RIP पंडित
पंडित आताच तू गेल्याची बातमी वाचली आणी जाणवलं पुण्याशी आपुलकीने नातं असलेला अजून एका कलाकार गेला.
कित्येक चित्रपटातून तू भेटत होतास अगदी विविध रोल्स मध्ये पण तुझं खास असं अस्तिव जाणवलं ते 'माचीस' मध्ये त्यातला 'सनातन' तू ज्या दहकतेने रंगवला आहेस त्याला तोड नाही.
'जंगल बुक' मधला 'बघिरा' कोण विसरू शकेल, त्या आवाजातच एवढी जरब होती कि बस्स.....
अगदी कालपरवा तुझा 'मकबूल' पाहिला, त्यात नासिर बरोबरची तुझी जोडी झकासच होती. तुम्ही दोघही FTII च्या एकाच बॅच मधले असल्याने दोघांमधल जे को-ऑर्डिनेशन होतं, ते लाजबाब होतं.
मिसळपाव
दंगल पाहिला. आवडलाच..
अगदी शतकोत्तर कलाकृती नसली तरी पिक्चर उत्तमच आहे. आणि मला आमीर खान देशद्रोही वाटत नाही, म्हणुन मला त्याचं कौतुक करायलाही काही त्रास नाही.
दंगल मध्ये आमिर, फातिमा, सान्या, सांक्षी तंवर आणि अपारशक्ति खुराणा म्हणजेच ओंकार.. सगळ्यांचेच काम उत्तम आहे. त्यांनी त्यांच्या लुक्सवर घेतलेली मेहनत, त्यासाठी केलेला व्यायाम.. हे तर महत्वाचं आहेच. पण खास करुन आमीरने वजन वाढवुन, ते पुन्हा कमी केलंय.