Skip to main content

एखाद्या ठिकाणाची आठवण करून देण्याची शक्ती वासात,गंधात, असते.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 02/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिवस मला आठवतो.शेतात कामकरणाऱ्या माझ्या सकट इतर कामगारांना एक दुर्गंध येत होता.शोधता शोधता एका पिंपळाच्या झाडाखाली एका झुडपात दुर्गंध तिव्र झाला. झुडूप विस्कटून पाहिल्यानंतर एक रान-मांजर मेलेलं आढळलं. रात्री घरी गेल्यावरही तो दुर्गंध माझ्या नाकात “वास” करून राहिला होता. निसर्गाने पृथ्वीवरच्या बहुतेक जीवांना वास अनुभवण्याची दिलेली क्षमता पाहून मला निसर्गाचं कौतुक करावसं वाटतं. मी,अगदी साध्या गंधाच्या सामर्थ्याचंही कौतुक करतो. हा एक विलक्षण प्रकार अनुभवता येतो. वास सौम्य ही असतो तसाच तो जहरी असतो. काही गंध क्षणभंगुर असतात आणि काही वर्षानुवर्षे टिकून राहतात.

धटिंगण रॉ आणी वॉशिंग्टन पोस्ट ची कावकाव

लेखक वडगावकर यांनी गुरुवार, 02/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता मध्ये आज एक मस्त बातमी वाचली (ती कॉपी पेस्ट करत नाही , नाहीतर काही सन्माननीय सदस्य... ) वॉशिंग्टन पोस्ट मधल्या बातमीचा गोषवारा असा होता की... भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक आहे. गेल्या दोन अडीच वर्षात साधारण १०/११ जणांची पाकिस्तानात हत्या झालीये. त्या सगळ्या हत्यांमध्ये एक सूत्र सामान आहे , हे सगळे कार्यकर्ते भारतविरोधी प्रचारामध्ये किंवा प्रत्यक्ष वा अ-प्रत्यक्ष कारवायांमध्ये गुंतलेले होते ईस मे रा की साजिश है (रॉ नाही बरका) पाकिस्तानी चॅनेल्स कंठशोष करून सांगतायेत...

चाय की चर्चा..

लेखक आजी यांनी गुरुवार, 02/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाचं शीर्षक "चाय पे चर्चा" असं नाही बरं का. मला चाय पे चर्चा करून माझ्या एरियातल्या कोणत्याही समस्या मांडायच्या नाहीत. किंवा कोणतीही राजकीय चर्चा करायची नाही. मला ॲक्चुअल चहा याच विषयावर लिहायचं आहे. चहाला चाय म्हणतात. चा म्हणतात. च्या म्हणतात. टी म्हणतात. प्रत्येक भाषेत चहासाठी शब्द आहे. यावरूनच त्याची जागतिक लोकप्रियता दिसून येते. मला चहा आवडतो. खूप आवडतो. पण म्हणून मी सारखा सारखा चहा पित नाही. फक्त दोनदा. सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी. संध्याकाळी एक वेळ नसला तरी चालेल. पण सकाळचा मस्ट. मात्र मला चहा जसा आवडतो तसाच बनलेला हवा.

माझ्या बद्दल थोडं

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 02/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याबद्दल थोडं. मी साहित्यिक नाही सराईत साहित्यिक तर नाहीच नाही. माझा “कृष्ण उवाच” नावाने ब्लॉग आहे तो shrikrishnasamantwordpress.com ह्या url वर पण मिळू शकतो मी गेली 17 वर्षे माझा ब्लॉगवर लिहीत आलो आहे January 2007 पासून. लिहित आहे. मला मराठी लिहिता येतं तसंच मला थोडं फार शुद्धलेखन कळतं आणि मी माझे विचार मांडायला उत्सुक असतो. मी माझ्या ब्लॉगवर झालेली टीका स्पोर्टिंगली घेतो. टीकेचे स्वागत करतो. गेली 30 वर्ष मी अमेरिकेत स्थायिक आहे मी अमेरिकन सिटीझन पण आहे.मी Californiaत राहतो. मला माझा देश भारत याच्याबद्दल खूप अभिमान आहे तसंच मी शिवाजी महाराज यांना माझं दैवत समजतो.

“आई” म्हणजेच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलीजन्स

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 02/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
“आई” म्हणजेच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलीजन्स आज खूप दिवसांनी आम्ही तिघं, म्हणजे मी, प्रो.देसाई आणि प्रो.पोंक्षे एकत्र तळ्यावर जमलो होतो.आज प्रो.पोंक्षे आम्हाला त्यांच्या अलीकडेच्या सायन्स मेळाव्याच्या गप्पागोष्टी आणि त्यांना आवडलेलं सर्वात उत्तम भाषणाचा आढावा वजा मनोरंजक माहिती सांगणार होते. सुरवात करताना ते हसत हसत म्हणाले, “ ह्या तरूण प्रोफेसरचं भाषण मला प्रभावशाली वाटलं.तो सुरवात करताना म्हणाला, महाराष्ट्रात मातेला “आई” म्हणतात.

शॉर्ट शॉर्ट फिक्शन.

लेखक भागो यांनी बुधवार, 01/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
शॉर्ट शॉर्ट फिक्शन. कमीत कमी किती शब्दात लेखक कथा लिहू शकतो? मानवी भावनांची गुंतागुंत व्यक्त करण्यासाठी कमीत कमी किती शब्दांची गरज आहे? आता हे तर सर्वमान्य आहे कि शंभर शब्द पुरेसे आहेत.(कथा शंभरी), कथापन्नाशी वा कथापच्चीसी. असे प्रयोग करायला काय हरकत आहे? दहा शब्द? पुरेसे आहेत? अर्नेस्ट हेमिंग्वे ह्या महान कथा लेखकाने केवळ सहा शब्दात लिहिलेली ही अजरामर कथा. मराठीत भाषांतर करायची माझी हिम्मत नाही. “For sale: baby shoes, never worn.” ही कथा वाचून दहा वर्ष झाली. पण अजून ती आकलन झाली आहे असं वाटत नाही. हे सहा शब्द वाचून तुमच्या मनात काय भाव दाटून येतात?

मी आणि समुद्रकिनारा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 01/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
निळा समुद्र, गरम वाळू, छोटे मासे, खारी हवा, समुद्राची झुळूक आणि तो उबदार सूर्य. ह्या माझ्या लहानपणी उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा समुद्रकिनाऱ्यावर खूप जीव होता.. मला वाटतं की, समुद्रकिनारा आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते. मला असं वाटतं की समुद्रकिनाऱ्याकडे मी त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो मला आठवतं की एकदा आम्ही गोव्याला गेलो होतो,तो बिच वेगळा होता, पाहून मी थक्क झालो होतो. पण कोकणातला, माझ्या आजोळ जवळचा बिच मला निराळा वाटायचा.

तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 01/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं. काल मी आणि श्री समर्थ असे दोघेच तळ्यावर फेऱ्या घालत होतो.बोलता बोलता मधुमेह ह्या व्याधीचा विषय निघाला. “अलीकडे आपल्याकडे ह्या व्याधींचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे “ असं मी समर्थांना म्हणालो. “जशी देशाची श्रीमंती वाढत चालली आहे तशी अनेक जणांची खाण्याची सवय वृद्धींगत होत चालली आहे असं मला वाटतं. आणि हळूहळू एव्हडं जेवण घरी तयार करून ठेवण्यापेक्षा बाहेर उक्तं मिळत असेल तर बाहेर पैसे खर्च केल्यास घरी कष्ट कमी होतात.आणि बाहेर जेवण्याच्या सवयी वाढत असल्याने त्याची पुर्तता करण्यासाठी खाण्याच्या सोई वाढत आहेत.

लाख म्हणू देत जगाला, ही संगत अटळ आहे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 01/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत मार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेत तूझ्या माझ्या मनाचा निर्णय होता भेटण्याचा जसे बगीच्यात बहार असतां फुलांचा बहरण्याचा तुझे दू:ख आता माझे,माझे दू:ख झाले तुझे तुझे हे दोन नेत्र, चंद्र सूर्यासम झाले माझे लाख म्हणूदेत जगाला,ही संगत अटळ आहे हातात हात असल्याने, हे हात सुटणे अटळ आहे अरे, मला जीवनसाथ देणाऱ्या, प्रियतमा तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत मार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेत तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत
काव्यरस

समाजमाध्यमांवरील निरागसता

लेखक सर टोबी यांनी सोमवार, 29/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण १९९८ ला टर्निंग पॉईंट या संस्थेचं "फोरम" नावाचं तीन दिवसाचं शिबिर केलं होतं. व्यक्तिगत संबंध, कामाच्या ठिकाणी इप्सित ध्येय साध्य करण्यासाठीची बांधिलकी, आणि व्यक्तिगत प्रगती अशा गोष्टींवर काही नाविन्यपूर्ण कल्पनांच्या द्वारे स्वतःमध्ये बदल घडवून आणणे असा त्या शिबिराचा उद्देश असतो. आजकाल अशी शिबिरं आणि त्यातील गुरु यांचा सुळसुळाट झाला आहे. त्याकाळी तब्बल तीन हजार खर्च करून आणि रोज किमान ९ तास श्रवणभक्ती करणं हे तसे नविनच होते.