाटच लावून टाकली. पण पिंपरीची कथा थोडी वेगळी होती. दम दमा दम रापून निघालेलं ते एक अवखळ सौदर्य होतं. तिचा नाद करायला कुणी एकजण आला होता.

पुरोगामी - प्रतिगामी

लेखक संदीप ताम्हनकर यांनी रविवार, 11/12/2016 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
पुरोगामी - प्रतिगामी मराठीतील एका वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखातून एकंदरीत पुरोगाम्यांवर दुगाण्या झाडल्या. त्यामुळे खरंतर मी हे लिखाण केले. पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतीवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी नसतात, मनुवादी नसतात, धर्मवादी नसतात, कर्मविपाकसिद्धांतवादी नसतात, शब्दप्रामाण्यवादी नसतात, कट्टर धार्मिक नसतात.

सय संद्याकाय

लेखक ऊध्दव गावंडे यांनी रविवार, 11/12/2016 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
झाली सय संद्याकाय दिवे लाव्याचा वखतं वाट पायता राघुची तोंड चाललं सोकतं डोये फाळूनं फाळूनं काय वाटी नं पायतं धंदा पळला घरात जीव काहाले जायतं? चिळ्या रायल्या भऱ्याच्या झाला किती वारखोळं राघू साठी मैना तूहं कुठी अळलं व घोळं? अशी तिसऱ्या पायरी बस्तं धरूनं ऊंबठा तोही झिंजते घासूनं तूह्या पायाचा आंगठा नंदा ईचारती तव्हा होटं उलतच नाई आता काहाले दाठ्ठ्यातं ऊभी रायतं व बाई?

सय संद्याकाय

लेखक ऊध्दव गावंडे यांनी रविवार, 11/12/2016 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
झाली सय संद्याकाय दिवे लाव्याचा वखतं वाट पायता राघुची तोंड चाललं सोकतं डोये फाळूनं फाळूनं काय वाटी नं पायतं धंदा पळला घरात जीव काहाले जायतं? चिळ्या रायल्या भऱ्याच्या झाला किती वारखोळं राघू साठी मैना तूहं कुठी अळलं व घोळं? अशी तिसऱ्या पायरी बस्तं धरूनं ऊंबठा तोही झिंजते घासूनं तूह्या पायाचा आंगठा