Skip to main content

वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - वेस्ट इंडीज विरुद्ध श्रीलंका

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 25/02/2017 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
२८ फेब्रुवारी २००३ न्यूलँड्स, केपटाऊन टेबल माऊंटनच्या पार्श्वभूमीवर असलेल्या केपटाऊनच्या निर्सगरम्य न्यूलँड्सच्या मैदानात पूल बी मधली वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांचातली मॅच होती. वर्ल्डकपमधलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी वेस्ट इंडीजच्या दृष्टीने ही मॅच अत्यंत महत्वाची होती.

मराठी भाषा दिन २०१७: फोनाफोनी (वर्‍हाडी)

लेखक चिनार यांनी शनिवार, 25/02/2017 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
1 . "हालो ... बापूसायब बोलून ऱ्हायले का जी?" "हा मंग... कोन बोलून ऱ्हायलं?" "आहो मी.... मी पद्मा बोलून ऱ्हायली." "पद्मा?" बापूसायबाले कायबी टोटल लागेना. "वळखलं नाय का?" "आवाज वळखीचा हाय, पन आठवू नाय ऱ्हायला." "अवं मी भौसायबाची सून.. तुमी नाय का त्या दिवशी घरी आल्ते?" "हा हा... बोला सुनबाई .. आत्ता आलं ध्यानात." आता भौसायबाची सून आपल्याला कायले फोन करू ऱ्हायली ते बापूसायबाले कळेना.. "बापूसाहेब येक अडचण व्हती. मदत करसान का?" "सांगा की सुनबाई. अवं हक्क हायं तुमचा.

मराठी भाषा दिन २०१७: आठोन (वर्‍हाडी)

लेखक संदीप डांगे यांनी शनिवार, 25/02/2017 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
1 . जवा जवा मायी आठोन यीन तुले तवा या अक्शराईत पायजो मले उलसाक आठोलो तं भूलजो मले मायासंगचे दिवस कंदीमंदी येतीन भरुन तुया डोयामंदी तवा त्या आसवाईत पायजो मले उलसाक आठोलो तं भूलजो मले काई नाई मायाजोळ ठूलं म्या सूक-दुक, चेन-भूक, बांधून तुले देलं म्या गाठोड्यात त्या सांभाळून ठूजो मले उलसाक आठोलो तं भूलजो मले मायी नाई झाली, कोणाची तं होशीन मले नाई ठिक, त्याले तं खुश ठूशीन काम पळलं काई तं सांगजो मले उलसाक आठोलो तं भूलजो मले जवा जवा मायी आठोन यीन तुले तवा या अक्शराईत पायजो मले उलसाक आठोलो तं भूलजो मले उलसाक आठ

मराठी भाषा दिन २०१७: हा सब झाला त कसा झाला?(झाडी बोली)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 25/02/2017 06:25 या दिवशी प्रकाशित केले.
1 "जा रे पोट्ट्याइवा, गवऱ्यायसाटी सेन जमा करून आन्जान." माय असी बोलावसीन अना आमि घमेले, गंज्या घेऊनसन्यारि धावत निंगावसीन. मोहल्ल्यातले बाकिचे पोट्टे बी संगासंग चलत. आमी दुसऱ्या गावी रायत होतून. येति काइ आमच्या गाइभसी नोहोत्या. त्या सब आमच्या वस्तीवाल्या गावी. अना त्या जमान्यात गॅस बी पोवचला नोहोता. तं चुलीवर सब रांधा लागे. मंग गोवऱ्या बी लागत. मी, माह्या भाऊ, मोहल्ल्याचे बाकी पोट्टे असे सबजन घमेले, गंज्या घेउनसन्यारि गाइभसीइच्या मंगामंगा जात रायतोतो. मंग त बाप्पा बम मज्या येहे.

शिट्टी

लेखक शैलेन्द्र यांनी शुक्रवार, 24/02/2017 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
नाना आणि तात्या, दोघ शेतकरी, नानाच कुरण तसं जुनं, नानाचे बैल मस्त पोसलेले, नानाच गवत जोरात वाढायच, बैल चरून तुस्त व्हायचे..

पुणे ते लेह (कारने)

लेखक अभिजीत अवलिया यांनी शुक्रवार, 24/02/2017 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गेली ४ वर्षे प्लॅन केलेली आणी दरवेळी काहीतरी टिनपाट कारणाने बारगळलेली पुणे ते लेह लडाख ट्रिप ह्या वर्षी जून मध्ये करण्याचे ठरवले आहे. अंदाजे १ जूनला पुण्यातून निघायचे असा बेत आहे. (९९.९९% ह्या वेळी ट्रिप होईलच). (मनाली वरून लेह गाठायचे आणी श्रीनगर वरून परत यायचे का उलट करायचे ह्याचा अजून निर्णय झालेला नाही) ट्रिपच्या अनुषंगाने मोदक रावांना भेटून तसेच कारने ट्रिप केलेल्या एका व्यक्तीचा अनुभव वाचून प्राथमिक माहिती घेतली आहे. मोदक रावांच्या अनुभवानुसार जून हाच योग्य महिना आहे जायचा.

मराठी भाषा दिन २०१७: दुरपदा (अहिराणी)

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी शुक्रवार, 24/02/2017 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
1 . मना मामाना गावमा एक डाव असं घडनं. मी तवयं धाकला व्हतू.पन मना मामा , मना दोस्त व्हता. रातले, मी मामाना जोडे जपाले जाये. तवय मना मामा माले रोज गावमा काय काय घडनं, ते सम्दं सांगे. मामाले चावयानी भलती गोडी व्हती. मामीले आयकाना भलता कटाया व्हता. म्हनिसन माले गावमा काय काय भानगडी चालु शेतस त्या बठ्ठा समजे. एक रोज मामा सांगत व्हता. त्या गावमां एक सुतार र्‍हाये. सुतार तसा कामले चांगला व्हता. लोकेस्मा मियि मिसळीसन र्‍हाये. काम कराले बी वाघ व्हता. सम्दा लोके त्याले 'सुतारदादा' म्हनीसनी हाक मारेत.

जिभाऊ

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 24/02/2017 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
जिभाऊ डोक्यावर अस्ताव्यस्त विखुरलेले केस वाऱ्याच्या संगतीने नाचत राहायचे. बहरात आलेल्या पिकात वारा शिरून सळसळ होतांना हालचाल व्हावी, तसे डौलात डोलत राहायचे. त्यांच्या स्वैर विहाराला मर्यादांचे बांध क्वचितच घातले जात. कोणत्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने डोक्यावर टोपी विसावलेली असायची, तेव्हाच हे घडायचे. अन्यथा स्वतःला बंदिस्त करून वावरण्याचे प्रसंग त्यांच्या वाट्याला फार कमीच. कारण टोपी प्रासंगिक निमित्तालाच परिधान करायची, हा जिभाऊचा स्वतःपुरता अलिखित नियम. टोपी नसायची तेव्हा डोक्यावर बागायतदार रुमालाचे मुंडासे गुंडाळलेले.